Skip to main content

Posts

यज्ञ

यज्ञ मुळात यज्ञ हा शब्द यज या धातूपासून उत्पन्न झाला. यज म्हणजे पुजणे किंवा संयुक्त होणे किंवा संगतीत येणे, संग जडणे,जोडणे इत्यादी. ज्ञ या शब्दात जाणणे, ज्ञात होणे, जाणीव होणे, उमजणे इत्यादी अर्थ अभिप्रेत होतात. म्हणजेच जाणीवेच्या उत्पत्तीतून, एखाद्या विचाराने संकल्प करून, समिधारुपात इच्छा, आकांक्षा, कर्म, ज्ञान, भक्ती इत्यादी, एकाद्या देवतेच्या चरणी वाहिल्या की तो यज्ञ स्वरूप होतो.  आता यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, एखादी गोष्ट, विचार, कर्म, कृती, उच्चार, आचार आपण जाणीवेतून वा ज्ञात असताना करतो ते ते सर्व यज्ञ आहेत. म्हणजे आपण करत असलेले प्रत्येक कर्म हे, यज्ञाच्या व्याख्येत बसते. म्हणजे आपण बुद्धी, काया, वाचा, मन आणि सर्व कर्मेंद्रिय यांनी केलेली एक न एक कृती ही यज्ञरूप आहे.  पण यज्ञात मुख्य गोष्ट असते ती म्हणजे यज्ञ देवता. इथे आपली कामना, वासना हीच त्या यज्ञातील देवता आहे वा असते. त्या देवतेला समिधा रुपात संकल्प, इच्छा, वासना आणि त्यामागील उद्देश आणि भौतिक स्वरूपा तील पदार्थ वाहून, तिची मनाने प्रार्थना केली जाते. या भोग स्वरूप वाहिलेल्या वस्तूंच्या माध्यमातून, यज्ञ देवतेल...

कृपा वा अवकृपा

कृपा वा अवकृपा खूपवेळा, नव्हे बरेच वेळा आपण हा शब्द सहज वापरतो. पण त्याचा नक्की शाब्दिक अर्थ, तात्विक अर्थ, मतीत अर्थ आणि गहन अर्थ, आपण पूर्ण ध्यानात न घेता, हा शब्द खूप सहज, वापरात आणतो. म्हणून आज या शब्दाचं सखोल चिंतन करूया.  कृपा हा शब्द कृ + अपा या दोन शब्दांची संधी आहे. त्यांचा विग्रह केला तर त्याचे काय अर्थ होतात किंवा त्यातून काय अभिप्रेत होतं, ते जाणून घेऊया. कृ म्हणजे करणे. अर्थात कार्य करणे, कर्म करणे, क्रिया करणे इत्यादी. अपा म्हणजे अभिमान, अहंकार, गर्व, घमेंड इत्यादी. इथे अभिप्रेत असलेला अभिमान हा वृथा अभिमान असा असावा, असं मला वाटतं. कसं ते पुढे बघुया.  आता हे दोन शब्द जोडून, कृपा हा जो शब्द तयार झाला, त्याचा अर्थ कशाप्रकारे घेता येईल, यावर विचार करता, खालील अर्थ ध्यानात येतात. वृथा अभिमान दूर करणे, अहंकार नष्ट करणे, गर्व खाली आणणे किंवा घमेंड दूर करणे.  म्हणजेच एखाद्याने आपल्याला आर्थिक वा अन्य प्रकारचे कोणतेही सहाय्य केले, तर कृपा झाली का. कारण, अश्या मदतीत, आपण त्याच्या उपकारात बद्ध होतो. म्हणजे एखाद्या न्युन भावात आपण जखडले जातो.  जरी यदा कदाचित भविष...

भोग आणि ईश्वर ६२५

भोग आणि ईश्वर ६२५     वास्तविक प्रत्येक मनाला एकाग्र करून, अंतिम उद्देशा साठी तयार केल्यानंतर, त्या शांत झालेल्या मनाला, साधनेचा परिसस्पर्श देऊन, त्या एकमात्र ईश्वरी नामाला स्मरण्याची पायरी गाठली की, सर्व उद्देशांची पूर्तता झालीच असं म्हणता येईल. पण... आणि हा पणच, हे उद्देश आणि आपला निर्धार, यामधील मुख्य अडथळा होतो. कारण मनाची एकाग्रता साधण्यासाठी, अनेक खटपटी लटपटी करूनही, मन कोणत्या गोष्टीने, भरकटेल आणि व्यर्थ कर्मात, धर्मात अडकून, प्रवाह सोडेल, हे ईश्वराच्या हातात सुद्धा नाही.  ही गोष्ट वा गुह्य प्रत्यक्ष ईश्वर जाणूनही, बदलू शकत नाही. कारण त्यासाठी लागणारी, एकाग्रतेची ऊर्जा, शक्ती, तेज आणि ओज हे मानवी मनाला प्रदान केल्यानंतर, ईश्वराने स्वतःला, त्या सर्वांपासून अलग केलेलं आहे. हे सर्वात मोठं गुह्य आहे. ईश्वराचा त्यातील सहभाग, मानवी मनाने त्याला अंतरात्म्या पासून साद घातली तरच, घडून येऊ शकतो.  त्यामुळे मनाचा इश्वराशी संवाद साधण्यासाठी, मनाला एकाग्र आणि शांत करून, तयार करणं, ही यातील प्राथमिक आवश्यकता आहे आणि हाच सर्व साधनांचा प्राण आहे. जर हे एकदा साधलं आणि मनाला या...

भोग आणि ईश्वर ६२४

भोग आणि ईश्वर ६२४     काल आपण पाहिल्याप्रमाणे, मनाला शांत किंवा एकाग्र होण्यासाठी, कुठल्यातरी नादाचा, कल्पनेचा, स्वर सुर यांचा, आनंदात घालवलेल्या क्षणांचा, अश्या कुठल्यातरी माध्यमाचा धागा पकडावा लागतो. हे मानसशास्त्र सुद्धा सांगतं आणि धर्मशास्त्र सुद्धा सांगतं. यामध्ये एकाग्र होण्यासाठी हा शब्द मुद्दाम वापरला, कारण सुरवातीला, आपल्याला मनाला कुठेतरी गुंतवून शांततेचा आणि एकाग्रतेचा अनुभव द्यावा लागतो. म्हणजे एकदातरी या अनुभवाची गोडी घडवावी किंवा व्हावी लागते. तरच मनाला, त्याचा आस्वाद जाणवतो आणि मन ती शांतता आणि एकाग्रता यांत,स्वतःला गुंतवून घेण्यासाठी सिद्ध किंवा तयार होतं. ही जाणिवेची जागृती, हाच जगतातील सर्व साधनांचा उद्देश आणि आत्मा आहे. नवविधा भक्तीचा, कर्मकांडाचा, ज्ञान, वैराग्य, सन्यास इत्यादी सर्व मार्गांचा, अंततः उद्देश मनाला त्या गोडीपर्यंत घेऊन जाणं हाच आहे. हेच अध्यात्मिक ज्ञानाचं सर्वात मोठं गुह्य आणि सार आहे.  एकदा माणसाच्या मनाला, याची गोडी, स्वाद, आस्वाद यांचा अनुभव आला की, मनच आपोआप त्याच्या प्राप्ती साठी मार्ग शोधून काढण्याचा प्रयत्न करतं. अशांत, अस्वस्थ, ...

भोग आणि ईश्वर ६२३

भोग आणि ईश्वर ६२३     कालचा विषय पुढे नेऊया.   या संपूर्ण विश्वाचा आधार असलेला विश्वात्मा, नेहमी शांततेत रत असतो. कारण मन प्रगाढ शांततेत असताना, मन खऱ्या अर्थाने आनंद अनुभवतं. म्हणजे एरवी त्याला अनुभवास येणारा आनंद हा प्रसंगानुसार येणारा असतो. वास्तविक अर्थाने तो खरा आणि नित्य अनुभव किंवा आस्वाद नाही. खरंतर आस्वाद हा एखाद्या गोष्टीची चव चाखली की वापरला जाणारा शब्द आहे.  तो शब्द इथे कसा वापरता येईल, असा एक सहज प्रश्न मनात येऊ शकतो. पण आपण तेही जाणून पुढे जाऊ. आस्वाद हा एकप्रकारचा अनुभव असतो. सहसा चवीसाठी वापरतो. पण कोणत्याही गोष्टीचा अनुभव जेंव्हा जिव्हे व्यतिरिक्त मन घेतं, तेंव्हा तोही एक प्रकारचा आस्वादच असतो. आस्वाद घेणं ही एखाद्या पदार्थाचा गंध आल्यानंतर मनात, त्याबद्दल इच्छा जागृत झाल्यानंतर घडणारी कृती आहे.  तर असा आस्वाद शांततेचा घेण्यासाठी मनात तशी इच्छा जागृत होणं महत्वाचं आहे. यासाठी आपलाच एखादा अनुभव आठवावा. उदाहरणार्थ, आपण कधीतरी एखाद्या थंड हवेच्या स्थळी, किंवा आपल्या आवडत्या गावी जातो. तिथे आपण एक वेगळाच आनंद अनुभवतो. तो वास्तविक अनुभव असतो. प...

भोग आणि ईश्वर ६२२

भोग आणि ईश्वर ६२२     कालचा विषय पुढे नेऊया. पण खरच असं connect करता किंवा होता येतं का आणि यासाठी काय, कसे प्रयत्न करावेत, कोणत्या घटकांची जाणीवपूर्वक मशागत मनात करावी व कोणते तण काढून टाकावेत, यावर आजच्या भागात चर्चा करूया.   मुळात मनाला असं connect किंवा dosconnect करता येतं, हीच बऱ्याच जणांसाठी आश्चर्याची गोष्ट आहे. कारण देहाच्या वेष्टनात, नसानसात भरून राहिलेलं मन, ज्ञानेंद्रियांच्या समक्ष, साक्षीने वा समोर घडणाऱ्या घटनांच्या प्रभावापासून अलग किंवा aloof ठेवता येणं ही एक तपश्चर्या आहे. तपश्चर्या यासाठी की, तसं स्वतःच्या मनाला देहापासून विलग करता येण्यासाठी मनाला काही शिस्त किंवा सवय करावी किंवा एकप्रकारची विशिष्ट वागणूक द्यावी लागते.  यासाठी मनाला एकतर शांत, आजूबाजूच्या कोणत्याही घटनेपासून separate करता येण्याची लावण्यासाठी, सर्वात प्रथम, अतिचंचल, शीघ्र दोलायमान होण्यापासून परावृत्त करता येण्याचा अभ्यास करता आला पाहिजे. याचं एक शास्त्र आहे. या प्रक्रियेत सर्वात आधी मनाला शांत करण्याचा अभ्यास करावा लागतो.  यासाठी योग, ध्यान, नामस्मरण इत्यादी माध्यमातून ...

भोग आणि ईश्वर ६२१

भोग आणि ईश्वर ६२१    श्रावणात सुरू झालेला उत्साहाचा झरा, पुढे गणपतीला एका छोट्या नदीचं रूप धारण करतो. मधले पक्षातले पंधरा दिवस, जरा त्या नदीला वळणं लावण्यात जातात. त्यानंतर नवरात्रात, उत्साहाची तीच छोटी नदी, एका मोठ्या विस्तीर्ण नदीचा आकार धारण करते.  नवरात्रातील या पूर्णस्वरुप नदीच्या पात्रातील उत्साह, संपूर्ण मन:क्षेत्र व्यापून टाकण्यासाठी, वाहायला सुरुवात होते. साधारण दसऱ्याला, मनाचा हा उत्साह, मनाचं हे स्वास्थ्यरुप तेजोवलय, मनातील अनेक निरुत्साही, निराशाग्रस्त, नकारात्मक वलयाना, लहरींना, नष्ट करून, शुद्ध, सकारात्मक, उत्साहित लहरी व वलयात परावर्तित वा रूपांतरित करतो.  इथून, म्हणजे दसऱ्यापासून या उत्साहाच्या प्रचंड जलाशयाची वाटचाल, दिवाळी नामक महाप्रचंड महासागराकडे सुरू झालेली असते. मनाला पंचगुणीत, शतगुणीत, सहस्त्रगुणीत आनंदी आणि उत्साही करण्याच्या मार्गातील, हा दसरा हा खूप महत्वाचा आणि उत्साहाचा प्रारंभ दिन आहे.  म्हणूनच, या दिवशी, उत्साहाच्या या महासागराकडे नेणाऱ्या, आनंदाच्या विस्तीर्ण जलाशयातील काही भाग, आपण आपल्या मनाला मिळवून देण्याचा प्रयत्न करावा. यास...