Skip to main content

राम अनुज भरत भाग ७

राम अनुज भरत भाग ७

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.

भरत त्याचं दुःखाच्या आवेगात पुढे बोलत होता. 

"तरीही मी जनसामान्यांचं समजू शकतो. परंतु माते तूही, यावर विश्वास ठेवलास. हे भरता धिक्कार आहे तुझ्या अश्या जगण्याला. ज्याची जन्मदात्री आई, कुल विघातक आहे आणि प्रेमस्वरूप माता कौसल्या तिरस्कार करते. पण माते मी तुला आश्वस्त करतो, की यामधे माझी कोणतीही भूमिका नाही आणि सहभाग सुद्धा नाही. 

म्हणून हा रघुकुल भूषण श्रीराम यांचा अनुज तुला खात्री पूर्वक सांगू इच्छितो की, ज्याने हे कृत्य घडवून आणलेले आहे, त्याला जगातील सर्व महानतम पापं भोगावी लागतील. मग ती व्यक्ती कुणीही असो, तिला रौरव नरकाचा मार्ग सुद्धा प्रशस्त होणार नाही. ज्याने या घृणास्पद कृत्यात सहभागी होऊन, सहाय्य भूत भूमिका बजावली आहे, त्या व्यक्तीला, मग तो कोणीही असो, ब्रम्हहत्या,गोहत्या, भ्रूणहत्या, मातृहत्या, निष्पापहत्या व स्त्रीहत्या अश्या सहा घोरातम पापांचा धनी व्हावं लागेल. 

माते मी तुला आश्वस्त करतो की, या घराण्याच्या ब्रिदाचा लाभ घेऊन, ज्याने हे निंदनीय कृत्य आणि हा अक्षम्य अपराध केलेला आहे, त्याला पुढील सर्व जन्मात, कधीही सुख शांती, समाधान, निद्रा, आरोग्य, ऐश्वर्य, समृद्धी लाभणार नाही. मी खात्रीपूर्वक सांगू इच्छितो की अशा प्रत्येक व्यक्तीला, जीने हे घडवून आणलेलं आहे, तिला कल्पांती सुद्धा मुक्ती मिळणार नाही. ज्याने हे घडवलं आहे आणि ज्याने यात सहाय्य केलेलं आहे, त्याचा आत्मा अनंत काळापर्यंत अतृप्तीच्या फेऱ्यात अडकून घोर यातनांनी तडफडत राहील. " 

इतकं बोलून भरताला, प्रवासाचा शीण, अतीव दुःखाचे, धक्के, पिताश्री व प्राणप्रिय भ्राता श्रीराम यांचा विरह, मातेबद्दल क्रोध, उद्विग्नता, अगतिकता, पित्याच्या मृत्यूच प्रचंड दुःख,ज्येष्ठ भ्राता श्रीराम यांच्या वनवासात जाण्याचं दुःख, या सर्व मानसिक आणि शारीरिक भाराने, मूर्च्छा आली आणि तो खाली पडला. त्याचा बोलण्याचा आवेग व त्याच्या रघुकुलाच्या वंशाच्या परंपरेचा आवेश पाहून, मातेला, या सर्व प्रकरणातील त्याच्या निर्दोषत्वाची बालं बाल खात्री पटली. पण त्याच्या मूर्च्छा येऊन पडण्याने, माता काळजीने,खाली बसली आणि त्याचं शिश आपल्या मांडीवर घेऊन, त्याला म्हणाली.

"माझ्या प्रिय पुत्र भरता, उठ. तुझ्याबद्दल माझ्या मनात निर्माण झालेला संदेह, तुझ्या या कथनाने तू दूर केला आहेस. तसही मला खात्री वाटत नव्हतीच की माझा भरत, आपल्या ज्येष्ठ बंधू श्रीराम याच्याबद्दल असा काही विचार कल्पांति सुद्धा करू शकेल. कारण त्याचा रामावर प्राणा पेक्षा जास्त स्नेह आणि ममत्व आहे. आता माझा संदेह आणि मनातील तुझ्या बद्दलचा राग पूर्णपणे दूर झाला."

असं म्हणून तिने भरताच मस्तक हलवून, त्याला उठवण्याचा प्रयत्न केला. बाजूला ठेवलेल्या पात्रातील जल त्याच्या चेहऱ्यावर शिंपडताच, मूर्च्छित भरताने आपले डोळे उघडले. ज्यावेळी त्याने पाहिले की आपण माता कौसल्येच्या मांडीवर आहोत, त्याला अश्रू अनावर झाले. मातेने देखील आपल्या नेत्रातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली. दोघांनीही आपल्या मनातील दुःख भाव आणि अगतिकता यांना वाट मोकळी करून दिली. 

भानावर येताच भरत उठून उभा राहिला आणि त्याने मातेला उभे राहण्यास सहाय्य केले.मातेने उठून, आपल्या पुत्रवत भरताला आपल्या हृदयाशी कवटाळले आणि दोघांनीही पुन्हा आपल्या मनातील स्नेहभावाला वाट मोकळी करून दिली. 

स्नेहयुक्त भावाने, भरताने आपले व मातेचे नेत्र पुसले आणि तो मातेला म्हणाला.

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१५/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...