Skip to main content

भोग आणि ईश्वर ३७६

भोग आणि ईश्वर  ३७६ 

चित्तशुद्धीसाठी काय आवश्यक आहे,त्याबद्दल विस्तृत पणे चर्चा करण्याआधी, मुळात चित्ताची शुद्धता का साधायची, यावर जरा चर्चा करूया. जेणेकरून उद्देश वा ध्येय लक्षात आलं की, त्या दृष्टीने मार्ग शोधायला आणि त्यावर मार्गक्रमण करायला, मनाची तयारी होऊ शकेल. ईश्वरी तत्व, निर्गुणरूपात किंवा सगुणात, शुद्ध आणि गुणरहीत आहे. त्यामुळे, त्या तत्वाशी एकरूप होण्या साठी, त्याच पातळीवरील शुद्धता साधणं आवश्यक आहे.  अशी शुद्धता गुणातीत वृत्ती धारण करून, आत्म तत्वाला शुद्ध करणं, हे महत्वाचं आहे. 

मन ही एकच गोष्ट आत्म्याशी निगडित आहे. आत्म्याची शुद्धता साधण्यासाठी, मनाची किंवा चित्ताची शुद्धता घडणं,ही, म्हणूनच सर्वप्रथम पायरी आहे. यासाठीच, चित्तशुद्धी ही आधी साधून, मग भगवतमार्गावर मार्ग क्रमण करणं, हे श्रेयस्कर आहे. अशी शुद्धता साधण्या साठी, अनेकानेक उपाय अनेकांनी सांगितले आहेत. 

त्यासाठी प्रथम विषयाची आस, ओढ, मोह हे सर्व त्यागणं हा सर्वात आधीचा उपाय अथवा सर्वात आधीची पायरी आहे. यासाठीची सुरवात कशी करावी, तर सर्वात प्रथम, दुसऱ्यातील दोष पाहणं सोडून दिलं पाहिजे. कारण मागे सांगितल्याप्रमाणे मनात प्रत्येक प्रकारची शक्तिकेंद्र आहेत आणि त्यांना उद्दीपित करताच, ती केंद्र आपलं कार्य सुरू करतात. 

उदाहरणार्थ, जरी प्रत्यक्ष आपण एखाद्याविषयी, द्वेषयुक्त किंवा मत्सरयुक्त उच्चारण प्रत्यक्ष वाचेने केलं नाही, तरीही, नुसता मनात तसा भाव प्रकट होण्याने, चित्तात अशुद्धता निर्माण होते आणि नुसता एक विचारतरंग एका कर्माला जन्म देतो.  म्हणजे जे साधुसंत यांनी सांगितलं आहे की, आपण दुसऱ्यात दोष पाहिला की, त्याचा उगम किंवा तो दोष अथवा त्याचं बीज हे आपल्याच मनात असतो, याचा खरा गहन अर्थ वर सांगितल्या प्रमाणे आहे. 

हे झालं एका अवगुणाविषयी. म्हणजे अश्या प्रत्येक अवगुणा विषयी चिंतन केल्यास व त्यावर कृती केल्यास, अनेक प्रकारच्या दोषातून,चित्ताची व पर्यायाने अंतर्मनाची आणि आत्म्याची शुद्धी साधता येईल. अर्थात ही प्रक्रिया किंवा हा मार्ग लिहिला तितका सहज नाही हे निर्विवाद. कारण यात अनेक प्रलोभनं, मोह,विषयांचे काटे, क्रोधादी विकारांची क्षणोक्षणी पाय ओढणारी माया,हे सर्व आपला विचारसुद्धा दुरापास्त करतात, मग कृती तर अशक्य होऊन बसते. 

या सर्वांतून,काही यश साधण्यासाठी बराच काळ लोटतो. कारण एखाद्या अवगुणावर नियंत्रण येतंय,असं भासत असताना दुसरा अवगुण,आपलं डोकं वर काढतो. हे चक्र नित्य चालू राहतं. अनेकदा आपण आपल्याच मनावरील, आपलंच नियंत्रण कसं काय गमावतो,याविषयी उद्विग्नता वा दोष मनात उत्पन्न होतो. ज्यामुळे पुन्हा आपणच गाडी मागे नेतो. पण असा विचार येण्याने आपण निदान त्याचं चिंतन करतो.  चिंतनातून अनेकदा मार्ग निघू शकतो. तरीही यावर अजून चिंतन अपेक्षित आहे, पण उद्याच्या भागात. तोपर्यंत नाम हेच सार हा मन्त्र ध्यानात ठेवून, नामस्मरण सुरू ठेवा. 

श्रीरामरक्षा व श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तकं लवकरच वितरित व्हायला सुरवात होईल. 

भाग १ व २ यांच्या नवीन प्रति प्राप्त झाल्या आहेत आणि ज्यांनी पुस्तकं नोंदणी केली आहे, त्यांच्या पुस्तकाचं वितरण आता सुरू झालं आहे आणि त्यांना तसं सूचित केलं गेलंय. दोन्ही पुस्तकांची मूळ किंमत रु.१५०/- आहे. पण प्रकाशनपूर्व सवलत रु.१५०/- (रु.११०+ रु.४०) १० ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे.  पेमेंटसाठी नं.  9960762179 Gpay, आणि Payphone 9960762179@ybl. भाग १ व २ एकत्र  रु.२७०/- कुरियरसह. पहिल्या भागात लेख क्र १ ते ६६७ व भाग २ मध्ये लेख क्र ६८ ते  १३६ पर्यंत लेख समाविष्ट केलेले आहेत.  

आता भाग १ व २ ची प्रिंटिंग प्रक्रिया पूर्ण झालेली असल्यामुळे, श्रीरामरक्षा आणि श्रीमारुतीस्तोत्र भावार्थ पुस्तक, प्रिंटिंगचं काम हाती घेण्यात येईल, त्यामुळे त्याच्या  नोंदणीसाठी सुध्दा संपर्क करू शकता. या पुस्तकाची नोंदणी केलेल्याना लवकरच वितरण सुरू होईल. 

भोग आणि ईश्वर या मालिकेचा यू ट्यूब चॅनेल सुरू केला आहे. या मालिकेचे पहिले पंधरा लेख श्राव्य माध्यमातून चॅनेलवर, दिले आहेत.  भोग आणि ईश्वर या नावाने आपण मराठीत यू ट्यूबवर शोधू शकता, चॅनेल मिळेल. तो ऐका.  

©® विचार व  लेखन : प्रसन्न आठवले
११/१२/२०२१
९०४९३५३८०९ wap
९९६०७६२१७९
🕉️🕉️🕉️
श्रीकृष्ण प्रेरणा!!श्रीकृष्णार्पणमस्तू !!

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...