Skip to main content

ज्ञानयोग २

llश्रीगणेशाय नमःll ज्ञानोबा माऊली तुकारामllश्रीगुरुवे नमःll

ज्ञानयोग २

 अरे अरे ज्ञाना झालासी पावन
तुझे तुज ध्यान कळो आले 
तुझा तूंचि भाव तुझा तूंचि देह
फिटला संदेह अन्य तत्वे

प्रारंभाचा म्हणजेच आद्यपूजेचा अग्रकर्ता श्रीगणेश आणि शब्दमाउली देवी शारदा यांना चरणस्पर्श करून आपण विषयाला सुरवात करूया. 

माऊलींच्या या ओवीचा अथवा या अभंगाचा अर्थ गहन आणि अनेकार्थी आहे. प्रथमतः ह्यात त्यांच्या स्वतःच्या मनातील वा चित्तातील बदलाचा माग त्यांनी घेतलाय असं सकृतदर्शनी जाणवत वा वाटत. दुसऱ्या अर्थी यात साधकाला किंवा भक्ताला अथवा सामान्य माणसाला बोध केला आहे व साधनेच मर्म सांगितलंय असं मला वाटत. कारण मुळात मराठीत सर्व ज्ञान मांडायचा उद्देश हाच मुळी जे वेदातील गुह्य , गहन आज पर्यंत सर्वसामान्य माणसांपर्यत पोहोचवणे हा आहे. आपण सर्वसामान्य असल्यामुळे या दुसऱ्या दृष्टीने यात काय काय गर्भित अर्थ दडलेत हे बघणं जास्त श्रेयस्कर ठरेल. किंबहुना तेच आपल्या हिताचं ठरेल. या सद्हेतूने वरील अभंगातील ओव्या आणि त्यातील बारकाव्याचा आपण अभ्यास करूयात. 

अंतिम सत्य अथवा शाश्वत सत्य, या जगातील जगण्याचं अंतिम ध्येय जर काही असेल तर परम ईश्वराची अथवा निर्गुण, निराकार , निरुपाधिक , विश्वव्यापक परमांशाची प्राप्ती करणं वा त्यात विलीन होणं अर्थातच  मोक्ष मिळवणं. . पण आत्म्याला या जडदेही आल्यावर याचाच मुळात विसर पडतो. हे गुह्य अथवा परम सत्य जाणणं म्हणजेच पाररमार्थीक परिभाषेत ज्ञान मिळवणं.  उपनिषदांतील अथर्वशीर्षात एका ऋचेत श्रीगणेशाला उद्देशून असं म्हटलंय त्वम ज्ञानमयो विज्ञानमयोसी. म्हणजेच हे देवा गणेशा तू ज्ञान आणि विज्ञानाने परिपूर्ण आहेस, नव्हे तू स्वतःच ज्ञान आणि विज्ञान यांनी युक्त आहेस. तू  ज्ञान आणि विज्ञान यांचा उदगाता आहेस. यातून एक अर्थ जो ध्वनित होतो तो हा कि, ज्ञान आणि विज्ञान या दोन वेगळ्या संज्ञा वेदकर्त्यांना अभिप्रेत होत्या. अथवा या दोन शब्दांचे दोन भिन्न अर्थ आहेत हे त्यांना ज्ञात असावे हे नक्की. 

सर्वसामान्यपणे  भौतिक जगापलीकडील गुह्य गोष्टींचे आकलन वा अर्थ समजणे वा जाणणे अर्थात पारमार्थिक, अनाकलनीय गोष्टीं समजणं  म्हणजे ज्ञान. आणि या जगातील भौतिक गोष्टींचे आकलन वा अर्थ समजणे वा जाणणे अथवा त्यांना  सूत्रबद्धपद्धतीने मांडता येणे म्हणजे विज्ञान. म्हणजेच ज्ञान आणि विज्ञान या संज्ञा दोन वेगळ्या अर्थाने वापरताना वेदकारांना दोन वेगळे अर्थ अथवा संदर्भ अपेक्षितहि होते आणि ज्ञातहि  होते. 

या पार्श्वभूमीवर माऊलीना  जो अर्थ ज्ञान या शब्दाचा अभिप्रेत आहे वा असावा तो नक्कीच भौतिक जगा बाहेरील म्हणजेच पारमार्थिक परिभाषेतील आकलन होणे. ज्याअर्थी माऊली मुळात मराठी भाषेत गीता ज्ञानेश्वरी या स्वरूपातील रचनेच्या माध्यमातून मांडतात.  त्याअर्थी त्यांना ज्या समाजाला  उद्देशून हे सांगावयाचे आहे तो समाज नक्कीच पुस्तकी ज्ञानी समाज  नाही. तर त्यातील सर्वसामान्य माणूस हा त्या काळात हजारो वर्षे ज्ञानापासून वंचित राहिलेला होता म्हणजेच  विशेषतः तळागाळातील जो व्यावहारिक अर्थाने वा रूढार्थाने आडाणी वा अशिक्षित समजला गेलाय, तोच समाज त्यांच्या डोळ्यासमोर असावा अथवा होता. वा आहे. 

प्रेरणा : श्रीसद्गुरू
© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
१९/०७/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...