Skip to main content

राम अनुज भरत भाग ३३

राम अनुज भरत भाग ३३

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
 
त्या वृक्षाव्या बुंध्यावर असलेल्या एका श्लोकाकडे अंगुली निर्देश करून भरत, आर्य सुमंत आणि कुलगुरू महर्षी वसिष्ठ, याना म्हणाला. 

" महर्षी, हा श्लोक आपल्याला, विनासायास श्री रघुपती यांच्याकडे घेऊन जाईल.आपण याचं मार्गाने पुढे जाऊया. कदाचित याच मार्गाने, पुढील खुणा आपल्याला सापडत जातील." 

अर्थातच, बाकीच्या तिघांनीही, भरताच्या त्या म्हणण्याला दुजोरा दिला आणि भरतासह इतर, त्याचं मार्गाने पुढे निघाले.थोड्या अंतरावर,पुढील एका वृक्षावर, श्लोकाच्या ओळी दिसल्यावर आणि त्यांचा गुह्यार्थ जाणल्यावर, भ्राता भरत, सुहास्य वादनाने,अतिवेगाने, पुढील मार्गाकडे निघाला. बाकीचे तिघेही, त्याचं गतीने मागोमाग निघाले. अर्थात इकडे श्रीराम, देवी सीता आणि लक्षण प्रतीक्षेत उभे होते. भरत, त्या श्लोकांच्या चिन्हांचा माग काढत काढत अतिवेगाने पुढे जात होते. 

अचानक एका वृक्षाच्या श्लोकावर नजर जाऊन, भरत थबकला आणि म्हणाला, 

" मुनिवर, ब्रह्मस्वरूप महर्षी वसिष्ठ, आता इथे आपण बरोबर उलट दिशेने अर्थात दक्षिण दिशेने असलेल्या मार्गिकेवरुन पुढे जाऊ. कारण हा श्लोक, या दोन मार्गा वरील दक्षिण दिशेचा मार्ग योजण्याची सूचना देत आहे."

गुरुदेवांनी, भरताच्या या कुशाग्र बुद्धीचा, उचित उल्लेख करून, त्याच्या म्हणण्याला अनुमोदन दिले. चारही पुरुष, त्या दक्षिणेकडे जाणाऱ्या, मार्गिकेने निघाले.मार्गातील स्वच्छता आणि मार्गांची नीट घडवलेली पायवाट पहात पहात जाताना वाटेवर पाहून, भरत, एका स्थळी थांबला. त्याने त्या पायाच्या ठश्यांना माथा टेकून, त्या पदचिन्हं असलेल्या भरभक्कम पावलाला, दोन्ही कर जोडून, नत मस्तक होत, नमन केले आणि त्या पावलावरील थोडी मृत्तिका आपल्या कपाळी लावून, मस्तिष्क व हृदय याना स्पर्श केला. 

तर पश्चात, वळून म्हणाजा

" पाहिलत गुरुदेव, आर्य आणि सचिव,हे विशाल पदचिन्ह ज्येष्ठ भ्राता रघुकुलभूषण प्रभू श्रीराम यांचं आहे. त्या पावलांवर अंकित सर्व शुभ चिन्हे, या मृत्तिकेवर अंकित स्पष्ट दिसत आहेत. हे मध्यम आकाराचे पद चिन्ह अर्थात अनुज लक्ष्मण याचं आहे आणि ही सर्वात लहान आणि सुकोमल चरणकमलं देवी सीता हीचे आहेत. मला हे सर्व पाहून, आताच हृदयात वेदना आणि मस्तिष्कात घणाचे घाव घातल्या प्रमाणे होत आहेत.

गुरुदेव, ज्या चरणांनी, अयोध्येच्या राज्यात रथातून, अवलोकनार्थ जायचे, ज्या चरणांची मृत्तिका आम्ही तिन्ही बंधूंनी, भाळी भूषण म्हणून लावायची ती चरण कमळे, या इथे वनात एका निर्जन स्थळी, बास करत आहेत. या पापाचा धनी मला व्हाव लागत आहे, ही टोचणी आहेच.. पण त्याहीपेक्षा, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना अयोध्येचा राजपाट, वैभव, साम्राज्य सोडून, या निर्जन वनात, याव लागत आहे." 

इतकं बोलून, भरत, अतीव मानसिक वेदनेने, महामंत्री, आर्य सुमंत यांच्या खांद्यावर मस्तक ठेवून, विव्हळून रडायला लागला. जणू, इतका वेळ, धरून ठेवलेले अव्यक्त भाव, हळूहळू व्यक्त व्हायला सुरवात झाली आहे, हे तिघांच्याही लक्षात आलं. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
११/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...