Skip to main content

भोग आणि ईश्वर १३३

भोग आणि ईश्वर  १३३
 
ब्रह्म सत्यं-जगत मिथ्या 

म्हणजेच ब्रम्ह हेच सत्य आहे आणि जग मिथ्या आहे, अस एक शास्त्रवचन आहे. माझं अनुमान आहे की,   कदाचित मिथ्या या शब्दावरून myth अर्थात पुराण काळापासून ऐकिवात असलेल्या कथाकल्पना. त्यावरूनच Mythology हा शब्द आला. म्हणजेच कुठेतरी त्यांच्या Myth या शब्दाचा आधार, आपला संस्कृत शब्द मिथ्या असू शकेल. मुळात मिथ्या या शब्दात ती गोष्ट खरी नाही पण खोटी वा निरर्थक असा भाव प्रकट होतो.

म्हणजेच जे कपोलकल्पित आहे, जे अवास्तव आहे, जे अस्तित्वातच नाही,  ते मिथ्या. आता या सर्वाचा व्यापक अर्थाने जगाशी आणि आपल्या जीवनाशी कसा आणि काय संबंध आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न करूया. एका अणुपासून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती, सृष्टीकर्त्या ब्रह्मदेवाने श्रीमहाविष्णूच्या मनातील संकल्पाने, केली. एका संकल्पात इतकी प्रचंड ऊर्जा,शक्ती सामावलेल्या ईश्वराची प्रत्यक्ष शक्ती, ऊर्जा आणि चेतना किती असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करता येणार नाही.

मुळात अस्तित्वात नाही, पण आपल्याला पृथ्वी या ग्रहावरील वातावरण गुरुत्वाकर्षण या एक प्रकारच्या मायेमुळे, जे घडतंय ते आहे असं दिसतं. म्हणजेच जे समोर आहे ते अस्तित्वात आहे आणि जे दिसत नाही, पण तर्काने सिद्ध करता येतं ते वा ताडता येतं ते देखील आपण सत्य या प्रकारात मांडतो वा मोजतो. म्हणजेच तर्कशास्त्रानुसार आपण मनात त्याचं अस्तित्व मान्य केलं आहे. यातील काही गोष्टींना प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्यांनी आपल्या चरित्रातून आपल्या सत्यवचनी स्वभावाची साक्ष दिली आहे. म्हणून त्यांनी पाहिलेल्या, पण आपण जाणू न शकणाऱ्या अश्या अद्भुत परम शक्तीवर आपण विश्वास ठेवतो. 

काही प्रमाणात त्याची प्रचिती आणि अनुभूती, आपल्याला काही प्रसंगात व काही वेळा, येते. लौकिक अर्थाने त्याला योगायोग, पण पारमार्थिक अर्थाने त्याला योग म्हणतात. म्हणजेच जे दिसत नाही ते अनुमान , तर्क, प्रचिती व श्रेष्ठांचा शब्द या सर्वातून सारांश रूपाने मानतो वा जाणतो. त्याला संज्ञारूप काहीही द्या, पण तो जो कोणी आहे, त्याने काहीजणांना प्रत्यक्षात, तर काही जणांना प्रचिती वा अनुभूती  रुपात साक्ष दिली आहे, असं मानायला जागा आहे किंवा scope आहे. 

त्याच तर्काने देह चालवायला एक चैतन्यशक्ती कार्यरत असते आणि ती सोडून गेल्यावर देह निर्जीव वस्तू बनते. हा देखील एक तर्क. कारण याची प्रचिती आलेला, परत येतच नाही त्याचा अनुभव सांगायला. म्हणजे मृत्यू हे सत्य देह संपल्याचं आणि आत्मा ही प्रचिती देह असताना वा देह निर्जीव झाल्यानंतरचं.

म्हणजेच जिथे आपले नेत्र वा चर्मचक्षु कार्य करतात, तिथे आपण त्या माध्यमातून पाहून बुद्धीने जाणतो. जिथे आपल्या नेत्रांची शक्ती पोचत नाही तिथे, बुद्धीने व बुद्धीला तर्काचा आधार देऊन मान्य करतो, जिथे हे दोन्ही पोचत नाही वा क्षीण होतात तिथे, मन आणि शेवटी अंतरात्मा याद्वारे ते ताडतो आणि मानतो. काहींना आपण, काहींना प्रत्यक्षदर्शी, काहींना शास्त्राधार तर काहींना तर्कशास्त्र ही परिमाणं लावून आपण त्याला, अर्थात सृष्टीच्या मालकाला जाणतो व मानतो.

म्हणजे जिथे मालक आला तिथे सेवक वा दास हा आला. कारण जो मालक नाही तो सेवक वा गैर झाला, आपल्याच व्यावहारिक नियमानुसार. त्यार्थी या सृष्टीचे आपण पाहुणे आहोत. कुठून येतो कुठे जाणार हे माहीत नाही. पण साठ, सत्तर, ऎशी वा शंभर वर्षे इथे आल्या सारखे राहणार मृत्यूचा अर्थात देह संपल्याचा आदेश आला की निघून जाणार.

एक विचार करा की, पाहुणे म्हणून सृष्टीत आलो, देहात आलो, जगात आलो, कुटुंबात आलो, मैत्रीत नात्यात सर्वच ठिकाणी आलो, एक देह मिळाल्यामुळे आणि सर्वकाही देह संपल्यानंतर आपल्यापुरतं तरी संपलेलं असतं. पुढे काय हे अनुमानाने वा तर्काने जाणायचं. म्हणजे समजणं, कळणं, ही बुद्धीची पर्यायाने  देहाची अवस्था आणि स्थिती पण जाणणं ही मन आणि आत्म्याची स्थिती आहे. 

याचाच अजून खोलात आणि पुढे जाऊन विचार करूया उद्या.  तोपर्यंत नाम घ्या आणि ईश्वरस्मरण करत रहा. 
   -------------------------------------------------------------

भोग आणि ईश्वर भाग १ या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे. शंभराच्यावर पुस्तकांची नोंदणी झाली आहे.बाकी तपशिलासाठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. 

गुढीपाडव्याच्या सुमुहूर्तावर  "भोग आणि ईश्वर भाग १(लेख १ ते ७६) " पुस्तक प्रकाशित होऊन विक्रीसाठी उपलब्ध होईल व कुरियर करण्यात येईल. 

सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण प्रकाशनपूर्व पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत गुढीपाडव्यापर्यंतच असेल.  

पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809  वर त्याचा तपशील पाठवावा. 

G Pay no 9049275866

IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale 
A/c No. 0455104000227179
IFSC :  IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201

Phonepay id : 9049275866@ybl

पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले. 
9049353809
9960762179

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...