मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ५ || श्रीगणेशाय नमः || || श्रीराम जयराम उय जयराम || भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१|| महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें | सौख्यकारी दु:खहारी, धूर्त वैष्णवगायका ||२|| रामदूता या नामाभिधानात मारुतीचं एक रूप, दास्यत्वाची प्रचिती दिल्यानन्तर समर्थ त्याच्या शक्तीचं प्रत्यंतर देणारं आणि मरुताचं प्रलयंकारी स्वरूप हनुमंतात प्रकट करणारं नाम वा स्वरूपविशेषण सांगून पहिल्या श्लोकाची समाप्ती करतात. वाऱ्याच्या प्रलयंकारी वादळी वावटळी रुपाला प्रभंजन म्हणतात. प्रभंजन म्हणजे वादळाचं विराट रुप. भंजन म्हणजे नष्ट करणं. प्र भंजन म्हणजे प्रलयंकारी भंजन. या हनुमंताच्या स्वरूपात वा गुणविशेषात मारुतीची प्रत्यक्ष शक्ती किती असामान्य आहे याचा प्रत्यय समर्थांना द्यायचा आहे. कारण मुळातच हे स्तोत्र मारुतीच्या शक्तीस्वरूपाचा उपयोग समाजाला समजावा या उद्देशाने लिहिलं आहे. हेदेखील सांगायचं आहे की, अश्या स्वरूपाला थांबवण्याची शक्ती जगतात कोणतंही नाही. वनारीचा एक अर्थ इथे सांगतो जो एका वाचकांनी लिहिला होता, प्रस्तुत श्लोकात तो अर्थ अभि...