Skip to main content

अध्यात्म विराम १७०

अध्यात्म विराम १७०
 
प्रत्यक्ष प्रभू श्रीराम, यांच्या अवताराआधी पासून, कैलास पती भगवान शंकर, हे नित्य, अविरत,ध्यान आणि जागृत अवस्थेत कोणतं नाम जप करतात, असा प्रश्न, एकदा, माता पार्वतीने भगवान शंकरांना केला. या प्रश्नाने अती प्रसन्न होऊन, त्यावर उत्तर देताना,  राम जन्माच्या युगानु युगे आधीच, भगवंतांनी मातेला उत्तर दिलं की, ते श्रीराम नामाचा जप अविरत आणि अखंड करतात. म्हणजेच श्रीराम जन्म ही एक औपचारिकता होती. पण त्यांचं नाम हे त्याही आधीपासून होतं आणि त्यानंतरही, युगांता पर्यंत ते असणार. याचाच अर्थ सगुण रूप व देहातील अस्तित्व हे क्षणमात्र आहे आणि असणार. 

कारण विश्वाच्या करोडो वर्षांच्या परिघात, आपल्या देहातील अस्तित्वाची काही वर्षे, हे नगण्य समीकरण आहे. पण ईश्वराच्या सगुण रुपातील नामाचं अस्तित्व अखंड आणि अनंत काळापर्यंत असणार आहे. आता ईश्वराच्या राम अवतारा आधीपासून जर श्री शंकर, त्या नामाच्याच प्रभावाने आपलं तेज, ओज आणि शक्ती सुद्धा आहे,असं दृढ अभिमानाने,माता पार्वतीस सांगतात. याचं एक अर्थ असा होतो की, अगदी अवतार होऊन, प्रत्यक्ष प्रभू कार्य आणि त्याची देहातील प्रभा, या भूलोकी अवतीर्ण होण्या आधीपासून, त्यांच्या नामाची प्रभा व त्या प्रभेचा परिणाम आपलं कार्य करतच होता, हेच यातून सिद्ध होतं. 

म्हणजेच प्रत्यक्ष भगवंत या भुलोकि असोत वा नसोत, त्यांच्या नामाच्या सहाय्याने, त्यांचं तेज, त्याचा प्रभाव आणि त्यामागील शक्ती कार्यरत होतीच. आता दुसरी बाजू पाहूया. प्रत्यक्ष अवतार समाप्ती पश्चात, भगवान शंकरांनी आपल्या नित्य जपाचं नाम बदललं असणार का, तर नक्कीच नाही. म्हणजेच अगदी अवतार प्राप्ती आधी आणि अवतार समाप्ती पश्चात सुद्धा त्याच नामाचा प्रभाव अजूनही भगवान शंकरांसाठी, तितकाच प्रभावी आणि सिद्ध आहेच. आचाच अर्थ सगुणातील अस्तित्वा नंतरही ईश्वरी नामाच्या माध्यमातून, ईश्वराची ऊर्जा, शक्ती आणि लहरी यांचा प्रभाव असतो आणि अनंता पर्यंत असणारच. 

अजून एक चिंतन करूया. प्रत्यक्ष रुद्र अवतारी श्रीहनुमंत अखंड श्रीराम नामाचा जप करतात, हे आपण जाणतोच. तेसुद्धा आपल्या प्रत्येक क्षणाचं,नव्हे तर श्वासांचं अस्तित्व याचं श्रेय सुद्धा फक्त आणि फक्त स्वामी श्रीराम यांनाच देतात. अर्थात ते सत्य आहेच. कारण हनुमंता सारखा ईश्वर अवतारी आणि रामाचा दास असत्य कथन करणार नाही. म्हणजे आपल्या हातून घडलेल्या अशक्यप्राय कर्तृत्वाचं श्रेय विनाकारण आपल्या उपास्य दैवताला, निव्वळ एक उपचार म्हणून देणार नाही.कारण त्रेतायुगात अश्या प्रकारचं मिथ्या श्रेय दिलेलं हनुमंताला रुचणार नाही आणि प्रभूना सुद्धा पटणार नाही. 

म्हणजेच त्या नामाच्या पाठी त्या नामाची अकौकिक शक्ती नक्कीच कार्यरत असते. मानवी अवतार रुपात भूलोकि असलेले प्रभू, वास्तविक कोणतीही गोष्ट स्वतः करायला सक्षम होते.पण तरीही मर्यादाचं पालन करताना सुद्धा, वीर हनुमंताला त्याने घेतलेल्या नामाच्या बदल्यात, अलौकिक कार्य करण्याची प्रेरणा, चैतन्य आणि शक्ती प्रभूंनी प्रदान केली. याचाच अर्थ ती शक्ती, ते तेज आणि ते कार्य निव्वळ नामाच्या सामर्थ्याचा प्रभाव होता. यामधे दुमत असण्याचं करणं नाही. 

इतक्या अखंड नाम घेणाऱ्या श्री शंकर व श्री हनुमान याना फक्त आणि फक्त अखंड नामाच्या बळावर प्रभूंच्या असीम कृपेचा लाभ प्राप्त होऊन, प्रभू कार्यार्थ त्यांना आपली सेवा देता आली. इतका प्रभाव त्या नामाचा आहे. या दीर्घ चिंतनातून एक गोष्ट नक्कीच सिद्ध होते की, कैलास पती असोत किंवा वानर रुपातील हनुमंत असोत, त्यांनाही आपल्या अलौकिक कार्याची प्रेरणा, चैतन्य व शक्ती यासाठी नामाच्या प्रभावाची आवश्यकता भासली आणि त्या नामाच्या तेजाने, साधनेने प्रत्यक्ष ईश्वराला आपल्या शक्तीचा प्रभाव, त्या दोन दासांच्या कार्याला द्यावा लागला. इतका गहन आणि सखोल अर्थ, या दोन्ही राम भक्तांच्या अखंड नाम जपाचा आहे. 

उद्या, याचं विषयात अजून काही दाखले व दृष्टांत पाहून, हा विषय समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. 

क्रमशः
श्रीकृष्णार्पणमस्तू!! 
©® संकल्पना, विचार व लेखन : प्रसन्न आठवले
२९/०४/२०२३
9049353809 व्हॉट्सॲप
9960762179

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...