Skip to main content

राम अनुज भरत भाग ४३(भरताला श्रीरामांचा बोध)

राम अनुज भरत भाग ४३
(भरताला श्रीरामांचा बोध)

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.. 

प्रभू पुढे सांगत आहेत. 

"हे कैकायात्मज, याच उत्तरदायित्वाचं बीज, आपल्या देहात, जन्मतः पेरल गेलं आहे. ही नैतिक अधिष्ठानप्राप्त परंपरा, जितकी शुद्ध आणि सात्विक आहे, तितकीच ती नाजूक आहे.म्हणजेच आपल्या छोट्याश्या चुकीने आपण या परंपरेला जपण्यास अपात्र होऊ.या परंपरेचे वारसदार असलेले,स्वर्गीय महाराज दशरथ,यांनी आपल्या वचनाच्या खातर, आपल्याला दोन आज्ञा दिल्या आहेत. 

याच आज्ञेची बद्धता, आपल्याला पुढील चौदा वर्ष, आपल्या आज्ञेत बांधून ठेवणार आहे. लक्षात ठेव, हे काही सर्व सामान्य जीवांनी, जगताना दिलेलं वचन नाही. तर ते रघुकुल भूषण, प्रजाहित दक्ष, महाराज दशरथ यांच्या मुखातील अंतिम आदेश आहे. त्यांचा त्या नंतर अंत झाला कारण, त्यांनी परंपरा उल्लंघन करण्यापेक्षा, त्या देहातून प्राणत्याग करणं उचित समजलं.हे तू ध्यानात घेतलस म्हणजे तुला या वचनांच महत्व ध्यानात येईल.

जो मार्ग आज तू उचित समजून, मला, पिताश्री यांची आज्ञा उल्लंघन करायला, सहजी सांगत आहेस, तो त्यांच्या स्वर्ग प्राप्तीच्या मार्गात सर्वात मोठा अडसर ठरेल. त्यांना दीर्घकाळ पर्यंत त्याची शिक्षा भोगावी लागेल आणि परिणामी त्याचं, उत्तरदायित्व आपल्यावर येईन. कालांतराने जेंव्हा, हा देह त्यागून आपण जाऊ, त्यावेळी, त्याच पिताश्री समोर, आपल्याला खाली मान घालून उभ राहावं लागेल. याचा विचार तू केला आहेस का. 

या जगतात परंपरा, नैतिकता, नियम व वचन मोडणं, सर्वात सहज आणि सर्वात सोप्पं आहे. किंबहुना, मी याचं पालन का करू, अशी मायारुप आशंका मनात सहजी निर्माण होऊ शकते. किंवा कमजोर मनाला, ही परंपरा, नैतिकता न पाळण्याचं बळ, अनेक कारणांनी प्राप्त होईल. असे वचन व आज्ञा भंगाचे मार्ग, प्रसंगी तात्पुरत्या स्वरूपात सहज, सुलभ व लाभदायक भासतील सुद्धा. पण तो मायेचा, निर्माण झालेला कोष असेल, हे ध्यानात ठेव. 

हा कोषच, मनाला मोहिनी घालून,अनेक प्रमाद, चुका, उलट व चुकीचं वागायची दुर्बुद्धी देईल. परंतु धर्म, निती व न्याय यांचं कठोर पालन करणारा आत्मतेजी यात अडकणार नाही. कमकुवत मनाला, याची सहजी मोहिनी पडून, आत्म्याच्या अवनतीचा विचार सुद्धा न करता, असा देह, त्या कमकुवत मनाच्या तर्कांना, विनासायास बळी पडून, ते कृत्य करेल, जे करण्याचा विचार निश्चयी, दृढ व सैद्धांतिक आत्मा, कोणत्याही स्थितीत करू धजावणार नाही. 

रघुकुल परंपरेचा विचार केला तर तुला लक्षात येईल की,देह आणि तत्व, यात आपल्या सर्व पूर्वजांनी फक्त आणि फक्त तत्व, वचन व सिद्धांत यांच्यासाठी जगणं आणि प्रसंगी मृत्यूला स्वीकारणं योग्य मानलं. म्हणजे जे इतक्या ज्येष्ठ, श्रेष्ठ बुद्धिमान, राजांनी योग्य मानून, आपल्या देहाला त्यागण योग्य मानलं, त्यांना आपण निंदनीय ठरवत आहोत,हे भरता, तुझ्या ध्यानात कसं काय आलं नाही. 

हे अनुज भरत, याच दिव्य परंपरेनुसार, थोर महाराज दशरथ, माता कैकयी हिला दिलेल्या दोन वरांच्या वचनात बद्ध होते. त्यांनीच स्वतः मातेला तसा शब्द दिला होता की, माता त्या वरांना कधीही प्राप्त करू शकते. महाराज दशरथ, ते वर सिद्ध करण्यास, वचनबद्ध होते. त्यामुळेच त्यांनी दिलेली आज्ञा हा माता कैकयीचा शब्द होता, हा तुझ्या बुद्धीला झालेला मायेचा भ्रम आहे, भरता. 

म्हणूनच तू हे मिथ्या वचन करत आहेस. त्या भ्रमाच्या पट्टया तू तुझ्या बुद्धीवरून काढल्यास तर, तुला दिसेल की, तो मातृहट्ट नव्हता तर पिताश्रीनी, स्वखुशीने, दिलेला शब्द होता. तू भ्रमित मनाने न पाहता, त्याकडे एक वचन आणि त्या वचनाच्या पालनाचं, पिताश्रीनी आपल्यावर सोपवलेलं दायित्व आहे. ज्यावेळी हे तुझ्या लक्षात येईल, त्यावेळी तुझ्या बुद्धीवर पडलेला हा मिथ्या भावनांचा पडदा दूर होईल. म्हणून मी तुला विवेकाने बघण्याचा व विचार करण्याचा मार्ग दाखवतो. 

जमलेले सर्वजण, भरत आणि प्रभू यांच्या संवादाकडे, आशादायक दृष्टीने पहात होता. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
२१/०७/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...