Skip to main content

Posts

गोग्रासवाडी (डोंबिवली) ४

गोग्रासवाडी (डोंबिवली) ४ गोग्रासवाडीचा मला माहीत असलेला अर्थ हा की, लोकमान्य (पूर्ण नाव लक्षात नाही) संस्थेने ही जमीन तिथे असलेल्या गायींना चरायला, कुरण वा चारा, म्हणून व...

गोग्रासवाडी (डोंबिवली) २

गोग्रासवाडी (डोंबिवली) २ याच श्रीकृष्णाच्या देवळात कृष्णाजन्माचा उत्सव किती छान होत असे. अजून आठवतोय. त्यावेळी गोपाळकृष्णाचं रूप अगदी नजर लागेल असे असायचं. त्याचे कपड...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १

गोग्रासवाडी (डोंबिवली) १ जुनी डोंबिवली या माझ्या लेखमालेत आज माझं लहानपण जिथे गेलं त्या गोग्रासवाडीबद्दल वयाची पहिली २० वर्ष जिथे काढली म्हणजेच लहानपणाच्या सर्व आठवण...

गोग्रासवाडी (डोंबिवली) ३

गोग्रासवाडी (डोंबिवली) ३ गेले ते दिन गेले ................... खरच त्या गत काळाच्या आठवणींचा पडदा दूर होतो आणि लहानपणी जगलेलं, अनुभवलेलं विश्व अजून मनोहारी होऊन समोर येत. पुन्हा जाऊ आठवणी...

जानकी पुनःवनवास १०१

ll ॐ गंगणपतये ll जानकी पुनःवनवास १०१  हे लक्ष्मणा एवढे सांगून आणि आपल्या पुत्र व परिवाराचे सांत्वन करून राजा नृग तयार करण्यात आलेल्या गुहेत शाप भोगण्यासाठी प्रस्थान करता झाला. या कथनानंतर लक्ष्मणा तुला अजून काही ऐकायचे असेल तर अशीच एक रोचक कथा मी तुला सांगू इच्छितो. " यावर लक्ष्मण त्वरित उत्तर देता झाला. "हे नरश्रेष्ठ राजा आता आपण ऐकवली ती कथा अद्भुत आहेच पण राजधर्माचे पालन राजाने न केल्यास काय होऊ शकते याचे उत्तम उदाहरण देखील आहे. म्हणून हे राजन मला अश्या धर्मोपदेशक कथा ऐकायला नक्की रुची येईल. किंबहुना अश्याच धर्मपरायण संस्कारी कथा कितीही ऐकल्या तरी मन भरत नाही. त्यामुळे अजून एखादी कथा आपण जर सांगणार असाल तर मला ती ऐकायला नक्कीच आवडेल. " लक्ष्मणाचे हे बोल ऐकल्यावर प्रभू श्रीराम पुढे सांगू लागले. "हे लक्ष्मणा आपलेच पूर्वज महान राजा ईक्षवाक, ज्यांच्या नावाने हा वंश सुरु आहे त्यांचा  बारावा  पुत्र ज्याचे नाव राजा निमी होते ते अत्यंत पराक्रमी आणि धर्मनिष्ठ होते. याच राजा निमी यांनी महान तपस्वी गौतम ऋषींच्या आश्रमाजवळ , देवलोकासम , किंबहुना त्याहून अद्भुत अश...

ज्ञानयोग ३

llश्रीगणेशाय नमःll ज्ञानोबा माऊली तुकारामllश्रीगुरुवे नमःll ज्ञानयोग ३  अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान कळो आले  तुझा तूंचि भाव तुझा तूंचि देह फिटला संदेह अन्य तत...

ज्ञानयोग २

llश्रीगणेशाय नमःll ज्ञानोबा माऊली तुकारामllश्रीगुरुवे नमःll ज्ञानयोग २  अरे अरे ज्ञाना झालासी पावन तुझे तुज ध्यान कळो आले  तुझा तूंचि भाव तुझा तूंचि देह फिटला संदेह अन्य तत्वे प्रारंभाचा म्हणजेच आद्यपूजेचा अग्रकर्ता श्रीगणेश आणि शब्दमाउली देवी शारदा यांना चरणस्पर्श करून आपण विषयाला सुरवात करूया.  माऊलींच्या या ओवीचा अथवा या अभंगाचा अर्थ गहन आणि अनेकार्थी आहे. प्रथमतः ह्यात त्यांच्या स्वतःच्या मनातील वा चित्तातील बदलाचा माग त्यांनी घेतलाय असं सकृतदर्शनी जाणवत वा वाटत. दुसऱ्या अर्थी यात साधकाला किंवा भक्ताला अथवा सामान्य माणसाला बोध केला आहे व साधनेच मर्म सांगितलंय असं मला वाटत. कारण मुळात मराठीत सर्व ज्ञान मांडायचा उद्देश हाच मुळी जे वेदातील गुह्य , गहन आज पर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यत पोहोचवणे हा आहे. आपण सर्वसामान्य असल्यामुळे या दुसऱ्या दृष्टीने यात काय काय गर्भित अर्थ दडलेत हे बघणं जास्त श्रेयस्कर ठरेल. किंबहुना तेच आपल्या हिताचं ठरेल. या सद्हेतूने वरील अभंगातील ओव्या आणि त्यातील बारकाव्याचा आपण अभ्यास करूयात.  अंतिम सत्य अथवा शाश्वत सत्य, या जगातील जगण्य...