Skip to main content

नाम अवतार कलियुगी - ५

नाम अवतार कलियुगी - ५

©® संकल्पना, शीर्षक आणि लेखन : प्रसन्न आठवले

मन आणि बुद्धी हे,  या अतर्क्य वाटणाऱ्या गोष्टी,  काय काय साध्य करू शकतात ते बघण्या आधी यांच कार्य आणि शक्ती स्थान पाहुया.  

-  सर्वसामन्यपणे बुद्धीची आकलन शक्ती, झेप , स्मरण शक्ती, तार्किकता  या सर्व गोष्टी प्रचंड प्रमाणात असतात. 

-  अस पाहणीत आढळलय की सर्वसामान्यपणे बहुतांश लोक आपल्या उजव्या मेंदूच्या क्षमतेच्या काही टक्के अथवा नगण्य  वापर देखील करत नाहीत, पूर्ण आयुष्य भर सुद्धा. अस म्हटल जातं की, आइन्स्टाइन सारख्या अणुवैज्ञानिकाने सुद्धा पूर्ण आयुष्यात जास्तीत जास्त ३% उजव्या मेंदुचा वापर केला होता. म्हणजे सामान्य माणसाची बातच सोडा. 

- अजुन एक मुद्दा जो आता कुठे उजवा मेंदू यावर विश्वास आणि संशोधन सुरु झालय. आइन्स्टाइनने उजव्या मेंदुचा वापर 3% टक्के पर्यन्त केला होता व अगम्य वाटणाऱ्या गोष्टी व अनुसंशोधन घडवून आणल. इथे एक उदाहरण आठवलं स्वामी विवेकानंद यांच्या स्मरणशक्तिबद्दल. 

एकदा स्वामीजी अमेरिकेत एका पूलाच्या कठड्यावर बसुन पुस्तक वाचत होते. आणि एक पान वाचून  झालं की ते पान फाडून सामोर पेटवलेल्या शेकोटीत टाकत होते. जवळच बसलेल्या एका आंग्ल स्त्रीने विचारलं की तुम्ही असं का करताय. स्वामीजी उत्तरले कि वाचून झाल्यावर मला या पानाचा काही उपयोग नाही. माझ्या स्मरणात हे राहिलं. त्या स्त्रीचा विश्वास बसेना , म्हणून स्वामीनी ३,४ पान वाचून पुस्तक त्या स्त्रीकडे दिलं आणि सांगितलं कोणताही परिच्छेद, कुठेही कुठूनही विचारा किंवा फक्त पान क्रमांक  सांगा. खरच त्या स्त्रीने त्यांची परीक्षा घेतली आणि थक्क होऊन पाया पडली. तेंव्हा स्वामीजी त्यावर म्हणाले की यात विशेष अस काहीच नाही, प्रत्येकाच्या मेंदुमधे ती ताकद असतेच असते. मी त्याचा योग्य वापर करण्याचं शास्त्र आत्मसात केलय, तुम्ही ते जाणत नाही. पण जाणल्यास तुम्हीही ते करू शकाल. 

या तंत्राचं नाव आहे एकाग्रता. आणि याचं सर्व तंत्र स्वामीजीनी आपल्या राजयोग या पुस्तकात विस्ताराने विषद केलेल आहे. 

आता ही एकाग्रता काय आणि त्याची तंत्रं कशी आहेत, हे पुढील भागात बघुया. 

श्री गुरुवे नमः 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे, त्यामुळे हीचा प्रसार लेखकाच्या नावासकट करावा. 

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले 
०५/१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...