भोग आणि ईश्वर १४२
असुररूपातील या आपत्तीचा सामना प्रत्येकजण आपापल्या शक्ती व भक्तीवर करत आहेच. यात त्यांच्या त्यांच्या इच्छित देवता, सद्गुरू त्यांना यश देतीलच. परंतु संकट वैश्विक, अनेक पटींनी आणि सूक्ष्म रूपात आहे. त्याचा पसारा आणि प्रभाव संपूर्ण जगतावर आहे. त्याच्या दमनार्थ सर्व स्तरावर प्रयत्न सुरु आहेतच. परंतु त्याची शक्ती व सूक्ष्म स्वरूप पाहता तितकाच व्यापक आणि विस्तारित सामना करणं आवश्यक आहे. प्रयत्न जर एकत्रित आणि जास्त प्रमाणावर होतील, तरच सद्यस्थितीत याचा निःपात होऊ शकेल असं माझं मत आहे.
सद्यस्थिती हि असुरशक्ती प्रभावाने ग्रस्त आहे आणि कलियुगाच्यानीतीप्रमाणे परमेश्वर प्रत्यक्ष अवताररूपाने येऊन, त्या प्रभावाने असुर शक्ती नष्ट वा प्रभावहीन होईल अशी शक्यता सध्यातरी दुरापास्त वाटते. अश्या विचित्र परिस्थितीत ईश्वराचं स्मरण आणि नित्य नामाने हाकारून, त्याला या संकटकाळात पाचारण करून, मदतीची साद घालून, सहाय्यार्थ येण्याची विनवणी करणं आणि या कार्यात सेवाकार्यार्थ जे सक्रिय सहभागी आहेत त्यांना जरुरी सहाय्य मिळावं आणि या संकटावर मदत आणि उपचार याबरोबरच प्रत्यक्ष मदत करू न शकणाऱ्यांना इच्छाशक्तीचं अधिष्ठान प्राप्त व्हावं यासाठी, काही करता आल्यास पाहावं या उद्देशाने वैयक्तिक व सामूहिक स्तरावर काही योगदान देता येईल का याचा विचार आपण करूया.
मुळात हि वैश्विक समस्या आहे आणि ज्ञानोबा माउलींचा विश्वात्मक धर्म आणि कर्म जाणणारं व पाळणारं आपलं राष्ट्र आणि भूमी असल्यामुळे, आपणच काही सकारात्मक करू शकतो. याकरता आपल्या उत्तम सकारात्मक, सात्विक लहरी निर्माण करून त्याच्या प्रभावाने, आपण या सूक्ष्म असुरी शक्तीचा सामना आपापल्या स्तरावर आपण करूया. त्यासाठी मला वाटतं कि, त्वं शक्तित्रयात्मक: या अथर्वशीर्षातील श्लोकात म्हटल्याप्रमाणे त्रय अर्थात तीन शक्ति ईच्छा, ज्ञान व कर्म किंवा कार्य श्री गणेशा ठाई आत्मरुपात रत आहेत, म्हणून अश्या श्रीगणेशास स्मरून त्याचा नित्य जाप करून या संकटकाळात समस्त प्राणिमात्रांची सुटका करावी अशी प्रार्थना, विनवणी करावी.
वास्तविक निर्गुण निराकार परमेश्वराच्या अनेक रूपांची आणि सद्गुरुरूपात प्रकट झालेल्या चैतन्याची आपण उपासना करतो आणि त्यांच्याच उपासनेने आपण, सदर संकटात जरुरी असलेली शक्ती निर्माण करून या संकटाच्या निवारणार्थ एक प्रकारे आत्मयज्ञ करणं क्रमप्राप्त आहे. परंतु प्रत्येकाची उपासना हि भिन्न असल्यामुळे आणि श्रीगणेश हा, परमेश्वराचं विघ्नहर्ता स्वरूप प्रकटन असल्यामुळे, या विघ्नाच्या निवारणार्थ आवश्यक शक्तीलहरी श्रीगणेश या देवतेकरून प्राप्त होतील, असा माझा मानस आहे. म्हणून श्री गणेशाच्या प्रार्थनेप्रीत्यर्थ ओम गंगणपतये नमः या मंत्राचा या काळात विघ्ननिवारणार्थ, आपापल्या वेळेनुसार, पण जास्तीत जास्त काळ, जाप पठण करून विघ्नहर्त्या गजाननाची स्तुती आणि प्रार्थना करावी. जेणेकरून एकाच इष्टदेवतेपर्यंत सर्व इच्छा लहरी पोचतील आणि त्या शक्तींकडून या पृथ्वीतलावर योग्य लहरी पोहोचून त्याद्वारे लवकरात लवकर या विघ्नांचा नाश होऊन सर्व मानवजमात संकटमुक्त व भयमुक्त होईल.
या श्रीरामनवमीनिमित्त श्रीविघ्ननाशकरूपातील श्रीगणेशाच्या नामाचा आपण सर्वांनी जाप करून या संकटात विघ्नहर्त्याचं स्मरण करावं. प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार याचा जप करावा. तरीही त्याला सामूहिक स्वरूप येण्यासाठी एक सुनियोजित वेळ असेल तर, एकत्रित लहरी निर्माण होऊन, त्यांचा परिणाम नक्कीच प्रभावी असेल.
म्हणून सकाळी शुचिर्भूत होऊन, साधारण ६ ते ६१५ किंवा ६३० असा जमेल तितका वेळ एकत्रितपणे ओम गंगणपतये नमः या जपाचं स्मरण, प्रतिदिन पुढील काही दिवस, एका स्थिर जागी बसून , मनात संकल्प योजून, केल्यास त्याचा एकत्रित परिणाम व्हायला वेळ लागणार नाही. अश्या प्रकारचा सामूहिक प्रयत्न केल्यास
लाभ निश्चितच होईल आणि लाभ न झाल्यास हानी निश्चितच होणार नाही.
म्हणून उद्यापासून प्रत्येकाने हा जप सकाळी ६ ते ६१५ किंवा ६३० पर्यंत प्रतिदिन करावा.
आज इथेच थांब. उद्या पुन्हा भेटूच तोपर्यंत नामात रहा आणि चिंतनात रहा , सकारात्मक लहरी नक्कीच आपल्या सोबत असतील.
-------------------------------------------------------------
लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. येत्या शनिवारपासून कुरियर सुरू होईल.
सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.
पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809 वर त्याचा तपशील पाठवावा.
G Pay no 9049275866
IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale
A/c No. 0455104000227179
IFSC : IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201
Phonepay id : 9049275866@ybl
पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२१/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment