ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास ७६
भरत पुढे सांगतो.
"आपल्या राज्यात आपल्या पुण्यप्रभावामुळे लोकांची व्रुत्ति अत्यंत सतशील झाली आहे. वाईट , नकारात्मक व हीन व्रुत्तिचे वा प्रवृत्तिचे लोक खुप कमी अथवा नगण्य उरले आहेत. किंबहुना जे आहेत ते हळू हळू सुधारून समस्त जनमानस उत्तम गुणयुक्त होतील. त्याचाच परिणाम म्हणून पुढील उपजणारी संतति उत्तम निपजेल हाच होरा आहे.
महाराज आपले शेजारील राज्यांशी हितसम्बन्ध हे पूर्वीपेक्षाही उत्तम झाले असून त्याच्या परिणामार्थ राज्या राज्यातील व्यापार उदिम तसेच लोकांची आवक जावक यात खुप सुधारणा झाली आहे. आपल्या प्रभावामुळे व पराक्रमा मुळे आपण अनेक नवीन मित्र राज्य जोडली आहेत. त्याचप्रमाणे जी राज्य आपला द्वेष करत होती त्यानी आपणहून नरमाईच धोरण स्विकारून आपल्याशी संबंध सुधारण्याचे प्रस्ताव पाठवले आहेत.
या सर्वांचाहि अभ्यास होत आहे. आपले मंत्रीगण त्यावर विचार करून मंगच ते आपल्याकडे घेऊन येतील. तसेच गुप्तहेरखात्यामार्फ़त त्यांच्यां मनोवृत्तितिल बदल अभ्यासला जात आहे. त्याचाही पूर्ण विमर्श आपल्याप्रत पोचवण्यात येईल.
लोकांच्या या मनोवृत्तितिल बदलाचा स्वाभाविक परिणाम सांस्कृतिक ऊंची वाढण्यावर झाला आहे आणि होत आहे. लोकांची बौद्धिक व्रद्धि सुद्धा जाणवत आहे. तसच आपसात कोणतेही तणाव , तंटे , बखेड़े हे मुळातच कमी झालेत आणि जे थोडे फार घडत आहेत ते समोपचाराने तसेच वरिष्ठांच्या सल्याने सहज सुटत आहेत. एकूणच जनसामान्याच राहणी मान, दर्जा, मानसिक, पारिवारिक, साम्पत्तिक स्थिति उत्तम आहे. परराज्याशी संबंध सौहार्दाचे आहेत. लोक रामराज्याचा खऱ्या अर्थी आनंद घेत आहेत.
याउप्पर बाकीं सर्व क्षेम , कुशल आणि सुमंगल आहे. आपली अजून काही जाणून घ्यायची मनीषा असल्यास आज्ञा व्हावी मी त्वरेने त्याचा व्रुत्तान्त आपल्याप्रत पोचवण्याचा यत्न करीन.
इतक्यात प्रतिहारीं प्रणाम करतो आणि म्हणतो की,
"महाराज काही ऋषि व मुनिवर आलेत आहेत."
"कोण आहेत ते"
भरत उत्तरतो
"महाराज मी बघून येतो आणि आपल्याला सांगतो."
भरत थोड्याच वेळात येतो आणि सांगतो की,
" ऋषिवर श्री कौशिक, यवक्रीत, गार्ग्य, गालव, मेधातिथि पूर्वेकड़ून, स्वस्त्तात्रेय, नमुचि , प्रमुची, अगस्त्य, दक्षिणे कडून नृषदगु , कवषी, धौम्य, सशिष्य पश्चिमेकडून आणि वसिष्ठ (दूसरे), कश्यप, अत्रि(दूसरे), विश्वामित्र, गौतम, जमदग्नि, भारद्वाज उत्तरेकडून आले आहेत आणि आपल्याला ते भेटू इच्छितात. मी त्याना अतिथिगृही घेऊन जातो आणि उद्या प्रथम प्रहरी आपल्या भेटिस घेऊन येतो. पण त्याना आपल्याशीच बोलावयाचे आहे. तद्वत आपण सभागृहाऐवजी एकांतात भेट घ्यावी. मी त्यांची निवासाची आणि जलपान तसेच भोजनाची व्यवस्था बघतो. आज्ञा असावी"
" ठिक आहे तर उद्या प्रथम प्रहरी त्याना खाजगी सभागृहात सोडुन मग आम्हास कळव.आम्ही एकांतात भेटू त्याना"
ll श्रीराम श्रीराम श्रीराम ll
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
जय श्रीराम
Comments
Post a Comment