Skip to main content

Posts

अध्यात्म विराम १५२

अध्यात्म विराम १५२ मनातील ईश्वरी भक्तीचा भाव स्मरणातून सुरू होतो. स्मरणातून, उच्चारण, त्यातून श्रुती श्रवण, त्याची आवर्तनं, आवर्तनातून अर्चन, अर्चनातून अर्पण, अर्पणा तून शरण, शरणातून दास्यत्व, दस्यत्वातून सख्य असा हा भक्तीचा मनोमय प्रवास, देहाकडून अंतरात्मा आणि त्यातून परमात्मा या स्थानी समाप्त होतो. आता यातील एकेक मुद्द्यावर विचार करूया. एक गोष्ट ध्यानात असूद्या की, ईश्वर देह आणि देहाची स्थिती याबद्दल अनभिज्ञ असतो. किंबहुना कोणाही प्राण्याबद्दल ईश्वर देही न पाहता, मनाच्या स्थितीला पाहतो आणि त्यातून प्राण्याची परीक्षा करतो.  अर्थातच मानवाच्या देहात मनाची स्थापना करून, बुद्धीच्या माध्यमातून त्याला उच्च अधिष्ठान दिलेलं असल्यामुळे, मुख्यत्वे हे सर्व मानवाच्या मनाबाबत आपण बोलत आहोत हे गृहीत धरावं. आपण देहाने केलेले कोणतेही उपचार ईश्वराकडे पोचत नाहीत. कारण ते देहाचे उपचार आहेत आणि मनाचा त्यात सहभाग नसेल तर, ते केवळ एक कर्म आहे. अर्थात त्या कर्माच जे फल, उपाचारपूर्वक प्राप्त होणं गरजेचं आहे, ते नक्की मिळेल. पण कोणत्याही स्वरूपाचं ईश्वरी आराधन हे मनाने आणि मुखतः आत्म्याने घडलेलं असेल तर त...

अध्यात्म विराम १४९

अध्यात्म विराम १४९ सर्वसामान्य मानवी मनाचा हा गुणधर्म आहे की, एखाद्याचे ऋण असतील आणि त्यावर आपल्या जीवनाचा डोलारा उभा असतो, त्या ऋणकर्त्याचे ऋण आपण सहसा विसरत नाही. कृतज्ञ माणसाचं ते लक्षण आहे. आयुष्यात कितीही वर गेला तरीही, कोणताही माणूस, आयुष्यातील अश्या मदतीचे ऋण विसरत नाही, ज्याच्या आधारावर आपण पुढे जातो. आता या आपल्या कृतज्ञता पूर्ण स्वभावाच्या पार्श्वभूमीवर आपणच स्वतः बद्दल हा विचार करावा की, आपल्याला हा देह,मुळात हे श्वासाचं गणितं पुरवून, ज्याने आपल्याला या पृथ्वीतला वर पाठवलं आहे, त्याचे ऋण आपण कधीतरी फेडू शकतो का. तर नाही. बरं तो ईश्वर आपल्याकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता, अश्या अनंत प्रकारचे उपकार करून, आपलं जीवन समृद्ध करतो. पण तरीही जर काही न्यून असेल तर ते आपल्या कर्मातुन आलेलं न्यून आहे. असं असताना सुद्धा आपण, आपल्या कर्माच्या भोगांचा हिस्सा, ज्याचे आपल्यावर आधीच ऋण आहेत, अश्या ईश्वराच्या नावावर टाकून, आपल्या जबाबदारीतून मुक्त होण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करतो.  ईश्वराला सुद्धा हे पाहून खेद वाटतं असेल की, करणार माणसं स्वतः, उपभोग सुख आलं की, आपल्याकडे त्य...

अध्यात्म विराम १५१

अध्यात्म विराम १५१ कालची बोधकथा आपण वाचली. आता त्या अनुषंगाने चिंतन करूया. धर्म, शास्त्र आणि भगवंत स्वतः सांगतात की,नाम कोणत्याही प्रकारे घेतले तरीही,त्याचा परिणाम हा प्राप्त होतो. पण तो इष्ट परिणाम होतो. जरी पोपट पंची म्हणून नाम घेतले तरी, असा याचा अर्थ घ्यायचा का, यावर आता विचार करू. एक मुद्दा स्पष्ट आहे की, कर्म अवधान राखून केलं किंवा अनावधानाने केलं तरीही, ते आपलं फल देणार हा सिद्धांत आहे. पण त्या फळाचा परिणाम आपल्याला कधी प्राप्त होईल, याची शाश्वती नाही. म्हणजे ते आपल्या कर्माच्या धर्मानुसार प्राप्त होईल.  आता कर्माचा धर्म म्हणजे काय. तर त्यामागील भाव भावना किंवा intensions असा याचा अर्थ आहे. म्हणजेच ज्या भावनेने कर्म घडेल, ती भावना हा त्या नामाचा धर्म झाला. त्या धर्माला आपलं फल जोडलं गेेलं. अर्थात त्याची फलप्राप्ती त्या धर्मानुसार होणार. आता विचार करा की, ईश्वराने जे म्हटलंय की, कोणत्याही भावाने नाम घेतलं तरी त्याची प्राप्ती होते. हे भगवत वचन असल्यामुळे, फल प्राप्ती होणार.पण त्या कर्माच्या धर्मानुसार. म्हणजेच आपण चुकून अथवा अनावधानाने एखाद्या व्यक्तीला वाटेत जाताना साद घातली...

अध्यात्म विराम १५०

अध्यात्म विराम १५० आज या लेखमालेला सलग १५० दिवस पूर्ण होत आहेत. याबद्दल श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि माझे समस्त वाचक यांचा मी ऋणी आहे.  सर्वात प्रथम सर्वांना, प्रभू श्रीरामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा!!🚩 श्रीराम जयराम जय जयराम, सियावर रामचंद्र की जय !!. आपल्या विषयात कालच्या भागापासून पुढे जाताना, एक बोधकथा आठवली, आधी ती सांगतो. मग विषयाकडे येऊ.  एका गावात एक कीर्तनकार कीर्तन करत असतं. त्यांचा तो नित्य नेम असे. अश्याच एका कीर्तनानंतर एक सद्गृहस्थ त्यांना शंका विचारायला आले आणि म्हणाले की, महाराज मी कशा प्रकारे नाम घेऊ, ज्यामुळे, ते फळेल आणि मला माझ्या भोग व उपभोग यातून योग्य मार्ग मिळेल. त्यावर बुवांनी त्यांना सांगितल की, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्या शंकेबाबत आपल्याला सविस्तर बोलता येईल. सद्गृहस्थ हो चालेल म्हणताच, बुवांनी एक गोष्ट सांगायला सुरुवात केली.  एका गावात एक विप्रवर रहात होता आणि त्याने एक पोपट पाळला होता. त्या पोपटाला त्याने जय श्रीराम म्हणायला शिकवलं होतं. तो पोपट दिवसभर त्याला पढवल होतं त्यानुसार, रामनामाचा जाप करायचा. एके दिवशी त्या गाव...

अध्यात्म विराम १४८

अध्यात्म विराम १४८ खरतर साधना ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणतीही केली तरी, तीच फल हे प्राप्त होतं. फरक फक्त लागणाऱ्या वेळेचा असतो. तरीही बऱ्याच साधनांमध्ये शुचिर्भूतता, ym नियम इत्यादी बंधनं असल्यामुळे, कलियुगात विशेषतः बदललेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात, ते सर्व साधणं सर्वानाच शक्य नाही. पण परमार्थाचा मार्ग, साधताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे का. तसं नक्कीच नाही. कारण आपण फक्त देश काल आणि सद्य स्थिती इतकचं बघू शकत असलो तरीही, विश्वाचा निर्माता हा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं, त्याने चारही युगात होऊ शकणारी परिस्थिती समजून, जाणून त्याची सोय सुद्धा करूनच नवविधा भक्तीची रचना केली आहे.  आपण या लेखमालेत, त्यातील श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य हे भक्तीचे सात प्रकार विस्ताराने पाहिले.सख्य भक्ती हा आठवा प्रकार पाहताना आपण त्यातील अनेक विषयांना स्पर्श करत इथपर्यंत आलो आहोत. काल. नामस्मरण अर्थात भक्तीचा तिसरा प्रकार किंवा तिसरी पायरी यावर आपण थोडं चिंतन केलं. वास्तविक श्रवण ते दास्य हे भिन्न पणे बघायचे किंवा जाणून घ्यायचे वा आत्मसात करायचे प्रकार नाहीत. तर त्या भक्...

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!!

भाजपा सेना हे दोघे, उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून महा आघाडीला नाचवणार!!  सावरकर यांच्याबद्दल राहुल गांधी यांनी वेळोवेळी काढलेल्या अपमानजनक विधानांबद्दलचा आक्रोश सध्या गाजतो आहे. वास्तविक ही काही पहिलीच वेळ नाही, राहुल गांधी यांनी असे उद्गार काढण्याची. गेल्या तीन वर्षात, विशेषतः महा आघाडीच्या काळात, अनेकदा राहुल गांधी यांनी मुद्दामहून तात्यारावांचा अपमान केला आहे. (मधला विकास हा मुद्दाम गाळलाय. कारण अडीच वर्षात राज्याला अधोगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं शासन राज्याने पाहिलंय. त्यामुळे त्यांच्या नावात विकास शब्द लिहायचं धैर्यच होत नाहीये 😃. म्हणून महा आघाडी).  स्वतः मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी, विधानसभेत आणि बाहेर सुद्धा, आपल्या भाषणात वेळोवेळी ही अगतिकता बोलून दाखवली आहे.कारण ज्यावेळी आघाडी सरकारच्या काळात असे प्रसंग जाणून बुजून गांधी यांच्याकडून, रचले गेले, त्या त्यावेळी, आपली कुचंबणा झाली, हे मुख्यमंत्री यांनी स्वतः जाहीरपणे सांगितले आहे. कदाचित हे त्यावेळी मुद्दामहून सेनेची गोची करण्यासाठी घडवण्यात आलं असावं. पण त्यावेळी सेनेला सत्ता टिकवायची असल्यामुळे, त्यांना मूग ग...

अध्यात्म विराम १४८

अध्यात्म विराम १४८ खरतर साधना ही कोणत्याही प्रकारे किंवा कोणतीही केली तरी, तीच फल हे प्राप्त होतं. फरक फक्त लागणाऱ्या वेळेचा असतो. तरीही बऱ्याच साधनांमध्ये शुचिर्भूतता, ym नियम इत्यादी बंधनं असल्यामुळे, कलियुगात विशेषतः बदललेल्या सांस्कृतिक आणि सामाजिक वातावरणात, ते सर्व साधणं सर्वानाच शक्य नाही. पण परमार्थाचा मार्ग, साधताच येणार नाही, अशी परिस्थिती आहे का. तसं नक्कीच नाही. कारण आपण फक्त देश काल आणि सद्य स्थिती इतकचं बघू शकत असलो तरीही, विश्वाचा निर्माता हा त्रिकाल ज्ञानी असल्यामुळं, त्याने चारही युगात होऊ शकणारी परिस्थिती समजून, जाणून त्याची सोय सुद्धा करूनच नवविधा भक्तीची रचना केली आहे.  आपण या लेखमालेत, त्यातील श्रवण, कीर्तन, स्मरण, पाद सेवन, अर्चन, वंदन, दास्य हे भक्तीचे सात प्रकार विस्ताराने पाहिले.सख्य भक्ती हा आठवा प्रकार पाहताना आपण त्यातील अनेक विषयांना स्पर्श करत इथपर्यंत आलो आहोत. काल. नामस्मरण अर्थात भक्तीचा तिसरा प्रकार किंवा तिसरी पायरी यावर आपण थोडं चिंतन केलं. वास्तविक श्रवण ते दास्य हे भिन्न पणे बघायचे किंवा जाणून घ्यायचे वा आत्मसात करायचे प्रकार नाहीत. तर त्या भक्...