Skip to main content

भोग आणि ईश्वर ५३८

भोग आणि ईश्वर  ५३८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) 
 
मनावर असलेल्या बाह्य प्रभावाला मन, बुद्धी व देह कश्याप्रकारे प्रतिसाद देतं आणि काय प्रतिक्रिया देतं यावर प्रत्येक जीवाची पुढील कर्मकहाणी अवलंबून आहे. यामधे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा की, प्रतिक्रिया देणं किंवा काहीही प्रतिक्रिया न देणं ही दोन्ही कर्मच आहेत. त्यामुळे त्या दोन्हींचे तसे तसे परिणाम होणारच. त्यामुळे हे भान, ज्ञान व समज असली पाहिजे की, कोणत्या वेळी काय प्रतिक्रिया द्यायची. मनावर असलेला हा बाह्य ताण तणाव आणि आपली कर्म यांची सांगड घालत आयुष्य पुढे न्यायचं असतं. 

कारण समोर येणारं कर्मफल आणि आपलं सद्य कर्म, या वास्तविकपणे दोन भिन्न गोष्टी आहेत. म्हणजेच मागे आपण पाहिलेल्या चेंडूच्या उदाहरणाप्रमाणे, आपण आधी कधीतरी फेकलेला चेंडू, आता परत आलेला आहे. त्याचवेळी आपल्याला आताचा कर्मरुप चेंडू फेकायचा आहेच.  पण हा येणारा चेंडू आणि आपला आताचा चेंडू, यांची आपण गफलत करतो किंवा आपल्याकडून, अज्ञानामुळे गफलत होते.  

याचं खूप महत्वाचं कारण म्हणजे, ही संगती नाही, हे आपण विसरतो आणि बादरायण नसलेला हा संबंध आपण जोडून, त्यातून सध्याचं कर्म चुकवतो किंवा त्यात चुका करतो.  म्हणून हा बाहेरून मनावर असलेला दबाव, आपल्या मागील कर्म फलाने, अजूनच वृद्धिंगत होतो आणि त्यातून मनावरील भार वा ताण अजूनच वाढतो. आयुष्य हे या ताणतणावावर नियंत्रण मिळवून, त्यातून सध्याचं कर्म योग्य प्रकारे व समोर आलेल्या कर्मफलाला योग्य पद्धतीने सामोरे जाणं, या गणिताचं नाव आहे.  

आपल्याला माहीत आहे की, गणित म्हटलं की, ते सोडवण्याचं  काही तरी तंत्र, शास्त्र वा पद्धत असणारच.  ती पद्धत वा ते तंत्र समजलं की, प्रत्येक गणित सोप्पं जातं. मात्र जीवनात प्रत्येक क्षण हेच एक खूप मोठा वलयांकित प्रश्नचिन्ह आहे.  त्यात येणारा प्रत्येक क्षण नित्यनवीन गणित घेऊन येतो आणि त्यामुळे त्याला एका विशिष्ट तंत्रात बांधणं हे एक मोठं गुह्य आहे.

या गुह्यालाच सोप्पं करून सांगण्यासाठी जगतकर्त्याने अनेक मार्गांनी अनेक युक्त्या योजून, सोप्पी सोप्पी तंत्रं, ज्ञान माहिती निर्माण करून ठेवली आहेत.  त्यांना आपल्या अनुभवाने सांगायला, वेळोवेळी आपले सद्गुरूरूप शिक्षक वा मार्गदर्शक धाडले आहेत आणि धाडतो आहे.  या बाह्य शक्तींना, तणावांना समर्थपणे हाताळून, आयुष्य सुखद, सुलभ करण्यासाठी प्रत्येकाने कर्माचं गणित, चेंडूचं उदाहरण लक्षात ठेवावं.  पण असे हे अनेक प्रकारचे तणाव व शक्ती लहरी यांना कशारीतीने हाताळलं पाहिजे, यावर पुढील भागात चर्चा करूया.  तोपर्यंत नाम आणि आपण याचं अतूट नातं जोडण्याचा प्रयत्न करतच राहूया. 

भोग आणि ईश्वर भाग १  (लेख क्र १ ते ६७) व भाग २ (लेख क्र ६८ ते १३७), ही पुस्तकं उपलब्ध आहेत. आपण खाली दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधून, , पुस्तक मागवू शकता.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२२/०५/२०२२
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...