Skip to main content

Posts

बेकरारी

बेकरारी   तुम्हारे इन आँखोंकी नमी मांगता हूँ तुम्हारी  खुशी   न कम हो यहीं माँगता हूँ मुझे बस ये खुशी   तुम सदा मुस्कुराओ मुझे गम तुम्हारे मिले  मैं यहीं मांगता हूँ||   तुम्हे देखकर ये खिले चाँद तारे ये नज़ारे ये गुलशन ये सारे के सारे जीऊँ बस इन्हें देखकर ये समझू इन्हिमें  मैं तुम्हारी हंसी ढूंढता हूँ ||   सलामत रहे ये रोशन सितारे ये जलवे तुम्हारे तभी देख पाये यहाँ जिंदगी में इक अजीबो सी हसरत तुम्हारी मैं सदा जिंदगी मांगता हूँ ||   मेरा घर है आँखों मे सजता तुम्हारे यहाँ दिन और रातें है काजल तूम्हारे ये बिंदी ये गज़रा ये कंगन की खनखन इन्हें देखकर मैं तुम्हे मांगता हूँ || शायर : खुशमीजाज आशिक

तुम

तुम  तुम्हारे होठोंकी मुस्कान भी मिल जाए  तो काफी है || तुम्हारे आँखोंकी नमी भी मिल जाए तो काफी है || तुम्हारे पलकोंकी छावमे रहूँ बस ये काफी है || तुम्हारे जुल्फोंका साया हो बस ये काफी है || आजाद न करना मुझे इन सबसे कभी || ज़िंदा न रह पाउँगा बीन इनके कभीभी || बस  तुम ये  करना मेरेलीये इतनासा की || मिल जाए   तेरी एक सांस भी मुझे काफी है ||  जानता  हू रह  पाउंगा  बिन महफ़िल के ऐ कातिल || मिल जाए बस तेरे आँखोंकी शराब ही काफी है || शायर : खुशमीजाज आशिक 

गझल - ऎ यार

ऎ यार    जरासी जिंदगी और दोस्त साथमे|| चाहिये क्या और है भी क्या हाथ में||   गुजरे जो पल तन्हाइमे फिजूल थे || यार तेरे साथ बीते लम्हे एक फूल थे || गुजारिश है एकही उप्परवालेसे यही ख्वाब दे || पर इतना करना की हर फूल गुलाब दे ||   मुझे कांटे ही भले देना पर तू इतना कर || कमल के फूल ज़रूर उन्हें देना इतना कर ||   मैं तो यारो का वो यार हूँ ऐ दोस्त|| जो जिंदगी भर तेरा साथ दू ऐ दोस्त ||   मुझपे बस तू एतबार कर सदा के लिए || के खाली न रहे तेरा दामन किसीकी दुवाओं के लिए |

कवडसा 13

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …१३…… शीतल खुप वेळ झोपूनच होती आणि आशाताई तिच्या जाग होण्याची वाट बघत होत्या .  तासाभराने डॉक्टर साठे पुन्हा,  येऊन बघून गेले आणि आशाताईना म्हणाले,  डॉ : तिला अजून तासा दीड तासाने जाग येईल त्यावेळी नर्सला बोलवा.  मी येतो आता.   आशाताई : हो डॉक्टर तुम्ही आहात हा  खूप आधार आहे आम्हाला .   डॉ फ़क्त हसतात आणि आपल  एक बोट वर दाखवातात . जाताना नर्सना आवश्यक सूचना देतात आणि निघतात.   आशाताई एक्ट्याच् खोलीत असतात आणि शीतल शांत निजलेली. किती गोड दिसताय माझ लेकरु आणि किती निरागस. इतके आघात सोसूनही ही इतकी निरागस आणि निष्पाप कशी काय हे एक आश्चर्य आहे. एवढ्या कमी वयात इतका मोठा आघात पचवून पुन्हा उभ रहाण सोप्पी गोष्ट  नक्कीच नाही.    हीचं  पूर्व सुकृत म्हणून हे घडणार होत आणि म्हणून देवाने असा स्वभाव दिला हिला . कारण भोग पचवायला सुद्धा तस काळीज ...

कवडसा 12

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …१२…… काकू गेल्या आणि आशाताई लगेच आत गेल्या. आत शीतल असह्य  वेदनेने व्याकुळ होऊन रडत होती.  आशाताईनी तिचा हात हातात घेतला  केस सारखे केले आणि शीतलला बांध  आवरता आला नाही आशाताई : अग शीतल थोड़ सहन कर अस काय लहान मुलासारख  करतेस. मला माहिती आहे की खुप दुखतय पण एक्सरे येइपर्यंत  थांबावाच लागेल थोड़ धीरान घे बेटा.  (खरतर आशाताईना सुद्धा, शीतलकडे बघुन, आपल्याला रडू येईल अस वाटत होत,  पण मोठ्या  धीरान त्यांनी ते सावरलं  होत) तेवढ्यात एक्सरे रिपोर्ट घेऊन अवि आणि डॉक्टर साठे दोघेही आले . डॉक्टर: (रिपोर्ट पहात) दोन ठिकाणी फ्रैक्चर आहे. प्लास्टर शिवायपर्याय  नाही.  कमीत कमीत सहा आठवडे कंपल्सरी बेड . मी तयारी करतो बर  सकाळपासून काही खाल्लय का काही शीतल: (प्रचंड वेदनेतच बोलते) नाही फ़क्त चहा घेतलाय ६ वाजता डॉक्टर : ठीक आहे आता १० वाजलेत आपण साधारण ...

कवडसा 11

कवडसा  (जसा भीषण समरात विजय, तप्त ग्रीष्मात शीतल वर्षाव , तसा घोर तिमिरात चंद्रप्रकाश म्हणजेच कवडसा)   कहाणी एका संघर्षाची सुरु …११…… क्लास संपवून शीतल कामं  आवरायला निघाली आणि त्याआधी हातात मोबाइल घेऊन चार्जिंगला लावायला. मोबाइल चार्जिंगला लावून टेबलावर ठेवून शीतल वळली आणि खाली पडलेल्या हेयर पिन वर तिचा  पडला. तो चुकवण्यासाठी तिने एक उडी मारली आणि अचानक पाय ट्विस्ट होऊन ती जमिनीवर पडली.  त्यात डावा पायावर सर्व शरीराचा भार पडला आणि एक जीवघेणी कळ तिच्या  मस्तकात गेली.  काही कळायच्या आत,  इतक्या वेगात सर्व घडल कि  सावरण्याची संधीच तिला मिळाली नाही. भानावर येऊन उठण्याचा प्रयत्न करत असताना,  तिला जाणवल की डावा   पाय  प्रचंड वेदना देतोय आणि  आपण उठूच   शकत  नाही.  पण प्रसंगावधान राखत, तिने मोठ्या कष्टाने, जमिनीवरुन  सरकत सरकत,  टेबला पर्यन्त जाऊन चार्जरची  वायर खेचून मोबाइल खाली ओढला.  त्या प्रयत्नात  मोबाईल...

मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे

मनोगत - दामोदर राव पुत्र राणी झाशी यांचे  नमस्कार, आज मी खास तुमच्याशी बोलायला आलो आहे. तुम्हाला हा प्रश्न पडला असेल कि मी कोण . तर सर्वात प्रथम मी माझी ओळख करून देतो . तर आम्ही दामोदर राव . आम्ही म्हणजे मी . काय जुन्या सवयी लवकर जात नाहीत . आता या काळात स्वतःला आम्ही म्हणणारे कोणीही नसतील.  पण पूर्वी खास करून राजे आणि त्यांच्या परिवारातील सर्व  स्वतःला आम्हीच म्हणत असत.  असो. काळ बदललाय म्हणून आम्ही मी ने सुरवात केली . तर आता प्रश्न पुढचा दामोदर राव कोण. आपल्या पैकी काही जणांनी नक्कीच ओळखल असेल. दामोदर राव म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा दत्तक पुत्र. तुम्हाला हासुद्धा प्रश्न पडेल की आता इतक्या वर्षानंतर काय बोलायचं  आहे .  ऐका म्हणजे कळेल .  मी मूळ  आनंदराव.  पण राणीसाहेबांनी मला दत्तक घेतल आणि माझ नाव दामोदरराव झाल . आपण इतिहासाच्या पुस्तकात माझा संदर्भ राणी लक्ष्मीबाई यांच्या धड्यात वाचला असेल. बरोबर तोच मी. आता नमनाला घडाभर तेल झाल्यानंतर मूळ विषयाला हात घालतो .    आज इतक्या वर्षानि सुद्धा...