Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७५

भोग आणि ईश्वर  ३७५ 

चित्तशुद्धीसाठी महत्वाचं आहे निर्विषयी होणं म्हणजेच विषयरहित होणं. विषय म्हणजे फक्त वासना नव्हे तर, सर्व प्रकारच्या विकारातून मनाला बाहेर काढून, एका ध्येयावर त्याला केंद्रित करून, आत्ममार्गी होणं. देहाची शुद्धता ही जितकी महत्वाची आहे, तितकीच किंबहुना त्यापेक्षाही महत्वाची मनाची शुद्धता गरजेची आहे. 

विषयांची मनाला असलेली ओढ आणि वेगवेगळ्या भाव भावनेत मनाचं गुंतणं हे संसाराच्या वाटेवर कदाचित उत्तम लक्षण मानलं गेलं, तरी पारमार्थिक किंवा ईश्वरी मार्गावर मन असं विषयात, भावनेत वा समोर येणाऱ्या सर्व प्रकारच्या लहरींमध्ये गुंतत राहणं गैर आहे. 

पारमार्थिक भाषेत ही प्रलोभनं आहेत. कर्मफलाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी, ईश्वराने स्वतः सांगितलेला उत्तम मार्ग म्हणजे फलाशा सोडून देणं. म्हणजे कर्म तर करायचं पण त्यातून प्राप्त होणाऱ्या किंवा मिळणाऱ्या फलातून मनाला बाहेर काढायचं. पण म्हणजे नक्की काय, हा प्रश्न उरतोच. असं खूपवेळा होतं की, एखादी संज्ञा वा व्याख्या म्हणायला फार सोपी वाटते. 

पण त्याचा वास्तविक अर्थ समजत नाही. कर्म करून त्यातील फलावरील हक्क सोडून द्यायचा, असा याचा अर्थ नाही. तर ते फल मिळण्याची किंवा त्या कर्माचा परिणाम प्राप्त होण्यातील मनाची आशा किंवा अभिलाषा सोडून द्यायची, तिचा त्याग करायचा. हिंदीत ज्याला नेकीं कर और दर्यामे डाल असं म्हटलंय तसं. 

आपण एखादं चांगलं काम करतो आणि त्याबाबत आपलं कौतुक व्हावं अशी आशा मनात बाळगून असतो. अगदी कितीही नाही म्हटलं तरी, कुठेतरी एक छोटी अंधुकशी इच्छा असतेच. अन अशावेळी जर आपलं कौतुक झालं नाही तर मन नाराज होतं. किंवा जर खरच कौतुक झालंच तर मन हर्षभरीत होऊ शकतं. या दोन्ही स्थिती खरा गुंता निर्माण करतात. 

प्रश्न येईल कसा. मुळात सर्व संसार वा ब्रह्मांड हे लहरीमय आहे. आपण मनात निर्माण केलेल्या आशेच्या वा निराशेच्या लहरी कर्म निर्माण करतात. त्यातून फलाची बद्धता निर्माण होते. व्यापक अर्थाने पाहिलं तर, कार्य पूर्ण होणं किंवा न होणं हे दोन्ही, केलेल्या कर्माचं, फलरूप आहे म्हणजे त्या फलातून पुन्हा प्रतिक्रियारूप नवीन कर्म, आनंद किंवा दुःख निर्माण होणार. 

त्या प्रतिक्रियारुप कर्मातून पुन्हा पुढील बद्धता येते. हे एका उदाहरणाबद्दल झालं. पण अशी अनेक कर्म मन नित्य विषयासक्त होत, निर्माण करत असतं. म्हणजे ही एकप्रकारे साखळीच निर्माण झाली. बरं या सर्वात मनातील सर्व स्पंदनं वा लहरी मनात एकप्रकारे अशुद्धता निर्माण करतात. ही अशुद्धता अनेक प्रकारच्या नवनवीन कर्माना आणि पुन्हा नवनवीन फलांना जन्म देते. या सर्व साखळीतून आज प्रत्येक क्षण जातोय आणि असे एकाच नव्हे तर अनेक जन्मातील अनेकानेक क्षण आपण जात आलो आहोत. 

त्यामुळे मनाची अवस्था किती अशुद्ध झाली असेल, याची कल्पना केलेली बरी. पण मग या सर्वांवर उपाय काय, यावर उद्याच्या भागात चिंतन करूया. तोपर्यंत नामातून उद्धार साधण्याचं कर्म करतच राहूया. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
१०/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...