Skip to main content

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ७

मारुतीस्तोत्र आणि भावार्थ ७

|| श्रीगणेशाय नमः ||
|| श्रीराम जयराम जय जयराम ||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दु:खहारी, धूर्त, वैष्णवगायका ||२||

खरतर सुख या शब्दाची निश्चित व्याख्या करणं महाकठीण काम आहे. एखाद्याला महालात सुद्धा सुख मिळणार नाही आणि एखादा साध्या खोपटातसुद्धा चिरंतन सुखाची अनुभूती घेऊ शकेल. म्हणजेच व्यक्तिसापेक्ष असलेली ही गोष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही एका निकषावर सुखाची संकल्पना वा व्याख्या करणं कठीण आहे, हे नक्की. अन्यथा सर्वात श्रीमंत माणसाला काहीही दुःख नाही हे ठामपणे सांगता आलं असतं. 

मग सुख हे नक्की भौतिक गोष्टीवर अवलंबून असतं का. नाही. तरीही काही मूलभूत गरजा ज्या देहाच्या चलन वलना साठी  आवश्यक  असतात, त्या भागल्या की माणूस सुखाच्या नवनवीन संकल्पना साकारत जातो.त्यांनतर ही साखळी तयार होते,  जी अंतहीन असू शकते. म्हणूनच या सर्वात मानसिक आणि आत्मिक सुखाची मनुष्याला नितांत आवश्यकता असते. त्यावरच पुढील संचिताची शिदोरी अवलंबून असते. कारण जितकी भौतिक सुखाची भूक जास्त तितका वासनेचा जोर जास्त. तितकीच त्यामागे धाव जास्त. याच धावण्याच्या नादात आपण कुठून कुठे जाऊ शकतो हे त्या स्थानी पोचल्याशिवाय उमगत नाही आणि उमगतं त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. 

म्हणून सुखाच्या संकल्पनेत मानसिक आणि आत्मिक समाधान व शांती महत्वाची. अशी मनःशांती मिळवण्यासाठी जी मानसिक अवस्था जरुरी असते ती साध्य करण्याचं  काम हनुमंताच्या उपासनेतून होतं. अश्या सुखाचा कारक, अश्या सुखाचा कर्ता जे चिरंतन टाकणारं आहे, असं सुख देणारा हनुमंत. 

सुखाचा वर सांगितल्याप्रमाणे विचार केल्यानन्तर, दुःख काय हे साधारण लक्षात येईल. सुखाच्या अनुभूतीचा अभाव अथवा काही गोष्टींचा वा व्यक्तींचा अभाव हे देखील दुःखाचं कारण असू शकतं. ऐहिक वा भौतिक दुःख हे सुखाप्रमाणेच चिरकाल टिकणारं नसतं. फक्त काही काही अभाव हे चिरकाल टाकणारे घाव देऊन जाऊ शकतात. पण अश्या स्थितीतसुद्धा मनाला काही शांत करणारं जर काही असेल तर ती मारुतीरायाची उपासना. ज्याने प्रभूंना त्यांच्या परम सुखाप्रत अर्थात देवी सीतेप्रत पोचवण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. त्यांचं सीतावियोगाचं, भ्राता लक्ष्मण यांच्या प्राणांवर आलेल्या संकटाचं दुःख लीलया दूर करण्यात  ज्याचा सिंहाचा वा महत्वाचा वाटा होता तो हनुमंत. 

इथे एक नमूद करावंसं वाटतं की अक्षय सुखाची कल्पना ही भौतिक सुखाच्या पलीकडे आहे. अश्या भौतिक सुखा पलीकडे असलेल्या सुखात दुःखाचा सहजी अंत आहे. कारण चिरकाल टाकणारं सुख हे जेंव्हा स्वतःच्या आत सापडतं त्यावेळी तिथे दुःख वा दुःखाची जाणीव उरत नाही आणि सुखाची उणीव भासत नाही. अश्या अक्षय सुखाचा दाता आणि पर्यायाने दुःखाच्या जाणिवेचा हरणकर्ता हनुमंत आहे. 

धूर्त. एखादा भक्त हा सहिष्णू, सोशिक, धर्मपरायण, सन्मार्गी, संयमित, सुशील असा असतो अथवा असावा अशी एक स्थापित धर्माधारीत संकल्पना आहे . युगानुयुगे ऋषीमुनी, संतसज्जन यांनी भक्त दास या संकल्पनेतील देवभोळ्या व्यक्तींची अशीच छाप समाजावर पाडली आहे. किंबहुना ज्याची दृष्टी सर्वसमावेशक आहे, ज्याला सर्व चराचरात ईश्वर दिसतो अश्या महापुरुषांना व्यक्ती व्यक्तींमधील भेद जाणवत नाही. अशी कित्येक उदाहरणं आहेत. त्यांना मानवी मनातील छद्मीपणा, दुराचार, कुटीलता, कपट, कारस्थानं यांचा मागमूस लागत नाही. संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज ही याच व्याख्येतील काही उदाहरणं

मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास अश्या थोर संकल्पनेत रममाण ईशभक्त व्यक्तींमधील भेदाभेदाला जाणत नाहीत. याच संकल्पनेला पुढे नेत समस्त चराचरात ईश्वर पाहणारे ते ईश्वरभक्त,  हीच भक्तांची मांडणी धर्मशास्त्राने जगतापुढे मांडली आणि भारतभूमीने जगताला याचं नित्य प्रत्यंतरही दिलं.

llभोळाभाव जगती जाणतो आत्माll llअवनीवर सर्वत्र जाणिजे परमात्माll. 

या संकल्पनेला मानणारे भक्त साधक श्रद्धाळू हे विनाअपवाद साधे सरळ सन्मार्गी असतात. 

क्रमशः भाग ७ ..... 

|| श्रीमहाबली वीर हनुमान की जय ||
|| संतश्रेष्ठ श्रीसमर्थ रामदास स्वामी यांना सादर वंदन ||

©® संकल्पना व लेखन : प्रसन्न आठवले
०८/११/२०२०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...