Skip to main content

भोग आणि ईश्वर ३९१

भोग आणि ईश्वर  ३९१ 

श्रीब्रम्हाजी म्हणाले, वास्तविक पाहता,  जो संघर्ष, प्रत्येक युगात आहे, तोच कलियुगातसुद्धा आहे. सत्य, धर्म, न्याय व नीती, या चार मूल्यांचा संघर्ष प्रत्येक युगात, मानवी रुपात प्रकट झालेल्या, विश्वात्म्याच्या परामांशाला, मानवी देहात, असताना करावाच लागणार. प्रत्येक युगातील, तात्कालीन राजकीय , सामाजिक परिस्थिती व नैतिक, आर्थिक मूल्य, त्यामधून, कोणाचा विजय होणार हे ठरत जाईल. 

आधीच्या तीनही युगात, जपतप, साधना, पुण्यकर्म इत्यादींचं सामर्थ्य हे निर्विवाद असेल. कारण ही मूल्य जपली जावीत, जोपासली जावीत आणि याच मूल्यांच्या आधारे धर्म व न्याय हे वृद्धिंगत होत जावेत, अशी त्या त्या युगांच्या इष्टदेवतेची अर्थात युगांच्या स्वामींची इच्छा असेल. 

पण कलियुगात प्रत्यक्ष त्या युगाचा स्वामी कली, हाच अधर्म अनीती, अनाचार या सर्वांच्या मागे ठामपणे उभा असेल. फक्त उभाच नसेल, तर त्यांना प्रोत्साहित करून, त्यांची गती वाढवेल. त्याद्वारे त्या युगातील कर्मांना, न्यायाला, नीतीला, धर्माला व आचाराला भ्रष्ट करून, आपली इच्छा व वासना तृप्त करण्याचा पूर्ण प्रयत्न करेल व करत राहील. 

त्यामुळे या युगात कधी नव्हे तो, त्या त्या काळातील मानवाला, त्याच्या आचार, विचार उच्चार,  कर्म व भक्ती यांना महत्व प्राप्त झालं आहे. मानवी मन,भावना, यावर चिरंतन पगडा ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न कलीचा असणार आहे. त्यामुळे, जसं कलीने सांगितलं, त्याप्रमाणे, आपण आपल्या वासना, काम, क्रोध इत्यादी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करत गेल्यास, ईश्वरी प्रेरणा व चैतन्य हे, याबाबत आपलं सहाय्य नक्की करेल. 

म्हणून कलियुगात, कलीने सांगितलेले नियम व मर्यादा, यांमध्ये राहून, आपलं हित पाहून, ते साधण्यासाठी आवश्यक बंधनांमध्ये मानवाने राहिलं तर उत्तम कर्म घडत जाईल. एकदा कर्म सुधारत गेल्यास, कर्मफलाची साखळी सुधारत जाईल. कर्मफल साखळी सुधारून उत्तम गती प्राप्त करणं, हेच मानवाचं कर्तव्य  असेल. बंधनं न जुमानता,  अमर्याद अनीती, अमर्याद वागणं म्हणजे अर्थातच कलीच्या जाळ्यात अडकून, पुढील कर्मसाखळी बिघडवून, नन्तर उत्तम गतीची अपेक्षा ठेवणं , अनिष्ट आहे. 

श्रीब्रह्मदेव विश्लेषणाचा शेवट करताना म्हणाले. कलीयुगातील कलीच्या प्रलोभनांना, भयाला, समोहाला, संभ्रमित करण्याच्या प्रयत्नांत न अडकणं, हा कलियुगा तून पुढे जाऊन, इष्ट गती व अंती मोक्षाप्रत जाण्याचा उत्तम, सुलभ असा राजमार्ग आहे. श्रीब्रम्हाजीच्या कथनाने सभागृहात स्थिरता आली, यापुढील विश्लेषण उद्याच्या भागात. पण तोपर्यंत नामाचा धरलेला हात न सोडता. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२६/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...