Skip to main content

वर्षा

आषाढात तो रोरावत आला
काळया मेघांचा  थवा आला

सूर्य नारायण लुप्त झाले
गर्द अंधार दिवसाही दाटला

टपोऱ्या थेंबांनी ओलावलं 
अंग भिजून शहारलं धरेला 

आकाशाच्या प्रेमवर्षावाने 
अवघा निसर्ग रोमांचित झाला

थेंबाथेंबातून वर्षा ऋतुचा
बहर जणू ओतप्रोत भरला

पाना पानावर ओलाव्याचा
हिरवा रंग चौफेर पसरला

निसर्गाच्या सुंदर खेळाचा
आषाढात प्रारंभ झाला 
आषाढात प्रारंभ झाला

©® कवी : प्रसन्न आठवले
३०/०४/२०२३

Comments