Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३९

भोग आणि ईश्वर  ५३९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
मनावरील अनेक प्रकारची बलं, ही अनेक माध्यमातून, मानवी मनावर कार्यरत असतात. त्याचे ढोबळ मानाने काही विभाग करता येतील. पूर्वकर्माची भीती, सद्य स्थितीतील कर्माच्या फलत्वाची शाश्वती किंवा अशाश्वतीची भीती, मृत्यूची भीती, अनेक बाबतीत असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानाची सुप्त भीती, आपल्या चांगल्या व अनेक कर्माबाबत चांगल की वाईट याचं विश्लेषण करत असताना असलेलं अज्ञान आणि त्या अज्ञानाची भीती, एका कर्माचं समोर आलेलं अनिष्ट फलित पाहून, हातून घडलेल्या चुकांची भीती, अश्या अनेक प्रकारच्या सुप्त आणि प्रत्यक्ष भीतीने, मानवी मन नेहमीच चिंताग्रस्त वा काळजीने त्रस्त असतं.

यामधे कुटुंबाबददल वा आप्तस्वकीय आणि प्रपंचं यांबद्दल असलेले भाव, म्हणजेच परस्पर संबंधांचे सकारात्मक व नकारात्मक भाव, यामुळे ही भीती, चिंता व काळजी शतपटीने वाढते. पण या सर्वात मनाने खंबीर दोन प्रकारची लोकं असतात. जे चुकीचं, अनिष्ट वागुनही, मायेच्या प्रभावाखाली वा प्रभावामुळे, आपण जे करतोय ते योग्यच, अश्या समजुतीत असतात ते आणि अज्ञाना मुळे ज्यांना माहितसुद्धा नसतं की, आपण चूक करत आहोत किंवा आपल्या वागण्यातील काही कर्म भविष्यात आपल्यापुढे फलरुप होऊन येऊ शकतात.  

यात पुन्हा दोन शक्यता दिसतात, ती चुकीची गतकर्म समोर फलरूप होऊन समोर येतात, त्यावेळी भयकंपित न होता, वास्तव नाकारून, पुन्हा आपला अहं जपणारे वा तो अहं वाढवणारे किंवा समोर आलेल्या कर्म फलाने भयभीत होऊन अजून चुका करणारे. अश्या या कर्म गतीच्या फेऱ्यात अडकून आपला मनावरील ताबा ढळलेले लोकच, नंतर याच भीतीपोटी चुकीच्या उपायांना जवळ करतात आणि पुन्हा चुकीच्या फेऱ्यात वा भवर्यात सापडतात.  

म्हणूनच यासर्व जंजाळात मनाला स्थिर, एकचित्त आणि एकाग्र ठेवून, या अस्थिरतेत, भितीत आणि अनिश्चिततेत योग्य कर्म करून, चुकीच्या वा अनिष्ट फलांना स्वीकारून मार्ग चालतं राहण्यासाठी, पुर्वकर्मांची शिदोरी, पुण्यप्रद व सकारात्मक असली पाहिजे.  हे आपल्या हातात नाही, कारण पूर्वकर्म ही घडून गेली आणि ती हाती मात्र संचीतरुपात शिल्लक आहेत.

मग यावर दुसरा उपाय म्हणजे ही पूर्वकर्मांची दाहकता कमी अर्थात सोसण्यास सुयोग्य होईल, असा काही उपाय योजावा. पण हे साध्य आहे का, जेणेकरून,  अती दुर्धर असलेली पूर्वकर्म सुसह्य आणि कमी दाहक होतील वा होऊ शकतील. व मना वरील हा भार, हा ताण, हा दबाव आणि पूर्वकर्माचा परिणाम, हे सर्व सध्याची कर्म व्यवस्था बिघडवणार नाही. 

असा एक नव्हे तर असे दोन उपाय वा विकल्प आहेत, ज्यामुळे, आपले पूर्वादोष निश्चितच दूर होतील किंवा त्यांची दाहकता कमी होऊन ते सुसह्य होतील.  त्यातील एक उपाय म्हणजे सद्गुरू कृपा. ही त्याच साधकांना साधते, ज्याचा आपल्या सद्गुरूंवर पूर्ण विश्वास आहे, दृढ श्रद्धा आहे आणि सदुगुरू कृपेने जे प्राप्त होईल, ते स्वीकारण्याची तयारी आहे. म्हणजे आपण सद्गुरू, सद्गुरू कृपा व तिची प्राप्ती, या टप्प्यावर येऊन पोचलो आहोत.  हे जाणण्यासाठी आणि त्यानंतर, दुसरा उपाय वा विकल्प काय यावरही, उद्याच्या भागात चर्चा करूया.  पण तोपर्यंत सद्गुरू कृपेने प्राप्त नाम घेतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२३/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...