भोग आणि ईश्वर १४३
काल म्हटल्याप्रमाणे आपण श्रीगणेशाच्या नामस्मरणाला सुरवात केली असेलच. लवकरच त्यातून निर्माण होणाऱ्या लहरी सामूहिक स्वरूप घेऊन आपल्या इच्छित कार्यार्थ, इष्टदेवतेप्रत पोचतील. आपण आपल्याकडून आज सुरू केलेली श्रीगणेश साधना त्या निहित वेळेत करूया.
नामस्मरण करताना किंवा सुरू करताना अथवा दिवसातील कोणत्याही वेळी पुन्हा करायला घेताना, शुचिर्भूतता अपेक्षित आहे. शुचिर्भूत होणं म्हणजे शरीराने स्वच्छ असणं गृहीत धरलेलं आहेच. म्हणजेच प्रत्येकवेळी स्नानादी कर्म अपेक्षित नाहीत, परंतु किमान हातपाय तोंड म्हणजेच पूर्ण चेहरा, स्वच्छ धुवून बसणं अपेक्षित आहे. किंबहुना ते अत्यंत जरुरी आहे. पूर्वी खूपवेळा असा विचार यायचा की, हातपाय तोंड स्वच्छ धुवून नाम स्मरणच नाही तर कोणतंही नित्य कर्म करावं, असा प्रघात, प्रथा, नियम वा नीतीचा भाग, पूर्वजांनी का केला असेल.
पण आज करोनाच्या काळात संपूर्ण वैद्यकीय व वैज्ञानिक जगताने मान्य केलेला उपाय म्हणजे हातपाय व तोंड स्वच्छ धुवा, वारंवार धुवा, साबण इत्यादी साधनांनी धुवा. म्हणजे करोनासारखा अतिघातक विषाणूसुद्धा आपण फक्त हातपाय व तोंड स्वच्छ धुवून लांब ठेवू शकतो. किती उच्च कोटींची दूरदृष्टी आणि अत्युच्च संशोधन करून, आपल्या त्याकाळा तील शास्त्रज्ञ अर्थात ऋषी मुनींनी ही शास्त्रशुद्ध पद्धती युगानुयुगे या भारतभूमीत रुजवली.
पूर्वीच्या काळी तर, आपण बाहेरून आल्यावर घराबाहेरच स्वच्छ हातपाय तोंड धुवून येणं अपेक्षित होतं. नव्हे तसा हट्टाग्रह केला जायचा आणि शिस्तीचा व अनुशासनाचा तो एक भाग होता. त्यामागे कारणमीमांसा ही केली जायची की, बाहेरची काही बाधा सोबत आली असेल तर, ती बाहेरच्या बाहेर निघून जावी.
पण आज या घातक विषाणूंच्या संसर्गामुळे आणि त्यातून उद्भवलेल्या संकटामुळे फक्त हातपायतोड धुण्यामागच्या कारणातील ती बाहेरची बाधा म्हणजे दुसरं तिसरं काही नसून, हे असले घातक विषाणूच असावेत, हे लक्षात येतं. म्हणजेच विषाणू या बाहेरून येणाऱ्या बाधेवर आपलं संशोधन झालेलं होत आणि त्यांना बाहेरच ठेवण्याचा सर्वात सोप्पा तरीही शास्त्रशुद्ध मार्ग आपणच जगताला दिलाय, जो आज आपण त्यांच्याकडून आल्यामुळे मान्य करतो.
हे विषाणू, हातपाय व तोंड या बाह्यांगी खुल्या अवयवांद्वारे सहजी, शरीरांतर्गत पोचू शकतील ही खात्री, त्या काळातील जाणकार ऋषीमुनीना होती. म्हणूनच शास्त्रवचनांद्वारे त्यांनी तो नित्य नियमांचा भाग बनवून लोकांना त्या बाह्य बाधेची भीती घातली. काळाच्या ओघात काही गोष्टी आपण सोडून, काही नवीन आत्मसात करत गेलो. जसं हॉटेल वा सणसमारंभ यांमध्ये आपण सहज व सर्रास पायात चप्पल बूट इत्यादी घालून जेवतो. जे शास्त्रवचनाच्या विरुद्ध आहे.
करोनामध्ये सर्वात प्रथम स्वच्छतेचं महत्व जागतिक स्तरावरून मान्यच नाही तर अंमलात आणायची आग्रही भूमिका मांडण्यात आली. त्यानंतर टाच आली ती अश्या हॉटेल व समारंभातील जमण्याला. खाद्य घरी मागवा पण हॉटेलात जाण्यावर बंदी आली. म्हणजे घरी मागवून निदान खाताना पाळायची शुचिर्भूतता आपण घरात नक्की पाळू शकतो. आता बाहेरून मागवण्यापेक्षा घरी बनवणं सहजी आणि सोप्प वाटायला लागलं. करोना विषाणूंच्या भीतीने.
दुसरी गोष्ट बाहेरून आल्यावर पूर्वी सरसकट स्नान करण्याची पद्धत गृहीत होती किंवा तो प्रथेचा भाग होता. ती आता आपल्याला पाळावी लागते. त्याचप्रमाणे करोनाआधी सर्व प्रकारचे कपडे पूर्वी धुवायला लगेच टाकले जात होते असं नसायचं. काही कपडे, विशेषतः बाहेरील कपडे त्या त्या घरातील धुण्याच्या वेळेनुसार खुंटीवरून काढून धुवायला टाकले जात. पण तोपर्यंत आपण ते खुंटीवर लावत होतो. ती पद्धती आता बदलली, नव्हे बदलावी लागली. आपण ती बदलून आत्मसात केली. बाहेरून आल्यावर सरळ स्नानगृहात जाऊन स्नान , मग बाकी सर्व, हे आपण करायला लागलो. किमान सर्व कपडे धुवायला टाकून पूर्ण स्वच्छ होण्याची प्रथा रूढ झाली, ती सुद्धा पूर्वीप्रमाणे.
मधल्या साठ सत्तर वा शंभर वर्षांच्या काळात आपल्या विशेषतः भारतीय संस्कृतीतील अनेक प्रथा, गोष्टी बदलल्या. करोनामुळे त्या पुन्हा आपल्याला सुरू कराव्या लागल्या. जसं घरी बसून काम करता येणं किंवा तसं काम होऊ शकतं हा विचार रुजला, मान्य झाला आणि बऱ्याच खात्यांमध्ये म्हणजे डिपार्टमेंटमध्ये लक्षात आलं की, हे काम आधुनिक तंत्रामुळे कुठूनही करता येतं. पूर्वीच्या काळी बरीचशी कामं व व्यवसाय लोक घरात बसून, घरूनच करायचे, विशेषतः बारा बलुतेदार. आपण तेही आत्मसात केलं.
कित्येकांना व्यवसायचं स्वरूप बदलावं लागलं. हाच विषय उद्या पुढे चर्चेत घेऊया. तोपर्यंत नाम घ्या, तेच या संकटात तारून नेईल.
-------------------------------------------------------------
लेख क्रमांक १ ते ६७ यावर आधारित, भोग आणि ईश्वर भाग १ या प्रकाशित झालेल्या पुस्तकाची नोंदणी सुरू आहे, ज्यांनी आगाऊ रक्कम भरून नोंदणी केली आहे त्यांना, पुस्तकं लवकरच वितरित केली जातील. आपली प्रत योग्य वेळी राखून ठेवा, कारण किती प्रति विकल्या जातील याचा अंदाज नसल्यामुळे कमी प्रति छापत आहे.बाकी तपशिला साठी खालील क्रमांकावर संदेश पाठवा किंवा फोन करा. किंवा खालीलप्रमाणे कृती करा. लोकडाऊनमुळे पुस्तकं मिळायला थोडा विलंब होतो आहे. पण पुस्तकं छपाई आणि बांधणीचं काम पूर्ण झालंय, मुखपृष्ठ छपाई बाकी आहे. ती सुद्धा येत्या काही दिवसात होईल आणि लवकरच पुस्तक कुरियर व्हायला सुरुवात होईल.
सदर पुस्तकाची छापील किंमत रु. १५०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल, पण पैसे भरून नोंदणी केल्यास सवलतीची रु. ११०/- अधिक रु. ३०/- पोस्टेज/कुरियर असेल. प्रकाशनपूर्व सवलत रामनवमीपर्यंतच असेल.
पेमेंटसाठी खालीलपैकी कोणत्याही एका मार्गाने आगाऊ रक्कम भरून नोंदणी कन्फर्म करावी. पेमेंट नन्तर व्हाट्सऍप क्रमांक 9049353809 वर त्याचा तपशील पाठवावा.
G Pay no 9049275866
IDBI A/c no
Name of A/c holder: Prajakta P Athavale
A/c No. 0455104000227179
IFSC : IBKL0000455
Branch : Dombivli East
Branch code : 000455
Pincode : 421201
Phonepay id : 9049275866@ybl
पुस्तकाचे लेखक: प्रसन्न आठवले
प्रकाशिका : सौ. प्राजक्ता प्रसन्न आठवले.
9049353809
9960762179
©® विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२२/०४/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
Comments
Post a Comment