Skip to main content

Posts

अध्यात्म विराम १७१

अध्यात्म विराम १७१    नामाच्या महतीसाठी कित्येक उदाहरणं देता येतील. प्रत्यक्ष भक्त प्रल्हाद, देवर्षी नारद, महर्षी वाल्मिकी, भक्त सूरदास, संत कबीर, संत मीराबाई, महाराष्ट्रातील महान संत परंपरा, विभिषण इत्यादी अनेकानेक दाखले देता येतील. यांनी फक्त ईश्वर नामाच्या स्मरणात आपल्या देहासह आत्म्याचा उद्धार करवून घेतला. पण या सर्वांचं एक समान सूत्र आहे. ते सूत्र म्हणजे देहाच्या, संचिताच्या आणि प्रारब्धात आलेल्या कोणत्याही भोगाला, त्यांनी अव्हेरलं नाही. आलेल्या भोगात त्यांनी कधीही सूट, कपात वा पळवाट मागितली नाही. त्यांनी प्रपंचातील अनेक अकल्पनीय व अपरिमित दुःख, भोग सहन करताना, कोणतीही पक्रार केली नाही. किंबहुना आपल्या दुःखाच्या भोगाच्या अस्तित्वामुळे आपल्याला ईश्वरी नामाच्या साधनेचं स्मरण होतं आणि आपण त्या दुःख भोग यांमुळे हे ईश्वरी स्मरण अखंड करू शकतो,याची जाणीव त्यांच्या मनात नित्य  असायची. किंबहुना ते दुःख हाच आपल्या साधनेचा प्राण आहे, हीच त्यांची नित्य भावना होती. महाभारतात आपण जाणतो की, कुंती मातेने, श्री कृष्णाकडे अपार दुःख आणि भोग मागितले. कारण त्याच काळात, या दुःख व भोग यांम...

वर्षा

आषाढात तो रोरावत आला काळया मेघांचा  थवा आला सूर्य नारायण लुप्त झाले गर्द अंधार दिवसाही दाटला टपोऱ्या थेंबांनी ओलावलं  अंग भिजून शहारलं धरेला  आकाशाच्या प्रेमवर्षावाने  अवघा निसर्ग रोमांचित झाला थेंबाथेंबातून वर्षा ऋतुचा बहर जणू ओतप्रोत भरला पाना पानावर ओलाव्याचा हिरवा रंग चौफेर पसरला निसर्गाच्या सुंदर खेळाचा आषाढात प्रारंभ झाला  आषाढात प्रारंभ झाला ©® कवी : प्रसन्न आठवले ३०/०४/२०२३

अध्यात्म विराम १७०

अध्यात्म विराम १७०   प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, यांच्या अवताराआधी पासून, कैलास पती भगवान शंकर, हे नित्य, अविरत,ध्यान आणि जागृत अवस्थेत कोणतं नाम जप करतात, असा प्रश्न, एकदा, माता पार्वतीने भगवान शंकरांना केला. या प्रश्नाने अती प्रसन्न होऊन, त्यावर उत्तर देताना,  राम जन्माच्या युगानु युगे आधीच, भगवंतांनी मातेला उत्तर दिलं की, ते श्रीराम नामाचा जप अविरत आणि अखंड करतात. म्हणजेच श्रीराम जन्म ही एक औपचारिकता होती. पण त्यांचं नाम हे त्याही आधीपासून होतं आणि त्यानंतरही, युगांता पर्यंत ते असणार. याचाच अर्थ सगुण रूप व देहातील अस्तित्व हे क्षणमात्र आहे आणि असणार.  कारण विश्वाच्या करोडो वर्षांच्या परिघात, आपल्या देहातील अस्तित्वाची काही वर्षे, हे नगण्य समीकरण आहे. पण ईश्वराच्या सगुण रुपातील नामाचं अस्तित्व अखंड आणि अनंत काळापर्यंत असणार आहे. आता ईश्वराच्या राम अवतारा आधीपासून जर श्री शंकर, त्या नामाच्याच प्रभावाने आपलं तेज, ओज आणि शक्ती सुद्धा आहे,असं दृढ अभिमानाने,माता पार्वतीस सांगतात. याचं एक अर्थ असा होतो की, अगदी अवतार होऊन, प्रत्यक्ष प्रभू कार्य आणि त्याची देहातील प्रभा, या भूलोक...

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा होऊ नको अवकृपा ठेव हात मस्तकी देवा राहो सदा श्रद्धा माझी तुझिया वरी दयाळा  मी दुःखी न करावे कोणा इतकेच दान दे मज देवा मन बुद्धी अन हा देह विवेकाने करो कर्म देवा तुज नित्य स्मरून करणे जमुदे, मज प्रपंच हा माझा अभिमान अन् अहं हा मानीन शत्रू सदासर्वदा कल्पून तुज सखा मी सांगेन सर्व भाव देवा घडूदे नामस्मरण तुझेच इतुके करवून घे देवा मानून मज तुझा दास चरणी राहूदे मज देवा उन्ह पावसात राहूदे हात माथ्यावरी देवा स्मरणात तुझ्याच जगणे स्मरणात श्वास श्वास जावा  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा ©® कवी : प्रसन्न आठवले २९/०४/२०२३ 9049353809 9960762179

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना

ईश्वर चरणी नित्यप्रार्थना  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा होऊ नको अवकृपा ठेव हात मस्तकी देवा राहो सदा श्रद्धा माझी तुझिया वरी दयाळा  मी दुःखी न करावे कोणा इतकेच दान दे मज देवा मन बुद्धी अन हा देह विवेकाने करो कर्म देवा तुज नित्य स्मरून करणे जमुदे, मज प्रपंच हा माझा अभिमान अन् अहं हा मानीन शत्रू सदासर्वदा कल्पून तुज सखा मी सांगेन सर्व भाव देवा घडूदे नामस्मरण तुझेच इतुके करवून घे देवा मानून मज तुझा दास चरणी राहूदे मज देवा उन्ह पावसात राहूदे हात माथ्यावरी देवा स्मरणात तुझ्याच जगणे स्मरणात श्वास श्वास जावा  ठेवून माथा तव चरणी मागेन हे दान मी देवा ©® कवी : प्रसन्न आठवले २९/०४/२०२३ 9049353809 9960762179

अध्यात्म विराम १६९

अध्यात्म विराम १६९ नाम हे मुळात हळूहळू मनात झिरपत जातं. नाम हे ठिबक सिंचन या नैसर्गिक प्रकारातील आहे. ते सतत आणि शांत चित्ताने घेत गेल्यास, अत्यंत सावकाशपणे ते मनातील सर्व कप्प्यात प्रवेश करतं. त्याच्या परिणाम रूपाने, मनातील अनेक नकारात्मक, विकारी, वासनामय केंद्रे हळूहळू परावर्तित होऊन शांत होतात किंवा सकारा त्मक स्वरूपात बदलतात. मुळात नाम हे मनाला स्थिरता देतं, ज्यामुळे मनाला चिंतनाची सवय लागते. चिंतन हे प्रत्येक व्यक्तीला अत्यंत जरुरीचं आहे. चिंतन माणसाला विचार प्रवृत्त करतं. योग्य चिंतन माणसाला हळूहळू योग्यतेकडे नेते.  एकदा विचारांची सवय स्थिर मनाला लागली की, त्या मनाला चांगलं व वाईट, उत्तम व हीन, योग्य व अयोग्य, काम्य व आवश्यक, वासना व नैसर्गिक गरज या सर्वांचा विचार करायची सवय लावते. त्यायोगे माणूस, प्रत्येक इच्छा मनात उत्पन्न झाल्यावर, ती कृतीत उतरवण्या आधी,त्यावर चिंतन करतो.त्या वासनेची, इच्छेची आवश्यकता किती आहे, खरच आपली ओढ, आकर्षण हे सुयोग्य आहे की आता  याची आवश्यकता नाही. असे अनेक प्रकारचे चिंतनशील विचार मनामध्ये तेंव्हाच येऊ शकतात, ज्यावेळी मन असं चिंतन आणि असे विचा...

अध्यात्म विराम १६८

अध्यात्म विराम १६८ ज्याच्या सततच्या उच्चारणाने भवादी सारे ताप, दैन्य दूर होतं आणि प्राणी जन्मजन्माच्या बंधनातून विमुक्त होतो, त्या उच्चारणाला नाम म्हटल जातं. नाम हे मुळातच निर्गुण आणि निराकार आहे. ते अनादी आणि अनंत आहे. याच्या महतीसाठी आणि ती गाण्यासाठी, ती सांगण्यासाठी कित्येकांनी आपले जन्म वेचले आहेत. याच नामाच्या ध्यानात साक्षात श्रीशंकर निमग्न होऊन, समाधिस्थ स्थितीत हजारो वर्ष सहजी ध्यानात असतात. याचं नामाच्या सामर्थ्याने रावणाचे पापांचे पर्वत जळून, रावण देह समाप्ती पश्चात, वैकुंठाला गेला.  नामात निर्गुण तत्व असल्या कारणाने, नाम घेणाऱ्यांना, त्यांच्या वैचारिक, सांपत्तिक, चित्ताची शुद्धता या कसल्याही गुण अवगुणांना न पाहता, ते नाम उचित लाभ प्राप्त करून देते. नाम निर्गुण निराकार असल्याकारणाने निरपेक्ष असतं. त्यामुळे भावातीत असतं. घेणाऱ्याला त्याच्या देहाच्या, बुद्धीच्या, इंद्रियादी जडतत्वांच्या कोणत्याही मर्यादा वा बंधनं यांचं आवरण न पडता, नाम आपलं सर्व कार्य सुलभतेने पार पाडतं. नाम हे सर्वार्थाने परिपूर्ण तत्व असल्यामुळे, नाम घेणाऱ्याच्या सर्व अपूर्णता, ते नाम पूर्ण करून देतं. ...