Skip to main content

राम अनुज भरत भाग ६२

राम अनुज भरत भाग ६२

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले

त्या परिवाराचे नावं, रघुवंश, काकुस्थ वंश असं होतं. जणू प्रत्येकाच्या गृहात श्रीराम, कुटुंबात श्रीराम, बुद्धीत श्रीराम देहात श्रीराम,मनात श्रीराम,वृत्तीत श्रीराम,हृदयात श्रीराम आणि आत्ममंदिरात श्रीराम वसत होते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबाला वाटत होतं की, आपल्याच परिवारातील कोणी सदस्य वनवासात आहे. त्यामुळे संपूर्ण अयोध्या आणि अयोध्यावासी, चित्रकूट क्षेत्री, श्रीरामांनी पुन्हा माघारी याव, म्हणून गेली होते.

अजून एक गोष्ट जी या सर्वांना बांधून ठेवणारी होती ती म्हणजे, सर्व रघुवंशी राजांनी, आपल्या प्रजेवर केलेलं आणि प्रजेला दिलेलं निस्सीम पुत्रवत प्रेम, पित्यासमान माया. ज्यामुळे, रघु राजाच्या वंशाप्रमाणेच, प्रजेच्या सुद्धा तितक्याच पिढ्या,राजाशी,वंशाशी राजघराण्याशी मायेने, स्नेहाने बांधल्या होत्या.म्हणूनच,अर्थात म्हणूनच प्रजा सुद्धा तितकीच दुःखी होती, जितकं दुःख राज परिवाराला झालेलं होतं. 

याचसाठी समस्त अयोध्या नगरी, या राम. भेटीच्या कार्यार्थ जाऊन, आता एकत्रच, राजकुमार भरत याच्याच सोबत परत निघाले होते. तिकडे अयोध्या नगरी सुद्धा, या सर्व घटना क्रमात, राजकुमार श्रीराम, जो या भूमीला, धरेला, राज्याला सुद्धा माहीत होतं की, प्रत्यक्ष श्री विष्णू आहेत आणि पापाचा भार हलका करण्यासाठी आलेले धरेवर आलेले आहेत. त्यामुळे, अयोध्या सुद्धा राम कृपा प्राप्ती साठी गेलेल्या आणि परतून येणाऱ्या प्रजेच्या वाटेकडे, डोळे लावून बसलेली होती. 

सुनसान मार्गिका, सुने गल्लीबोळ, सुने चौक, सूनी सुनी ग्रामच्या ग्रामं, नगरच्या नगरं, वाड्या, वस्त्या, हे सर्व जणू आक्रंदून विचारत होते. कुठे आहेत, श्रीराम, आमचे श्रीराम कुठे आहेत, प्राणप्रिय, दशरथ नंदन, सीतावल्लभ, ज्येष्ठ भ्राता, रघुनंदन, राघव, रघुपती,काकुस्थ कुलभूषण, सूर्य तेजी, परमप्रतापी जानकीनाथ, सीतकांत, श्रीराम कुठे आहेत आणि कधी परतून येणार. 

हा मना मनात असलेला आक्रोश, जणू, अयोध्येच्या प्राणांचा प्रातिनिधिक आक्रोश होता. याच विमनस्क अवस्थेत आणि मनस्थितीत, संपूर्ण अयोध्यापूरवासी नाईलाज म्हणून, पुन्हा आपल्या राज्यात, नगरात, ग्रामात आणि गृहाकडे निघाले होते. कारण अनुज भरत याने तसा शब्द, पित्यासमान असलेल्या, ज्येष्ठ भ्राता श्रीराम याना दिलेला होता. 

तोच भरत, जो आधी श्रीरामांचा आणि प्रजेचा प्रिय होता. श्रीरामांचा तर प्राणच, भरत होता. पण माता कैकयीच्या एका अविवेकी, मोहयुक्त, चुकीच्या एका कर्माने, तोच प्रजेचा प्रिय भरत, अप्रिय झालेला होता. ज्यावेळी, भरत, आजोळाहून, अयोध्येला परत आला होता, त्यावेळी याच प्रजेने, याच भरताला, तिरस्कार, हेटाळणी, जहरी टीका टिप्पणी आणि अप्रिय दूषणं देऊन, जळजळीत नेत्र कटाक्षाने, अवहेलना केली होती.

परंतु आपल्या मातेच्या या निर्णयाला, कसून विरोध करून, आपल्या बंधुप्रेम आणि रघुकुल राजरुधिराची साक्ष याचं भरताने पटवून दिली. या हेटाळणीचां अनुभव, भरताला अगदी माता कौसल्या हीच्याकडून सुद्धा,प्रथम दर्शनी प्राप्त झाला होता. कारण त्या घटनांच्या काळात माता कौसल्येचा, एक प्रश्न कायम सतावत होता की, कैकयीला, पुत्रासाठी राज्यलोभ, एकवेळ समजता येईल. पण माझ्या पुत्राला वनवास का. या प्रश्नाचा सल मातेला सतावत होता.

अर्थातच हा प्रश्न, राज्यात सुद्धा अनेकांना बोचत होता, बुद्धीला पटत नव्हता. याचं कारण सुद्धा तसच संयुक्तिक होतं. कारण भ्राता श्रीराम व भ्राता भरत यांच्यातील बंधूप्रेम हे इतकं घट्ट आणि निर्व्याज होतं की, अनुज भरत अथवा माता कैकयी, यांनी फक्त सांगण्याचा किंवा मागण्याचा अवकाश होता. ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांनी क्षणाचा सुद्धा विचार न करता, विनातक्रार, विना संकोच अयोध्येचाच्या राज्यावर उदक सोडून, आपण भरताचा प्रतिनिधी किंवा सल्लागार म्हणून काम पाहिलं असतं. 

त्यामुळे हा वनवासाच्या अट्टाहासाचा निर्णय का. 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१०/०८/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...