Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ३

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ३

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम उय जयराम ||

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या हे स्तोत्र समर्थानी हनुमंताला साद घालत, हनुमंताची स्तुती करत समाजातील व्यक्तींना व सामूहिक अर्थाने समाजाला, हनुमंताने त्याच्या शक्ती, भक्ती, युक्ती, दास्यत्व यांची प्रचिती देऊन धर्माची ध्वजा पुन्हा दृढ करण्याचं आवाहन केलंय. याची साक्ष आपल्याला सुरवातीच्या श्लोकातील दोन ओळीत मिळते. 
कशी ते पाहू. सहसा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल  बोलताना त्याव्यक्तीच्या नावाचा उल्लेख करून काही सांगतो. जसं आमचा केशव असा आहे, आमचा केशव हे करतो इत्यादी. 

परंतु ज्यावेळी प्रत्यक्ष त्या व्यक्तीशी बोलतो तेंव्हा बोलण्याच्या दोन पद्धती असतात एक केशव काय करतोस ,केशव हे एवढं काम करशील का. परंतु अत्यंत आस्थेने, प्रेमाने, स्नेहपूर्ण भावात ज्यावेळी साद घालतो त्यावेळी अरे केशवा अरे माधवा अस संबोधतो. हा शेवटचा आ जो असतो तो आर्जवाचा आ असतो. करुणेने मारलेली साद असते. 

असेच तीन शब्द समर्थानी पहिल्या दोन ओळीत वापरलेत. वास्तविक मारुती देवतुल्य व्यक्तित्व असल्यामुळे साद घालताना आदरार्थी शब्दप्रयोग करायला हवा होता. पण जेव्हा देवालासुद्धा आर्ततेने साद घालताना समर्थ म्हणतात हे महारुद्रा, हे अंजनीसुता, हे रामदूता. हा आर्जव ही काकुळतीला येऊन वदणे अतीव भक्ती, अतीव स्नेह, अतीव जिव्हाळा यांचं लक्षण आहे. हा स्नेह, ही करुणामय साद घालताना समर्थांच्या मनात कोटी कोटी जनांच्या भल्याचा, धर्माच्या ध्वजाचा, सनातन संकल्पनेच्या अस्तित्वाचा जिव्हाळा आणि करोडोंची चिंता वाहणाऱ्या मातेची ममता जाणवते.

कारण समर्थांना स्वतःला काहीही मिळवायचं नव्हतं. तर मग त्यांना इतक्या करुणेने साद घालायची जरुरी नव्हती. परंतु समाजाची, धर्माची, राष्ट्राची, या देवभूमीची चिंता फक्त आणि फक्त संतसज्जनच करू शकतात. कारण त्याबद्दलची दृष्टी  त्यांना देऊनच पृथ्वीवर धाडलेलं असतं. विश्वाची माता असलेल्या भगवंतांना, आपली सर्व लेकरे योग्य मार्गाने आत्म्याचा विकास साधत जन्ममृत्युच्या फेऱ्यात न अडकता मुक्तीच्या मार्गाने जावीत ही त्यामागे इच्छा असते आणि तसे अडकलेले जनसामान्य पाहिले की मातेचं हृदय असलेला ईश्वर नक्कीच दुःखी होत असेल. म्हणूनच ही संतसज्जनांची व्यवस्था. 

ध्यानस्थ, समाधिस्थ आणि मनाची, आत्म्याची साद ऐकणाऱ्या व जाणणाऱ्या हनुमंताला साद घालून त्याची स्तुती करून त्याला त्याच्या विविध नामांनी, विशेषणांनी संबोधून समर्थ त्याला आवाहन करत आहेत, अर्चना करत आहेत की हे भीमरूपी ,महाकायरुपी हनुमंता. महाकायरुपात समस्त विश्वाला कवेत घेण्याची क्षमता आणि अनंत शक्तीची प्रचिती समर्थ प्रस्तुत करतात. 

हे महारुद्रा. रुद्र अर्थात शिवशंकर यांच्या अकरा अंशात्मक प्रकटिकरणातील अत्यंत बलिष्ठ, काहीही अशक्य नसलेलं रूप म्हणजे मारुती. रुद्राची अचाट अफाट शक्ती , विराटता अतर्क्य शक्ती प्राप्त असलेला हनुमंत. त्याला साद घालताना एका अर्थाने समर्थ रुद्राच्या प्रलयंकारी शक्तीला आव्हानीत करत आहेत. वज्रहनुमान. वज्र हे देवेंद्राचं अस्त्र. ज्याची तोड जगात फक्त रुद्र आणि महाविष्णू यांच्यापाशी आहे.  अर्थात म्हणूनच जन्मतः सूर्याला गिळायला उड्डाण करून निघालेल्या बाल मारुतीला देवेंद्राने जगत रक्षणार्थ वज्र फेकून मारलं. 

इतक्या प्रबळ अस्त्राच्या प्रभावाने बाल मारुतीच्या हनुवटीला, ते अस्त्र आदळून, मारुतीच्या हनुवटीला आघाताने बाक आला आणि बालमारुती त्या धक्क्याने पृथ्वीवर कोसळला. वास्तविक वज्राहून बलिष्ठ मारुतीने वज्राचा आघात आपल्या हनुवटीवर झेलून देवेंद्राच्या वज्राचा एकप्रकारे मान राखला. अन्यथा वज्रप्रहराने काहीही झालं नसतं तर एकप्रकारे तो इंद्राचा अवमान ठरला असता.  म्हणून हनुमान आणि मंत म्हणजे सन्मान दिला जातो तो. सुमंत, सामंत. 

क्रमशः भाग ३ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०४/११/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...