Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ६९

भोग आणि ईश्वर  ६९    नामाचा विचार करताना कोणतं नाम घ्यावं हा एक प्रश्न मनात कायम सर्वप्रथम उभा राहतो. यावर शास्त्रवचन असं आहे की ll सर्वदेव नमस्कारं केशवं प्रतिगाच्छती ll अर्थात सर्व देवां मधील कोणत्याही देवाला केलेला नमस्कार हा अंती केशव अर्थात भगवान श्रीमहाविष्णू यांनाच पोचतो. अर्थात ज्याप्रमाणे सर्व सरिता अंती सागरालाच प्राप्त होतात त्यानुसार. याचा खोलवर विचार करणं गरजेचं आहे. शास्त्रानुसार सकाळी शुचिर्भूत झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य देतात. ते जलात उभं राहून दिल्यास सुयोग्य असं शास्त्र सांगतं. म्हणजे जे नदीकिनारी राहतात त्यांनी अर्घ्य नदीत आणि समुद्राच्या परिसरात राहतात त्यांनी ते समुद्रात उभं राहून सूर्यदेवाकडे तोंड करून अर्घ्य  द्यावं असं शास्त्र आहे. स्नानसंध्यादिक विधींमधील तो एक विधी आहे. यात मुख्य संकल्पना ही या विश्वाला ऊर्जा, चेतना देणाऱ्या व धनधान्य, वृक्ष, वन, पानंफुलं इत्यादींसह समस्त जीवसृष्टीच्या जगण्याला जीव अर्थात अर्थ व श्वास प्रदान करणाऱ्या  निसर्गराजावर कृपावंत असलेल्या सूर्यदेवाला वंदन करून चराचरावर सूर्यदेवाच्या असणाऱ्या अनंत उपकारांबद्द...

भोग आणि ईश्वर ६८

भोग आणि ईश्वर  ६८    नाम घेताना फक्त नामाचाच विचार करावा, इतर कोणताही विचार येणार नाही हे कटाक्षाने पाहिलं पाहिजे. पण हे कटाक्षाने म्हणजे कसं हा एक महत्वाचा मुद्दा आहे. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण ज्यावेळी एखाद्या अश्या गोष्टीवर मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी मनातील विषय व वासना किंवा अश्या सर्व गोष्टी, आठवणी, चिंता, काळज्या या दरवेळी डोकं वर काढतात. याउलट ज्यावेळी मन वासनेत रममाण असतं त्यावेळी ते इतर कोणत्याही गोष्टी मार्गात वा मनात येऊ देऊ इच्छित नाही. हाच धागा वा तत्व आपण जाणीवपूर्वक नाम घेताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे.  याचं कारण म्हणजे या सर्व विषय, वासना, आठवणी या ऊर्जा आहेत, म्हणून ज्या ज्यावेळी नामाची, एकाग्रतेची, साधनेची आंच त्यांना लागते, सर्वात प्रथम त्याच गोष्टी वर येऊन त्रास द्यायला सुरुवात करतात. कारण त्यांना हे अविषयी होऊन अध्यात्मिक मार्गाने जाणारं मन, बुद्धी व आत्मा एकमार्गी होताना पाहून भयंकर त्रास होतो.  कारण अनेक जन्म ते आत्म्यासह मनोमयकोषात फिरत असतात आणि अशी अनेक जन्मांची साथ ते सोडायला सहसा तयार होत नाहीत. त्यात अशुद्ध व ताम...

भोग आणि ईश्वर ६७

भोग आणि ईश्वर  ६७    शास्त्रीय दृष्टिकोनातून नाम, त्याच्यासाठी काळजी हे सर्व आपण पाहिलं. आता जरा नाम काय व कसं घ्यावं, याचापण विचार करूया. नाम काय घ्यावं यावर अनेक संतांनी, सद्गुरूंनी सांगून कृपा करून ठेवली आहेच. नाम हे ईश्वराच्या रुपाचं प्रतीक, प्रतिनिधित्व आणि प्रतिबिंबस्वरूप आहे हे मुळात लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट "सर्वदेव नमस्कारम केशवं प्रतिगच्छती" या श्लोकाप्रमाणे कोणत्याही नामाचा उच्चार करून आपण नाम घेतलं आणि त्या त्या इष्टदेवतेला स्मरून केलं,  तरी सर्व सरिता जश्या सागरालाच येऊन मिळतात त्याप्रमाणे कोणतंही नाम घेतलं तरी ते सरतेशेवटी केशव अर्थात विश्वचालक भगवान विष्णू यांच्यापाशी येऊन पोचतंच. म्हणून कोणतंही नाम घ्या आणि त्या देवाचं स्मरण करून नामजप करा तो त्या त्या इष्टदेवतेमार्फत जगतपालक महाविष्णू यांनाच पोचणार.  एखाद्या कार्यालयात ज्याप्रमाणे कोणत्याही खात्याच्या प्रमुखाला आपण पत्र लिहिलं तरी शेवटी त्यावर कार्यवाही करताना कंपनी वा खात्याचे प्रमुख, सर्वोच्च प्रमुखांना त्याबाबत माहिती देणारच, त्याप्रमाणे सर्व वा त्या त्या नामाच्या देवांमार्फत आपल्या नामाची पो...

भोग आणि ईश्वर ६६

भोग आणि ईश्वर  ६६ भगवंताच्या आशीर्वच लहरी प्राप्त होणं हा मुळात भाग्य योगाचा भाग आहे. मुळातून नाम घ्यावंसं वाटणं हीच खूप आनंददायी गोष्ट आहे, जिवाकरता आणि अंतरात्म्या करता. म्हणून सुरवात करून यात नेटाने पुढे जाणं हे खूप महत्वाचं आहे. लहरीस्वरूपात मनाच्या सकारात्मक इच्छामध्ये, नामाचा नादमय आल्हाददायक आनंद, मिसळून आपण ज्यावेळी या देहातून बाहेर सोडतो, किंवा आपल्याकडून ज्यावेळी हे होत असतं, त्यावेळी त्याच्या प्रसारणाने आजूबाजूचं वातावरण गंधित आणि भारावलेलं व्हायला सुरुवात होते. याचा परिणाम म्हणजे सकारात्मक लहरींचा संचार वाढून नकारात्मक लहरी व शक्ती यांचा परिणाम व प्रसार कमी व्हायला मदत होते. ज्या घरात नामस्मरणाचा जागर नित्य आहे वा असतो, त्या घरात गेल्यावर शुद्ध, सात्विक चैतन्य शक्तीचा अनुभव आपल्याला जाणवतो. त्या ठिकाणी समदृष्टी, समाधान आणि शांती नित्य वास करून असते.  भौतिक शास्त्राच्या नियमानुसार गुरुत्वाकर्षणातील ऋणभारित ऊर्जाकण अर्थात निगेटिव्ह एनर्जी पार्टीकल्स , हे, आपण नाम अथवा कोणत्याही अनुष्ठान वा साधना याद्वारे तयार करत असलेल्या धनभारीत ऊर्जाकणांच्या समप्रमाणात निर्माण होऊन...

भोग आणि ईश्वर ६५

भोग आणि ईश्वर  ६५  या विश्वात अनेक प्रकारच्या लहरी संचार करत असतात. प्रत्येकाचा प्रत्येक विचार, इच्छा, शब्द  एक तरंग होऊन या आसमंतात लहरीस्वरूपात फेकला जातो आणि त्या लहरींच्या शक्तीप्रमाणे आपल्याला फलस्वरूपाची  प्राप्ती होते. त्याचप्रमाणे परमेश्वरी आशीर्वाद हेसुद्धा या जगतात नव्हे पूर्ण ब्रह्मांडात अनंत काळापासून अनंत काळापर्यंत विहरत असतात.  ज्यावेळी आपले विचार, कर्म व शब्दतरंग या परमेश्वरी तरंगांशी संयोग पावतात, त्यावेळी आपल्याला इच्छित फलप्राप्तीचा अनुभव येतो. अश्या संयोगालाच आपण परमेश्वरी आशीर्वाद प्राप्ती म्हणतो.  परमेश्वर वा या जगताची निर्मितीशक्ती मुळात कोणालाही नकारात्मक लहरी वा संदेश वा तरंग पाठवत नाही. परमेश्वरी हृदयातून फक्त आनंद, समाधान, जगताचं कल्याण, जगताच्या सुखाची सदिच्छा हेच जगतासाठी आसमंतात वा ब्रह्मांडात लहरीस्वरूपात परावर्तित होतं. आपण ते प्राप्त करायला समर्थ असतो वा असमर्थ असतो. ही समर्थता वा असमर्थता आपल्याच कर्मातून वा कृतीतून ठरते.  वर्गात शिक्षक शिकवतात ते पूर्ण वर्गासाठीच असतं. ज्यांचं लक्ष आहे वा ज्यांनी त्यासाठी एकाग्रता साध...

भोग आणि ईश्वर ६४

भोग आणि ईश्वर  ६४ ब्राह्ममुहूर्ताला किंवा सकाळी लवकर उठून नामस्मरण वा मन व बुद्धीशी निगडित कोणतही कार्य केल्यास ते उत्तम परिणाम देणारे ठरते, हे काल आपण पाहिले. त्यावेळी घेतलेल्या नामामय लहरी या अधिक परिणामकारक असतात, मनाला व अंतरात्म्याला अलौकिक आनंद देणाऱ्या असतात आणि त्या नादाचा व लहरींचा वास्तूवरसुद्धा सकारात्मक व सुख कारक परिणाम होतो. लहरींचा इच्छित परिणाम होतो. आता या नादमय नामलहरी जितक्या शक्तिशाली तितक्याच त्या अधिक प्रभावशाली असतात, मग ते नामजप असो वा नामसंकीर्तन असो. दोन्हीमध्ये तल्लीनता, तन्मयता व त्या नादात, मन किती एकाग्र होऊन, आपल्या आराध्याच्या भक्तीत लीन झालं आहे, हे महत्वाचं आहे. नामसंकीर्तनात भगवंताच्या नामाला एका विशिष्ट लयीत, नादात, सुरात घेऊन, त्याचा संगीतमय आविष्कार करून ईश्वराला भजलं जातं. संगीत हे सर्वात प्रथम कानांवाटे हृदयात पोहोचतं. नाम हे फक्त त्या नामचं उच्चारण असतं, जे मोठ्याने असेल वा मनातल्या मनात असेल. नामसंकीर्तनात, त्या नामचं सुरात व तालात उच्चारण केलं जातं. ज्यामध्ये ताल हा लहरीचं काम करतो आणि मन त्या नादात, त्या तालात आणि त्या लहरींवर हरवून जातं....

भोग आणि ईश्वर ६३

भोग आणि ईश्वर  ६३  आज एक प्रश्न आला की नाम घ्यावं की नामसंकीर्तन.  नामसंकीर्तन हे नामच आहे पण नामरूप भक्तीचं काव्यात्म उच्चारण आहे, ते नामच आहे. नामसंकीर्तन म्हणजे कीर्तन वा संगीत यांसह भगवंताच्या नामाचा आनंद घेणे. त्यात एक नादमाधुर्य आहे आणि त्यातील तल्लीनता निश्चित छान असते आणि एकाग्रता नक्कीच उपयुक्त असते. परिणाम दोन्हींचा एकच आहे. पण सर्वांना संकीर्तन सर्वकाळ ते जमू शकेल असं नाही म्हणून नाम हे उत्तम कारण ते एकांतात सुद्धा साधता येते. नामसंकीर्तन हे जमेल असं नाही. यावर थोडं विस्ताराने विचार करू. पण एखाद्याला नाम संकीर्तन वा अभंगरूपात साधत असेल आणि जमत असेल तर करण्यास काहीच हरकत नाही. मार्ग थोडासा भिन्न आहे, पण परिणाम आणि एकाग्रता तीच, उपयोग तोच आहे. मुळात कीर्तनाला परंपरा ही नारदांपासून सुरू होते, असा पुराणात उल्लेख आहे,  म्हणजेच कीर्तन या परमेश्वर स्तुतीचे आद्यप्रवर्तक हे स्वतः देवर्षी नारद आहेत. नाम हा परमेश्वराला भजण्याचा एक प्रशस्त, पण सहजसोप्पा मार्ग आहे. एखाद्याला प्रेमाने, भक्तीने, तल्लीन होऊन आळवणे म्हणजेच  नाम घेणे. परमेश्वराला भक्तीरुप साद घालणे, त्...