Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ६०१

भोग आणि ईश्वर  ६०१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) काल मी जो विषय मांडला, त्यावर पुढे चिंतन सुरू करूया. मूळ मनाची प्रवृत्ती ही, कोणत्यातरी संचितातून किंवा प्रसंग वा अनुभव उपरांत तयार झालेली असते. जन्मतः एखादी प्रवृत्ती असते, ती गर्भसंस्कार किंवा पूर्वजन्म संस्कार अश्या कोणत्या तरी संस्कारातून आलेली असते. म्हणजे मनावर काही संस्कार घडलेले किंवा घडावे असं काही आधी पाहिलेलं, ऐकलेलं आणि मनावर खोल रुजलेल असेल, तरच त्यातून प्रवृत्ती तयार होऊन, माणूस काही मानसिक भूमिका घेतो. हे झालं खोल रुजलेल्या संस्कारी मनाबाबत अर्थात सखोल प्रवृत्ती बाबत. यामधे आस्तिक, नास्तिक दोन्ही आले. याविपरित काही व्यक्ती उथळ प्रवृत्तीच्या असतात. म्हणजे त्यांचं वागणं, बोलणं, कर्म करणं, निर्णय घेणं हे प्रसंगावर, त्या प्रसंगाच्या मानसिक स्थितीवर आणि त्या स्थितीचा त्यांच्या मनात तयार झालेला आलेख व परिणाम यांचा संयुक्त परिणाम यांवर अवलंबून असतं. म्हणजे यांची मनोभूमिका ही प्रसंगोपात बदलती, दोलायमान अशी असू शकते. पण या दोन्ही प्रकारच्या लोकांतून आपल्या निर्मात्यावर विश्वास दाखवणारी श्रद्धाळू आणि अविश्वास दाखवणारी आणि नास्...

भोग आणि ईश्वर ६००

भोग आणि ईश्वर  ६०० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    आज अखंडित ६०० दिवस लिहिण्याचा एक वेगळाच आनंद आहे. खरा पाहिलं तर, दडपण हे पहिले १०० ते १५० दिवस होतं. त्यानंतर, मात्र एका वेगळ्याच भूमिके तून आणि वेगळ्या पातळीवर ही लेखमाला गेली. मुळात या लेखमालेचा विषय हा गहन, अती चिंतनशील आणि तरीही लोकांच्या जिव्हाळ्याचा होता. मुळात आपल्याच मनातील प्रश्नाचा मागोवा घेता आला तर ती सर्वात आनदाची ठेव असते.  यात जिज्ञासा पूर्ण होणं, याहीपेक्षा मनातील शंकांचं निरसन होणं, हे अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या आयुष्यात अश्या अनेक गोष्टी घडून जातात, घडतात किंवा पुढेही घडतील, ज्याबद्दल अनेक शंका निर्माण होतात. त्या सर्व शंका फिटतील असं नाही. पण या मालिकेत, बऱ्याच प्रश्नांची उकल करून देण्याचा प्रयत्न महाराजांनी केला, हे नक्की. कर्माच्या गतीचा सिद्धांत हा अनेकवेळा, पूर्णपणे लागू होईल अशी परिस्थिती असेलच असं नाही. बरेच जण या छोट्या छोट्या शंकांना मनात धरून, त्यांचं निरसन न झाल्या कारणाने,नास्तिक किंवा देवावर दैवावर अविश्वास दाखवणारे असतात. यामधे मी बांधलेले काही आडाखे, काही अंदाज आणि काही मनसुबे, जसेच्य...

भोग आणि ईश्वर ५९९

भोग आणि ईश्वर  ५९९ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.  आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.     वास्तविक आतापर्यंत मी लिहिलेल्या लेखमालेत, सर्वात जास्त दिवस सलगपणे मी जानकी पुनः वनवास अर्थात उत्तर रामायण लिहिलं. जे मी पहिल्या प्रयत्नात सलग १०० दिवस आणि नंतरच्या दुसऱ्या भागात पुढचे ९५ दिवस लिहिलं होतं. पण त्यात सलगता नव्हती कारण, मधे मधे एखाद दोन दिवसाचा खंड पडला होता, हे नक्की. पण प्रयत्न या अर्थाने इतकाच होता. त्यानंतरही मी बऱ्याच लेखमाला लिहिल्या, पण त्यातील श्रीरुक्मिणी स्वयंवर, ९५ भागातील लेखमाला हीच सर्वात मोठी होती.  बाकी सर्व लेखमाला, जसं मुरली ५५ भाग, सुभद्रा हरण ३६ भाग, श्रीकृष्ण नीती ४६ भाग, इत्यादी ८ ते १० मालिका माझ्या कडून  लिहिल्या गेल्या आहेत. पण सर्वात जास्त सातत्य, फार अनुभवास होतं अशातला भाग नव्हता. त्यामुळे मागच्या अनुभवांच्या आधारावर, भोग आणि ईश्वर १ डिसेंबर, २०२० ला सुरू केल्यानंतर फार फार तर १०० ते १५० भागात संपेल, असा होरा होता. त्यातही, मी स्वतः हे नक्की आधीच निश्च...

भोग आणि ईश्वर ५९८

भोग आणि ईश्वर  ५९८ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करावी असा मानस आहे.  आज मालिकेचा विषय सोडून, आज माझे अनुभव कथन.     खरतर भोग आणि ईश्वर ही मालिका, हाच एक चमत्कार आहे. चमत्कार या अर्थाने,की कोणतीही संहिता, विषय सुची  पूर्व लेखन, अगदी वाचनसुद्धा न करता फक्त आणि फक्त महाराजां वरील विश्वास श्रद्धा आणि आत्मचिंतन, या बळावर, पहिल्या दोन भागात संपवूया, या उद्देशाने १ डिसेंबर, २०२० ला फक्त दोनच लेख लिहून, दुसरा विषय घ्यावा, असा साधा उद्देश ठेवला मी. पण पहिले दोन लेख वाचक सूचनेनुसार पुन्हा वाचताना लक्षात आलं की, आपण विषयाची सुरवातसुद्धा न करता, इतिश्री करणार होतो. आजही २ डिसेंबर, २०२० चं माझं फेसबुक पेज पाहिल्यास लक्षात येईल की, दुसऱ्या लेखाचं शिर्षक भोग आणि ईश्वर (इतिश्री) असं आहे. असो. त्यानंतर या लेखमालेने मला अनेक गोष्टी मिळवून दिल्या आहेत. या लेखमालेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य हे आहे की, यातील प्रत्येक लेख, त्या लेखाखाली दिलेल्या तारखेलाच लिहिला आहे. म्हणजे एकही लेख आधी किंवा आगाऊ लिहून ठेवला नव्हता. अनेक अडचणीच्या काळातस...

भोग आणि ईश्वर ५९७

भोग आणि ईश्वर  ५९७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     आत्मा हा देह, बुद्धी व मन याहून भिन्न आहे. त्याचं कार्य निश्चित आहे आणि ते साध्य करण्यासाठीच हा देह, हे कर्माचं बंधन हे सर्वकाही घडलं वा घडवलं गेलं. पण हे ज्ञानाने आणि योगानेच जाणता येतं की, मी या देहाहून, भिन्न आहे. जरी मी या देहात अभिन्न भासत असलो तरी, एका ठराविक काळानंतर, मला हा देह सोडून, बाहेर जायचं आहे. कुठे याचा शोधच घेण्यासाठी ईश्वराने, हा देह, बुद्धी आणि मनरुपी स्वतंत्र इंद्रिय किंवा एक स्वाप्रेरीत यंत्रणा दिली आहे.  त्याच्या सहाय्याने, मानवाने, आपल्या संपूर्ण आयुष्यात, हा शोध घ्यावा की, माझा प्रवास कुठून कुठे आहे, मी कोण आहे. पण या देहात आल्यावर आत्म्याचा, पूर्व जन्मांचा, सर्वांचा विसर पडल्यामुळे, मानव, मूळ उद्देश विसरून, संसारात रममाण होतो. इतका रममाण की, ज्यासाठी हा सुसज्जित देह ईश्वराने प्रदान केला, तो कार्यभाग न पार पाडताच, माणूस एका देहातून, दुसऱ्या देहात, संचीताचे भोग भोगत वणवण फिरतो.  यातून आपण काय साधलं, हा विचारदेखील, त्याच्या मन...

भोग आणि ईश्वर ५९६

भोग आणि ईश्वर  ५९६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     कदाचित मनाच्या इच्छाशक्तीने, आसक्ती, कामना, वासना, इत्यादी गोष्टी पटकन यश देऊन जातात. याचं कारण म्हणजे ऊर्जा व शक्तीचा नियम. जेंव्हा एखादी वस्तू चार्ज होते, तेंव्हा ती त्यासमान गोष्टींना आकर्षित करते. मन जेंव्हा तश्या प्रकारच्या इच्छा करतं, तेंव्हा ते नकारात्मक ऊर्जेने चार्ज झालेलं असतं. त्यामुळे अर्थातच, तश्याच गुणांकडे ते आकर्षित होतं. किंवा तसेच गुण त्या मनाकडे आणि मनाच्या माध्यमातून, देह व बुद्धी यांना आकर्षित करते.  याचं अजून एक कारण म्हणजे असे हे दुर्गुण जलद प्रवाही असतात, अतीऊर्जा आणि अतिशक्ती यामुळे. म्हणूनच एकाच्या रागाने दुसऱ्याचा राग वाढतो. असे हे दुर्गुण, सहसा कोणत्याही गुणांना शरण जात नाहीत. कारण अतिऊर्जेमुळे, त्यांच्यात स्थिरतेचा अभाव असतो. याऊलट शांत शुद्ध आणि सात्विक गुण हे शीतल असल्या मुळे, कमी प्रवाही, कमी उर्जायुक्त असतात. परिणामी त्यांचं चलन वा वहन, संथ असतं. त्यांना गतिशीलता कमी असते.  म्हणून एखाद्या व्यक्तीचे स्वच्छ, शुद्ध विच...

भोग आणि ईश्वर ५९५

भोग आणि ईश्वर  ५९५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    ही मालिका ६०० व्या भागाला समाप्त करण्यात येईल.     एक गोष्ट आपण नोट केली आहे का मनाची साथ किंवा एकग्रता असली किंवा नसली तरीही देह काही गोष्टी आपसूक करतो. ही गोष्ट तंद्रीत काही काम केल्यानंतर, आपल्याला तंद्रि भंग झाल्या, जाणवतं. आपण आश्चर्य चकित होऊन, विचार करतो की, आपण दुसराच कुठला तरी विचार करण्यात गुंग होतो तरी, काम पण कसं केलं. बरेचदा, हे केलेलं काम फारशा चुका न होता, व्यवस्थित झालेलं असतं.  यामागे काय विज्ञान आहे ते जाणून घेऊ. मुळात यात विज्ञान कसलं हा प्रश्न मनात येईल. तर कालपण आणि मागेसुद्धा अनेकवेळा मी म्हटल्या प्रमाणे, हे जगत पूर्ण पणे विज्ञानाधारीत आहे. त्यामुळे या जगतात कुठेही घडलेली वा घडणारी कोणतीही गोष्ट, घटना इत्यादिमागे, विज्ञान आहेच आहे. आपण ते समजतं नाही किंवा समजून घेऊ इच्छित नाही. म्हणजे अज्ञान किंवा अहं असतो. अज्ञान समजून घेऊ शकत नाही तर अहं समजू घेऊ देत नाही.  तर ज्यावेळी मन दुसरा विचार करतं, पण देह वेगळ्याच कार्यात मग्न होतं, त्यावेळी दोन वेगळ्या पातळीवर, दोन वेगळे तरंग व लहरी...