Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १५

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ १५

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

 ब्रह्मांडे माईली नेणों, आंवळे दंतपंगती | 
नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

चवदाव्या भागात एक शंका व्यक्त झाली म्हणून फक्त जाता जाता उल्लेख करतो. काळाग्नी काळरुद्राग्नी अशी द्विरुक्ती समर्थांनी का वापरली असेल.मी एकदा याचा संदर्भ वाचल्याचं आठवतंय की हे दोन यमाचे पुत्र होतेआणि अर्थातच यमदूत. म्हणून  त्यासंदर्भात समर्थ असं म्हणतात की, प्रत्यक्ष यमाचे पुत्र असलेले आणि मृत्यूचे दूत असलेले हे दोन महाभयंकर असे प्रतिनिधी काळाग्नी आणि काळरुद्राग्नीदेखील हनुमंताच्या असुरांवरील चढाईच्या पावित्र्याने भयकंपीत झाले आहेत. देखता म्हणजे पाहून.  परंतु सध्या याचा संदर्भ शोधून सापडत नव्हता म्हणून लिहिण्याचं टाळलं.

समर्थांनी सहाव्या श्लोकाच्या सुरवातीलाच एक शब्द वापरला आहे, ब्रह्मांडे.  याचा खूप गहन अर्थ होतो. मुळात चारशे साडेचारशे वर्षांपूर्वी खगोलशास्त्राचं कोणतंही ज्ञान पाश्चात्य जगतात फार प्रचलित नसताना समर्थांनी वापरलेला हा शब्द त्यांच्या अलौकिक व जगतापार ज्ञानाची कक्षा दर्शवतो. इथे त्यांनी ब्रह्मांडे हा अनेकवचनी शब्द वापरला आहे. 

ब्रह्मांड म्हणजे एक असा अभिप्रेत अर्थ असताना आणि ब्रम्हदेवाने ब्रह्मांडाची निर्मिती केली असा आपल्या शास्त्राचा दाखला असताना समर्थ ब्रह्मांडे हा शब्द वापरतात त्याअर्थी त्यांना हे ज्ञात असलंच पाहिजे की या विश्वात वा अवकाशात अनेक ब्रह्मांडे अस्तित्वात आहेत. ब्रह्मांड म्हणजे समस्त सृष्टी अर्थातच आकाशगंगा ज्यामध्ये अनेक ग्रह, तारे, अनेक धूमकेतू, अनेक सूक्ष्म व विशाल कण, अनेक निर्वात पोकळ्या वा कृष्णविवरे व या सर्वांचा केंद्रबिंदू हा सुर्यासम एक तेजस्वी तारा असतो, असे अनेक तारे. त्याच्या प्रभावाने सर्व त्याभोवती फिरत आहे. यात त्या सर्वांच्या फिरण्याने तयार होणारी महाप्रचंड ऊर्जा, शक्ती, गती यांसह या सर्वांना स्वनियंत्रीत करणारी प्रेरणाशक्ती यांचा समावेश होतो. 

कदाचित यातील काही गोष्टी अजूनही विज्ञानाने जाणल्या नसू शकतील. परंतु भारतीय वैदिक शास्त्राने त्याचा उल्लेख अनेक प्रकाराने करून ठेवला आहे. प्रत्येक वेळी जेंव्हा नवीन शोधापर्यंत आपण पोहोचतो, त्यावेळी या वैदिक खगोल शास्त्रातील संदर्भ पडताळून पाहिले जातात आणि बऱ्याच अंशी ते सत्य आढळतात. अजून विज्ञान हे समजू शकलं नाही की, अश्या किती आकाशगंगा अस्तित्वात आहेत आणि असल्यास प्रत्येक ठिकाणी पृथ्वीसम ग्रह, सुर्यासम तारे अस्तित्वात आहेत अथवा नाहीत.

तरीही समर्थ ठामपणे ब्रह्मांडे असा उल्लेख करतात आणि तो सहजी केला असेल, हे संभवत नाही, कारण प्रत्यक्ष रामरायाचं दर्शन प्राप्त झालेले संत व महाज्ञानी व्यक्तित्व होते समर्थ रामदास स्वामी.  म्हणून समर्थ ब्रह्मांडे म्हणतात त्याअर्थी अनेक आकाशगंगा अस्तित्वात असल्या पाहिजेत. विज्ञान त्यांचा शोध कधीही घेवो. 

यालाच जोडून समर्थ माईली हा शब्द वापरतात. या शब्दाने अनेकवचनी ब्रह्मांड हा शब्द निश्चित होतो. कारण एक ब्रह्मांड असतं माईले म्हटलं गेलं असतं. माईली म्हणजे मावली. माईले एकवचनी म्हणजे मावले आणि माईली अनेकवचनी म्हणजे  मावली. नेणो म्हणजे नयनी अर्थात डोळ्यात.

चवथ्या श्लोकात जे समर्थानी युद्धातील हनुमंताच्या पवित्र्या बद्दल, आवेशाबद्दल सांगितलं आहे, त्याच्याच पुढील स्थितीबद्दल समर्थ सांगतात की, ध्वजाच्या बाजूसह सैन्याची इतर अनेक बाहू अर्थात बाजू सांभाळणाऱ्या व असुरांवर तुटून पडणाऱ्या हनुमंताला पाहून यमपुत्र व यमदूत भयाने थरथर कापत आहेत, त्याच्या नेत्रात अनेक ब्रह्मांडे मावली आहेत असा भास होतो आहेत. याचा अर्थ हनुमंताने आपले नेत्र असुरांवर हल्ला करताना इतके विस्फारले आहेत की त्यात अनेक ब्रह्मांडे मावली आहेत. जणू तसा भास असुरांना होतो आहे. 

हनुमंताच्या या क्रोधाचं महत्वाचं कारण माता सीतेला पळवून स्वामींना झालेला ताप व त्रास आणि त्यायोगे स्वामींचे झालेले हाल आणि या सर्वांना कारणीभूत असलेल्या रावणाचे हे सैनिकही या सर्वांना तितकेच जबाबदार आहेत. आता यांचा निःपात हे एकच ध्येय व मार्ग उरतो. 

क्रमशः भाग १५..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
१६/११/२०२०
९०४९३५३८०९ wap
९९७०७६२१७९

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...