Skip to main content

राम अनुज भरत भाग ४

राम अनुज भरत भाग ४

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले.
 
सात रात्रीच्या मुक्कमानंतर भरत आणि शत्रुघ्न, अयोध्येत परत आले.राजप्रासादात पोचल्यावर,भरत त्वरेने पिताश्री राजा दशरथ यांना, त्यांच्या कक्षात भेटण्यासाठी जातो, त्यांना शोधतो. अर्थातच ते तिथे नसल्यामुळे, भरत त्वरेने आपली माता कैकयी, हिच्या कक्षात येतो. माता कैकयी साज शृंगारात नसल्यामुळे, आश्चर्यचकित भावाने विचारतो.

" माते, तात कुठे दिसत नाहीत. त्रिभुवन नायक, ज्येष्ठ भ्राता श्रीराम, देवीस्वरुप राजलक्ष्मी सीता आणि लक्ष्मण कुठेही दिसत नाहीत. माते सर्व सुखमय कुशल आणि मंगल आहे ना. मला वाटलं होतं की, माझे परमप्रिय ज्येष्ठ भ्राता नीलवर्णी श्रीराम यांचा, राज्य अभिषेक करण्याची तयारी तातांनी सुरू केली असेल आणि म्हणूनच मला त्वरेने पाचारण करून घेतले आहे. पण यातील काहीच घडलेलं दृष्टीस येत नाही." 

माता कैकयी आपल्या सुवर्णआसनावरून उठून भरताला बसण्यास सांगते. भरत त्याकडे दुर्लक्ष करतो. मातेला पुन्हा तोच प्रश्न करतो. माता कैकयी 

" हे राजकुमार भरत, ज्यांची तू विचारणा करतो आहेस, ते जिथे आहेत, त्या त्या स्थानी सुखरूप आहेत.आणि राज्याभिषेक रामाचा नव्हे तर तुझा होईल. तसे दोन वर मला महाराज दशरथ यांनी दिले होते आणि त्यांनी त्यांचं प्राणपणाने पालन केलं. रघुवंशीय परंपरा त्यांनी मोडली नाही. पण जाताना त्यांनी अर्थातच एका वराने, रामा ऐवजी तुला राज्याभिषेक व्हावा, हे मान्य केलं आणि दुसऱ्या वराने, त्यांनी रामाला वनवासात जाण्याची आज्ञा केली."

जातांना या शब्दाने आणि मातेने सांगितलेल्या घटनांनी, वज्राचा आघात व्हावा, त्याप्रमाणे भरत दिग्मुढ झाला. क्षणात कानावर आलेल्या या अकल्पनीय वार्तेच्या धक्क्याने, भरत मागच्या मागे, जमिनीवर पडला आणि असहाय्यतेने टाहो फोडून रडायला लागला. त्याला त्या अवस्थेतून भानावर आणण्यासाठी, माता कैकयी म्हणाली.

" हे पुत्रा, तुला राज्यावर बसवण्यासाठीच हा सर्व योग विधात्याने घडवून आणला आहे. घडणारे तर घडून गेलं. पण आता या राज्याला, फार काळ स्वामी रहित ठेवता येणार नाही. त्यामुळे तू लवकरात लवकर यातून स्वतःला सावरून, या विशालकाय, रघुवंश परंपरेची सूत्र आपल्या हाती घ्यावीस." 

साश्रू नयनांनी आणि आघात स्थितीत असलेला भरत तिला मधेच थांबवत, प्रश्न करतो. 

" पण तातांच देहावसान कस काय झालं. त्यांना अचानक काही आजार उद्भवला, की त्यांची हृदय क्रिया अचानक बंद झाली. काय कारण घडल की, या सर्व आघातात तो आघात सुद्धा आमच्या हृदयावर घाला घालून गेला." 

कैकयी त्याला यातून सावरण्याची विनंती वारंवार करते. पण भरत आपल्या प्रश्नावर ठाम असतो. नाईलाजाने, कैकयी, भरताला सांगते. 

श्रीराम जयराम जय जयराम!! 
श्रीराम राम भरताग्रज राम राम !!! 

ही लेखमाला कॉपी राईट नोंदणीकृत आहे. त्यामुळे तिचा प्रसार व प्रचार नावासकट करावा, ही नम्र विनंती. 

©® संकल्पना, संकलन आणि लेखन : प्रसन्न आठवले
१२/०६/२०२३
9049353809
9960762179

Comments

Popular posts from this blog

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३

गीत विश्लेषण 'कैवल्याच्या चांदण्याला ' भाग ३ संपूर्ण गीत कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर बालवयी खेळी रमलो, तारुण्य नासले वृद्धप...