Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३३

भोग आणि ईश्वर  ५३३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
 मानव हा ईश्वर निर्मित स्वयंचलित रोबो आहे असं म्हणणं एका अर्थाने योग्यच ठरेल. कारण त्या रोबोप्रमाणे मानवाला सर्व स्वयंचलित व्यवस्था दिलेली आहे. जन्मा पासून ते मृत्यूपर्यंत अविरत व अव्याहतपणे चालणारं हे मानवी देहाचं यंत्र, अनेक बाबतीत स्वनि यंत्रित आणि स्वयंचलित असतं. म्हणूनच ते यंत्र आपला निर्माता असलेल्या इश्वराशी प्रतारणा करो वा ऋण व्यक्त करो वा न करो, पण हे यंत्र व्यवस्थित चालतं.

पण याची गाडी किंवा मोट, कर्माशी अर्थात केलेल्या प्रत्येक कर्माच्या गतीशी बांधून, ईश्वराने या यंत्राला एका सूत्रबद्ध आयुष्यात गुंतवलं आहे. म्हणजे असं की या यंत्राच्या निर्मितीचं हेच गुपित आहे की, जशी आणि जितकी गुंतागुंतीची ही कर्मगती असेल, तितकच गुंता गुंतीचं आयुष्य असेल. यातसुद्धा ईश्वराने काही गोष्टींचा गुंता अश्या प्रकारे गुंफला आहे की, कोणत्या कर्माचं फल कधी मिळेल हे समजण्याची कोणतीही सोय वा सवलत, ईश्वराने ठेवली नाही. 

म्हणजे आपण केलेल्या कोणत्या कर्मामुळे, आजचं फलित आपण भोगत वा उपभोगत आहोत, हे कधीच कळणार नाही, अशी व्यवस्था निर्माण करून ठेवली आहे. म्हणून एखाद्या दुष्ट बुद्धी व्यक्तीला असत्याने, दुष्टपणे वागताना, गतकर्मांमुळे उत्तम दिवस दिसतात, तर त्याचवेळी एखाद्या सज्जन सद्गृहस्थ व्यक्तीला गतकर्मां मुळे हालाखीचे वा दुःखाचे दिवस काढावे लागू शकतात. 

हाच एक प्रकारे निर्माण करण्यात आलेला संभ्रम आहे. ज्याला मायेचा पडदा वा आच्छादन म्हणता येईल. या संभ्रमामुळे, बहुतेक जीव, या गुंत्यात अडकून, नेहमी चुकीचा विचार वा मार्ग अवलंबतात. कारण अनेकवेळा लोकं, प्रत्यक्ष आयुष्यातसुद्धा मोहाच्या मायेच्या मागे लागून, सद्यस्थितीचा विपर्यास करतात. ज्यामुळे, निर्णय, कर्म, विचार व आचार चुकतात. एकदा, एखाद्या गणितात एक पायरी चुकली की, पुढच्या सर्व पायऱ्या आणि उत्तर चुकतं. 

पण प्रत्येक परीक्षेला जसे मार्गदर्शक, येऊन, मार्गदर्शन करतात आणि चुकीच्या निर्णयापासून, वाचवतात. तसच आयुष्याच्या गणितात सुद्धा, ईश्वराने, ज्यावेळी गणित घातलं, त्याचवेळी, त्या गणिताचं उत्तर देण्यासाठी, त्याची कठीण, पण महत्वाची बाजू, समजावून सांगण्यासाठी, त्यातील कठीण गोष्टी, गुह्यता हे माहीत व्हावं, यासाठी सद्गुरू रूप साधुसज्जन रूप, संत महंत रूपातील मार्गदर्शन नेमले आहेत. ते वेळोवेळी, मानवाला किंवा मानवी यंत्राला या मार्गाची रहस्यं, खाचाखोचा, कठीण मार्ग आणि या सर्वातून बाहेर पडण्याच्या युक्त्या इत्यादी सांगून, शहाणं करून सोडतात. 

या सर्वांचं महत्व, सांगड व संगती कशी लावावी, यावर उद्याच्या भागात विचार करूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१७/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...