Skip to main content

भोग आणि ईश्वर ३८९

 भोग आणि ईश्वर  ३८९ 

श्रीब्रम्हाजींच्या कथनाने सभागृहात,कलियुगातील जन सामान्यांबाबत अतीव चिंता, प्रत्येकाच्या चर्येवर स्पष्ट दिसत होती. श्रीब्रम्हाजी हे जाणूनच पुढे सांगू लागले. ही सर्व नकारात्मकता हे एक कटू, पण कलियुगातील एक वास्तव असेल, हे नक्की. पण काही बाबतीत कलियुगात, आशादायक आणि वरदायक चित्र, नक्की दिसेल. 

म्हणजेच आधीच्या तीनही युगात विशेषतत्वाने ईश्वर भक्तीसाठी कठोर जपतप साधना दानधर्म इतर पुण्यकर्म करावे लागतील. यातील अनेक मार्ग घोर तपश्चर्येने व दृढतेने आचरल्यानंतर, ईश्वरीय मार्गावर काही प्रमाणात मार्गक्रमण होऊ शकेल. पण कलियुगात हीच परिस्थिती अत्यंत सुलभ असेल. 

श्रोतृवर्गातून एक विनम्र स्वरात प्रार्थना आली की, सृष्टी कर्ता श्रीब्रम्हाजी आपण हा मुद्दा अजून विस्ताराने सांगावा, ही आपल्या चरणी प्रार्थना. श्रीब्रम्हाजी स्मित करत म्हणाले, अवश्य सांगतो, ध्यान देऊन ऐका. आपण उदाहरण घेऊ म्हणजे हा मुद्दा लक्षात येईल. उदाहरणार्थ सत्ययुगात जे पुण्य, दहा हजार वर्षे तप केल्यानंतर साध्य होईल, तेच पुण्य,त्रेतायुगात, भूतलावरील प्राण्यांना, हजार वर्षे, तपसाधना केल्यानंतर  प्राप्त होईल. 

द्वापारयुगात, तेच वा त्याच प्रमाणातील पुण्य जीवाला, शत वर्षात प्राप्त होईल. परंतु कलियुगात विशिष्ट परिस्थितीमुळे, ज्याप्रमाणे पापाचार आधीच्या युगापेक्षा द्वि वा शतगुणाने वाढेल, त्याचप्रमाणे पुण्यासंपादन, सहजी, विनासायास, कमीतकमी श्रमात, प्राण्याला प्राप्त व्हावं, यासाठीच,परम ईश्वर शक्तीने नवविधा भक्तीसह अनेक मार्ग निष्फळ ठरवले आहेत. 

मतितार्थाने, आधीच कलियुगातील घोर परिस्थितीने ग्रस्त आणि त्रस्त जीवाला, आपलं पुण्यासंचयाचं कार्य, सहजी साध्य व्हावं, या एकमेव हेतूने, मात्र ईश्वर स्मरण, शरण व अर्पण या साध्या, सहज व कमी श्रमाच्या भक्तीमार्गाने प्राप्त होईल, याची व्यवस्था परम दयाळू ईश्वराने केली आहे. 

म्हणजेच आत्मउद्गार, आत्मोन्नती, आत्मज्ञान, आत्मबल प्राप्ती या सर्वांतून ईश्वराकडे जाण्याच्या अनेक त्रास दायक व तापदायक मार्गांकडे वळून, प्राणी, आधीच कलीची गती, त्यात कमी जीवनकाळ उपलब्ध, यासर्वात ईश्वर भक्ती हा मार्ग अति श्रमाचा व अप्राप्य न वाटता, सहजी साध्य मार्ग वाटावा, जेणे करून जीव, समोर येणाऱ्या कोणत्याही परिस्थितीत, कोणतेही अन्य साधन, पूजन, विधी यामध्ये न अडकता, आपली भक्ती करण्यास सक्षम असेल. 

अश्या कमी बल लागणाऱ्या, कोणत्याही बाह्य साधनांची जरुरी नसलेल्या, सुटसुटीत व सोप्प्या वाटणाऱ्या मार्गावर जनसामान्य यावेत, यासाठी, ईश्वराने, सद्गुरू तत्वाची, स्वयंसिद्ध व्यवस्था सुद्धा ईश्वराने, निर्माण केलेली असेल. या तत्वाच्या स्वाधीन झालेला जीव, आपल्या कर्मगती नुसार, देहभोग, भोगत असतानादेखील आपलं आत्मिक मार्गाचं कर्म क्रमू शकेल. 

वास्तविक आधीच्या तीनही युगात सद्गुरू आपल्या साधक व शिष्यांची अनेक प्रकारे, अनेक मार्गांनी व अनेक उद्देशांसाठी, परीक्षा घेऊनच, आपलं शिष्य म्हणून त्यास स्वीकारतील. परंतु कलियुगात,भक्तिमार्ग, भक्ति मार्गी हे टिकवून ठेवणं, धर्माचरण टिकवणं अत्यंत आवश्यक असेल. 

म्हणूनच, धर्ममार्गातील, आत्मउध्दारमार्गातील, अनेक कठोर पथ्ये आचरणात आणण्यास, अव्यावहारिक असतीलच, पण फलदायीसुद्धा नसतील. त्यामुळे भक्ति मार्गावर जनसामान्यांचा विश्वास दृढ रहावा, हा परम कृपाळू ईश्वराचा संकल्प असल्या मुळे, कलियुगात पुण्यप्राप्ती ही श्वासातून, श्वासावाटे  व श्वासां प्रमाणे सहज होईल. किंबहुना कलीचा प्रभाव जसजसा वाढत जाईल,त्याप्रमाणात भक्तीची, ईश्वरकृपेची, ईश्वर करुणेची प्राप्ती, सुलभ होत जाईल आणि ही ईश्वरी योजना  असेल. 

श्रीब्रह्मदेव विस्ताराने प्रत्येक मुद्दा उलगडून सांगत होते. आपण त्याचं चिंतन,उद्या पुढे सुरूच ठेवू. पण नामाच्या संकल्पात दृढ राहूनच. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
२४/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...