Skip to main content

भोग आणि ईश्वर ३९६

भोग आणि ईश्वर  ३९६ 

ईश्वर आराधना, स्मरण प्रार्थना हा सर्वात मोठा बीजमंत्र आहे, मुख्यतः कलियुगातील भक्तिमार्गाचा. पण याची बुद्धी होणं, त्यानुसार लक्षात येणं आणि प्रत्यक्ष त्यानुसार कर्म करणं, या तिन्ही गोष्टी एकत्रित घडणं, सद्गुरूकृपे आधीन आहेत. कारण बुद्धी भ्रमित करायला आणि योग्य कर्म करण्याची बुद्धी होण्यासाठी, पुन्हा आपल्याच कर्मफलाची गती कारण आहे. 

म्हणजे योग्य कर्म आणि अयोग्य कर्म करण्याची बुद्धी व इच्छा उत्पन्न होणं, आपण कर्माने लिहू शकतो. पण त्यानुसार प्रत्यक्ष कर्म घडू शकण्यासाठी वृत्तीची, चित्ताची शुद्धता ही सहजसाध्य गोष्ट नाही. कारण मन व बुद्धी हे, क्षणक्षण काहीनाकाही चिंतन व चिंता यांचं स्मरण करतच असतात. याशिवाय, संचित, या जन्मातील कर्म, प्राप्त परिस्थिती, आपला संपर्क येतो, त्या माणसांच्या  विचार व आचार लहरींचा सामूहिक परिणाम, या सर्वांचा दबाव मनावर आणि बुद्धीवर प्रचंड प्रमाणात असतोच. 

या सर्वांतून मन बुद्धी व देह यांची सांगड घालून योग्य कृती वा कर्म करणं हे फक्त प्रारब्ध वा संचित यावर अवलंबून ठेवलं, तर घडणारं प्रत्येक कर्म, हे योग्य वा अयोग्य दोन्हीपैकी काहीही असू शकेल. परंतु हेच जर सद्गुरू आश्रयाने वा अधिपत्याखाली केलं, तर कर्म आपल्याच प्रारब्धाच्या योगाने होईल,पण त्यातील अशाश्वतता नष्ट होईल आणि योग्य ते घडून येईल. म्हणजेच मन बुद्धी व देह यांचा उत्तम मेळ जमून येईल. 

म्हणजेच जर एखाद्या वाऱ्यात वा वादळात लावलेला दिवा विझण्याची शक्यता अधिक आहे. पण सद्गुरुकृपा ही त्या दिव्याभोवती लावलेल्या काचेसारखी आहे  त्यामुळे वारा आहे पण दिवा संरक्षित आहे. म्हणजे सद्गुरू काय किंवा ईश्वर काय, घडणाऱ्या गोष्टी किंवा येणारं वादळ थोपवू शकणार नाहीत, किंवा थोपवणार नाहीत. पण त्याच्या प्रभावापासून आपल्याला दूर नक्कीच ठेवू शकतील. 

याचा सर्वात मोठा लाभ, या जन्मात केलेल्या साधनेतून जमा पुंजी, पुढील जन्मात, जन्मापासून प्राप्त होईल. म्हणूनच आपण एखाद्याबद्दल बोलताना म्हणतो की, काहीही  धर्म पुण्य न करता एखाद्याचं कसं व्यवस्थित सुरू आहे. पण याची दुसरी बाजू, म्हणजे जमा पुण्यकर्म समाप्तीनंतर काय, हा प्रश्न उरतोच. याच साठी सद्गुरू व ईश्वर स्मरण ही नित्य करावी लागणारी गोष्ट वा कर्म आहे. कारण कर्मफलाच्या पुढे सद्गुरुकृपा सुरु होते. पण ती कर्मफलाला आधार वा पूरक ठरते. 

म्हणजे अनिष्ट परिणाम कमी करून इष्ट परिणामांना बळ देण्यासारखं आहे. पण हा झाला व्यक्तिगत लाभ वा हानीपासून बचाव. मुळात प्रत्येक जीवाच्या पाप व पुण्यकर्माचा सामायिक परिणाम हा, देवदेवतांची शक्ती खर्च वा वाढ होण्यात होतो. प्रत्येक जीवाला देहधारणे नंतर, देह असेपर्यंत, तो जगवायला वाढवायला लागणारी शक्ती, ऊर्जा याची प्राप्ती अन्नसेवन, जलप्राशन यातून होते. 

मनाला स्नेह, ऋण, आपुलकी,प्रेम,कृपा यातून ऊर्जा व शक्ती प्राप्ती होते. म्हणून मनाची शक्ती वाढण्यासाठी प्रेम आपुलकी, स्नेह व सद्गुरू ईश्वरसेवा व साधना या कर्मांची आवश्यकता असते  आणि हे नित्य होत गेलं तर, त्यातून मिळणाऱ्या ऊर्जेने मनःशांती प्राप्ती व मनःशक्ती वृद्धिंगत होते. या विपरीत घडल्यास, दूषित अन्न व पाणी यामुळे जशी देहाची हानी आणि आजार उद्भवतात, त्याप्रमाणे मनाला पूरक व पोषक भाव व भावना प्राप्त न झाल्यास, मनाचं स्वास्थ्य व शांती यावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. 

याचं पुढील।चिंतन उद्याच्या भागात पाहूया आणि नामामार्गाची शिदोरी सांभाळूनच. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
३१/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...