Skip to main content

Posts

आत्मचिंतन भाग ७

आत्मचिंतन भाग ७    सहाव्या लेखात म्हटलं त्याप्रमाणे, देह गेल्यावर, आत्म तत्त्व हे आपला हिशोब मांडून घेण्यासाठी,त्या व्यवस्थेपुढे जाते.किंबहुना तिला बळजबरीने नेलं जातं.याचं महत्वाचं कारण म्हणजे, देहात मनाची झालेली गुंतवणूक आणि ही गुंतवणूक आत्म्याला,अनेक कारणां साठी,मागे खेचण्याचा प्रयत्न करते. म्हणजे, काही राहिलेले हिशोब, काही करावयाच्या गोष्टी, काही करत असलेल्या, पण अर्धवट राहिलेल्या गोष्टी.  याव्यतिरिक्त, मोहाचे, लोभाचे, वासनेचे, कुसंस्करांचे, व्यक्तिगत हेवेदावे यांचे, अहंकार,अहंगंड, दुराभिमान, दंभ, दुर्भावना, दुराग्रह, काही मनात योजलेल्या, तिरस्कार, राग, क्रोध यांच्या आठवणी, मान अपमान, दुःख, सुख यांच्या आठवणी, ठरवलेल्या पण साध्य न होऊ शकलेल्या योजनांचे आलेख इत्यादी बरंच काही, मन साठवून ठेवतं आणि ज्ञात वा अज्ञात कोणत्याही अवस्थेत देह त्याग घडल्यानंतर, मन देहाला आणि आत्मा मनाला घट्ट चिकटून राहतात आणि देह न सोडण्याच्या वासना व भावना, अंतकाळी तीव्र असतात.  म्हणजे आधीच, देह न सोडण्याची तीव्र भावना, त्यात आपल्या आत्म्याला म्हणजेच खरतर आपल्याला, घडलेला हिशोब, ईश्वरी व्यवस...

आत्मचिंतन भाग ६

आत्मचिंतन भाग ६    या पाच लेखात एक गोष्ट मनावर बिंबवली गेली असेल ती म्हणजे, आपला खरा हिशोब हा मृत्यू पश्चात होणार आहे आणि या देहात असताना, जे काही कमावलं आहे किंवा गमावलं आहे, त्याचा संबंध फक्त देहापुरता आहे आणि तो इथेच सोडून जायचं आहे. देह असताना, तो चालावा, नीट सुस्थितीत ठेवता यावा व शेवटपर्यंत तो सुस्थित रहावा, यासाठी जे आवश्यक आहे, ते केलं गेलं पाहिजे. म्हणजे देह उत्तम रहावा आणि उत्तम शरीर स्वास्थ्य व मन:स्वास्थ्य असावं, हा उद्देश असण्यात काही गैर नाही. पण त्यासाठी ज्या तडजोडी करायच्या आहेत तितक्याच केल्या जाव्यात, जेणेकरून, कधीही पश्चात्ताप करावा लागता कामा नये. तसही जो ताप नंतर अर्थात पश्चात बुद्धीने येतो आणि मनाला, बुद्धीला व आत्म्याला न्यून अथवा ताप देतो, त्याला आपल्या संचित गाठोड्यात बांधून घेऊ नये. यदाकदाचित अशी गोष्ट अनावधानाने, अनिच्छेने, मनाविरुद्ध तडजोड म्हणून करावी लागली, तर तो आपल्या पूर्वकर्म दोष होता, असे जाणावे आणि लक्षात आल्या पश्चात, त्याबद्दल ईश्वराकडे क्षमेची व करुणेची याचना करावी.  आपण वाचलं किंवा ऐकलं असेल तर, अनेक संत महंत कळत वा नकळत काही अपराध...

आत्मचिंतन भाग ५

आत्मचिंतन भाग ५   मृत्यू पश्चात आपला हिशोब कसा असावा, याचा विचार माणूस तोपर्यंत करत नाही, जोपर्यंत मृत्यू साक्षात समोर येत नाही. कदाचित त्याही वेळी, हाच विचार मनात येत असावा की,मी काय कमावलं किंवा काय गमावलं म्हणजे पुन्हा बेरीज वा वजाबाकी. म्हणजे पुन्हा व्यापारी हिशोब. पण हा व्यापारी हिशोब वरती किंवा जिथे कुठे ही कर्माच्या हिशोबांची उजळणी होते, त्या ठिकाणी होत नाही. तर तिथे किंवा त्या व्यवस्थेत, कर्म, ज्ञान आणि भक्ती, या तीनच मोजमापात आत्म्याच्या त्या देहातील जन्माचा हिशोब होतो.  त्यावर आधीच्या संचीतातील किती ठेव वा देणी शिल्लक आहे, ते मिळवून, एकूण ताळेबंद मापला जाऊन, त्यातून पुढे या जीवाला काय भोगायचे किंवा उपभोगायचे आहे ते काढले किंवा ठरवले जाते. म्हणजे आपण एखाद्या जन्मात मौज मजा आणि नुसती धमाल केली असेल तर, त्यानुसार आधीच्या संचीतातील ठेवीमधे घट होऊन, पुढील जन्मी फक्त आणि फक्त भोग अर्थात देणी शिल्लक राहू शकतात.  नक्कीच आपल्यासमोर, आत्मा देह सोडून गेल्यावर, हा हिशोब, होत असणार. म्हणजे तिथे आपल्याला नक्कीच आपल्या त्या आणि आधीच्या जन्मांची शिलकी समजत असेल. चैतन्य रुपात अस...

आत्मचिंतन भाग ४

आत्मचिंतन भाग ४    मागच्या भागातील मुद्दा जरा विस्ताराने अभ्यासून पुढे जाऊ. माणसाने गेल्या पन्नास ते पंचाहत्तर वर्षात जी वैज्ञानिक प्रगती केली आहे.त्यातील एक महत्वाची प्रगती म्हणजे या आकाशगंगेत असलेल्या इतर ग्रह, इतर विश्व आणि त्याही पुढे असलेल्या इतर आकाशगंगा यांचा शोध घेण्यासाठी अनेक यांनं पाठवली आहेत. या सर्वांचा मुख्य आदर हा प्रकाशाची गती आणि ध्वनीची गती हाच आहे. म्हणजे सरतेशेवटी या दोन गोष्टी, या विश्वाला भेदून पुढे जाऊ शकतात हे विज्ञानाने मान्य केलं आहे. म्हणजेच प्रकाश आणि ध्वनी यांच्या लहरी अमर किंवा अमर्त्य आहेत. अर्थात त्यांच्या लहरी या आपलं स्वरूप बदलू शकतात आणि आसमंतात विरून जातात, पण अस्तित्व टिकवून असतात. असं वाचण्यात आलेलं आहे की, कदाचित याच तत्वाचा आधार घेऊन, काही जर्मन शास्त्रज्ञ, या आधी घडून गेलेल्या भगवदगीता कथनाचा प्रभूंच्या आवाजाचा वेध घेऊन,त्यांना पुन्हा साठवण्याच्या प्रयोगाचा अभ्यास करत आहेत.  पण एक नक्की की, कोणत्याही लहरी या एकदा निर्माण झाल्या की, नष्ट होत नाहीत. मर्त्य जगतात सुद्धा अनेक गोष्टीतून आणि अनेक कारणांनी निर्माण झालेल्या लहरी, अमर्त्य अ...

आत्मचिंतन भाग ३

आत्मचिंतन भाग ३   या जगात आणि जगताबाहेरील ब्रम्हांडात किंवा ज्ञात वा अज्ञात जगतात, वैकुंठात कुठेही, जे काही आहे, त्यामागे कार्यकारण भाव तर आहेच. पण प्रत्येक अणू मागे, काही वैज्ञानिक, शास्त्रीय कारण आणि पद्धती, व्यवस्था किंवा इंग्रजीत ज्याला system म्हणतात,ती या सर्वांचा आधार आहे.म्हणजे व्यवस्थेने चालत नाही,अशी गोष्ट अस्तित्वात नाही. इथेही नाही किंवा कोणत्याही लोकात नाही. याचं आधारावर नक्कीच हे म्हणता येईल की, मृत्यूपश्चात सुद्धा हिशोबाची काही पद्धत अस्तित्वात असणार. पण आता जर आपल्या कर्माच्या हिशोबाचा विचार केला तर, या जगतात अस्तित्वात असलेली आणि मृत्यूपश्चात पुढे जाणारी गोष्ट म्हणजे आत्मा. आपल्या हातून काया, वाचा मन व बुद्धी या चारही माध्यमाने घडलेली, घडणारी सर्व कर्म, आत्म्याच्या द्वारे एकतर, हिशोबासाठी पुढे पाठवली जात असतील, अगदी घडते वेळी. म्हणजे आत्म्यामध्ये सूक्ष्मातील सूक्ष्म रुपात, त्यांना साठवण्याची कुठलीतरी व्यवस्था असली पाहिजे.  किंवा आत्म्याला अश्या कुठल्यातरी व्यवस्थेने वा व्यवस्थेला जोडलेलं असणार, जी व्यवस्था या सर्वांचा हिशोब ठेवते. त्या व्यवस्थेपर्यंत पोचणारी ए...

आत्मचिंतन भाग २

आत्मचिंतन भाग २ मानवी देहात असताना आपण फक्त आणि फक्त देहाचा विचार केला, या गोष्टीला आठवून आत्मा, पश्र्चाताप पावतो. हा प्रत्येक क्षण होणारा पश्र्चाताप, खरतर आत्म्याला दाह देतो. हा दाह वा याचा अग्नी, वास्तविक अग्नी सारखा नसला तरीही, तो आत्म्याला नित्य जाळणारा असतो. आपण नैनं छिंदंती शस्त्राणी..... हे वचन वाचलं, ऐकलं आणि जाणलं आहे. पण तरीही मी, आत्म्याचा दाह होतो,असं का म्हणतोय, याचा विचार करूया. भुलोकीच्या पंचतत्वातील अग्नी, जल, वायू, आकाश हे नक्कीच आत्म्याला काहीही करू शकत नाहीत. अगदी भुलोकीच्या गुरुत्वाकर्षण सारख्या कोणत्याही शक्तीचा सुद्धा त्यावर परिणाम होत नाही. कारण त्यांचा अधिकार फक्त पंचमहाभूतरूप देहापुरता आहे. देह संपला की, त्यांचं कार्य, अधिकार आणि उद्देश तिन्ही समाप्त होतं आणि ते पुन्हा आपल्या स्थानी विलीन होतात. त्यामुळे भगवंत जे सांगतात ते संपूर्ण सत्य आहे, ते या अर्थाने.  याचं विषयावर चिंतन करतांना, एक प्रश्न नेहमी मनात यायचा की, नरकात आत्म्याला ज्या यातना दिल्या जातात असं आपण वाचतो, त्या आत्म्याला कश्या काय, स्पर्शू शकत असतील, किंवा त्रास देऊ शकत असतील. कारण श्रीमद् भ...

आत्मचिंतन भाग १

आत्मचिंतन भाग १ (नवीन मालिका)  खरतर मृत्यू आणि त्या पलिकडील जगत हा अनंत कल्पनांचा विषय आहे. ज्याची कल्पना मानवी मनाच्या उद्दाणा पलीकडे आहे. मानवाचा प्रवास हा सप्तलोकां तून स्वर्ग लोकाकडे होतो. पण कर्माच्या गतीनुसार तो, सप्त पाताळ या कडे सुद्धा होऊ शकतो.भुलोकीचं जीवन हा या अनंत प्रवासातील, मात्र एक टप्पा आहे. पण त्यातच अनेक जीव इतके गुरफटून गेलेले असतात की, त्यांना पुढच्या प्रवासासाठी, वेळ, विचार आणि कर्म, तीनही, असाध्य असतं.  मानवी देहातील जन्मात इंद्रिय, अवयव, बुद्धी, देह, वाचा जिव्हा इत्यादी कर्म इंद्रिय आणि ज्ञान इंद्रिय प्राप्त असतात. त्याचा उपयोग जास्तीतजास्त ग्रहण करून, जतन करत, कर्माचा आलेख पुढे पुढे न्यायचा असतो. हा कर्माचा आलेख जितका चढता असेल (अर्थात उच्च पातळीवर जाण्यासाठी) तितका त्या देहातील आत्मा, पुढच्या पायरीकडे जाण्याची शक्यता आणि शाश्वती अत्याधिक असते. मानवी जन्मात. दिलेली कर्म, ज्ञान इंद्रिये, बुद्धी, मन ही विस्तारित इंद्रिये, पुढील कोणत्याही स्थितीत वा अवस्थेत असतं नाहीत. म्हणजेच याचा दुसरा अर्थ हा की, मानवी देहाच्या सहाय्याने, मानवी देहातील मन व त्याला जोडल...