Skip to main content

राम अनुज भरत भाग ६१

राम अनुज भरत भाग ६१

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

अर्थातच मातेला थोडी हुशारी आली. त्याहूनही अधिक आनंद शृतकिर्तीला झाला. ती मनमोकळे पणाने मातेकडे पाहून, स्मित वदन म्हणाली. 

" तुम्हाला जितका हुरूप आला असेल त्याहूनही अनेक पट आनंद मला झाला आहे. तुम्ही माझं ऐकून, माझ्या साठी हे मधुरस पान करून, मला खरच उपकृत केलं आहे." 

उत्तरादाखल माता कैकयीने, शृतकिर्तीच्या पाठीवरून, चेहऱ्यावरून, प्रसन्नतेने आणि स्नेहपूर्ण भावाने, हात फिरवला. मातेच्या मनातील खरी प्रेम भावना, शृतकिर्ती च्या हृदयात खोलवर रुजली. इतके दिवस राजप्रासादात येऊनही, अनेक कारणांनी, एकमेकींच्या फार सहवासात न आलेल्या, सासू सूना, आज अनेकविधकारणांनी, एकत्र आल्यामुळे, दोघींमध्ये एक प्रकारचा अनोखा स्नेहबंध निर्माण झाला. 

हा स्नेहबंध, गतकाळाच्या, काही वेदनादायक जखमांना, भरून काढण्यास, नक्कीच उपयोगी पडणार होता. कदाचित तसा नियतीच्या मनातील, पुढला डाव असावा. या कौटुंबिक जिव्हाळ्याच्या सुवर्ण क्षणांनी बांधलेले रेशीम धागे, कदाचित काळही जाणू शकणार नव्हता. ते फक्त या मनातून,त्या मनात आणि या हृदयातून त्या हृदया तून, बद्ध झालेले ऋण होते. ज्याचा उपयोग येणारा काळ ठरवणार होता. 

प्रत्येक मनाला हा चाललेला प्रवास, ही यात्रा जीवघेणी वाटतं होती. कारण, हृदयस्थ राम,आठव रूपाने, साथीला होता. पण, प्रत्यक्ष देहात अस्तित्वात असलेला श्रीराम हा, अनेक योजने दूर होता आणि प्रत्येक क्षणागणिक व त्याबरोबर पडणाऱ्या प्रत्येक पावलागणिक, अजूनच दूर दूर जात होता. कदाचित श्रीरामांच्या नामात, आठवात, जपात, हृदयातून घातल्या गेलेल्या सादात, रामाला पाहण्याची, अनंत काळासाठीची ती सुरुवात तर नसेल ना. 

कारण अनादी काळापासून अनंत काळापर्यंत नाम, जप, स्मरण यामधे रामाला आठवायची सवय, समस्त जगतास लावण्याची सुरुवात, कळी काळाने तिथेच जनमानसात रुजवली असणार.कदाचित तेरा कोटी स्मरणजप करण्याची ती सुरुवात असावी. जे स्मरण, समस्त अयोध्यानगरी, राज परिवार, भ्राता भरत, पुढील चौदा वर्षे, श्वासागणीक करून, चौदा वर्षात ते पूर्ण केल्यानंतर मगच, त्या दिव्य स्वरूप रामाचं, श्रीरामात झालेलं रूपांतरण, अयोध्या वासियांना दर्शनास मिळणार होतं. हीच त्या रूढ प्रथेची सुरुवात असावी का. 

सर्वजण निघाले होते ज्या दिशेने,ती अयोध्या नगरी, सूनसान शांत आणि निपचित पडली होती. प्रत्येक गृहातून, प्रत्येक ग्राम, नगर, यातून घरटी प्रत्येक सदस्य श्रीरामांना घेऊन येण्यासाठी, राजकुमार भरत याच्या मागे, सैन्यासोबत गेले होते. त्यामुळे सर्व अयोध्या आणि त्यातील प्रत्येक गृह, चौक, ग्राम, नगर आणि संपूर्ण राजगृह सुद्धा विराण भासत होतं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संपूर्ण अयोध्या रीती असूनही, एकाही घराला कड्या कुलपं लावलेली नव्हती. 

भरताच्या मागोमाग निघालेली ही राम भक्तांची मांदियाळी, अयोध्येच्या निकट पोचली होती. परंतु तरीही, एका सुद्धा व्यक्तीला आनंद झाला नव्हता. प्रत्येक जण याच विचारात होता की, मला श्रीरामांनी सोबत का नेलं नाही. अन्यथा मलासुद्धा त्यांच्या सोबत जाण्याचा अधिकार आहे. कारण संपूर्ण अयोध्या हा एक महा परिवार होता. त्यात प्रजाजन आणि राजपरिवार हे देहाने जरी भिन्न असले तरीही,मनाने ते एकाच विशाल अयोध्या परिवाराचे सदस्य होते. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
०९/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...