Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ५७७

भोग आणि ईश्वर  ५७७ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  भले भले महात्मे,संत इत्यादी, संसार सागर का म्हणतात, याचा बोध काल आला असेल. मूळ स्व साध्य करण्या साठी करत असलेल्या कर्मातून, मिळणारं फल समोर आल्यावर सामान्य जन, नेहमी त्यात वाहात जातो. हे अंतिम सत्य जोपर्यंत आहे, तोपर्यंत त्या फलाच्या प्राप्तीने आनंद व दुःख होतच राहणार. हे अपरिहार्य व अनिवार्य आहे.माणूस कुठे चुकतो,तर त्याची स्वीकृती वा अस्वीकृती माणूस प्राप्त परिणामांवर ठरवतो.  या चुकीचा अर्थ आणि परिणाम असा आहे की, स्वीकृत फल मनाला आनंद देते आणि अस्वीकृत फल मनाला क्लेश देते.  हा आनंद आणि क्लेश हेच सर्व दुःखाचं मूळ कारण आहे. आनंद हे दुःखाचं कारण कसं असेल, असा साहजिक प्रश्न मनात येईल. विचार करा की, एकदा एका कर्मफलातून आनंद प्राप्ती झाली की, माणूस त्याचं प्रकारच्या कर्मात स्वतःला अडकवत जातो. याची एक शृंखला तयार होते. यामध्ये मागील कर्माचा दुःख भोग आला की, मनात अविचार येतात. माणूस चुकीचा मार्ग आणि चुकीचं कृत्य करण्यास प्रवृत्त होतो. कारण ओढ इच्छा आणि अपेक्षा यातून तयार झालेली आसक्ती ही माणसाला दुःख भोग आणि अनिष्ट फल स्वीकारू...

भोग आणि ईश्वर ५७६

भोग आणि ईश्वर  ५७६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालचा विषय पुढे नेताना, मनामध्ये असलेला गैरसमज दूर करू. गीता ही फक्त युद्धासाठी अर्जुनाला तयार करण्यासाठी असती, तर ती अठरा अध्यायांइतकी दीर्घ सांगितली गेली नसती. त्यामुळे समस्त विश्वाला, विश्वा तील प्रत्येक जन सामान्यांना कल्पांतापर्यंत मार्गदर्शन करत राहील, हेच त्यामागील प्रयोजन असावं. याचं अजून एक कारण म्हणजे, जर असा काही उद्देश नसता, तर त्यानंतर साडेतीन चार हजार वर्षांनी श्रीसंतज्ञानेश्वर माऊली या रुपात अवतरून, प्रभूंनी स्वमुखे तीच गीता संस्कृत या फार कमी लोकांना ज्ञात असलेल्या भाषेतून, प्राकृतात आणली नसती.  म्हणजेच या गीतेमध्ये नक्कीच, जनसामान्यांसाठी काहीतरी असणार. काय, ते बऱ्याच जणांनी शोधण्याचा प्रयत्न केला आहे. पण त्यातील बरेच अर्थ, भावार्थ, मतितार्थ गुह्यार्थ हे अध्यात्मिक मार्गाचा धागा पकडून, पुढे शोधत आतपर्यंत गेले आहेत. फारच थोड्या विद्वानांनी यातील प्रापंचिक दृष्टीने सार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. आपण आज त्या दृष्टीने प्रयत्न करूया.  गीतेतील सर्वश्रेष्ठ दोन सिद्धांत आहेत, कर्मयोग आणि भक्ती योग. तिसऱ्या, सा...

भोग आणि ईश्वर ५७५

भोग आणि ईश्वर  ५७५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     खरंतर नेट (मराठी) अर्थात  चिकाटी ही सर्वच क्षेत्रात उत्तम लाभ देते हे नक्कीच. पण ईश्वर कार्यात किंवा अध्यात्मिक मार्गात, चिकाटी नक्कीच अती लाभदायक मानली जाते. कारण इथे कोणताही प्रापंचिक लाभ मिळावा यासाठी आलेल्यांना पदरी निराशा प्राप्त होऊ शकते. कारण प्रपंचातील लाभ हानी हे कर्मधिष्टीत आहेत, हे सर्वश्रुत आहे. म्हणजे तिथे जे पेराल तेच उगवेल हे नक्की. कर्म आणि फल यांचा ताळमेळ किंवा फल प्राप्तीची वेळ ही, कर्माच्या गतीवर अवलंबून आहे.  त्यामुळे प्रापंचिक जीव हा समोर हे फल येईल, त्यानुसार आपलं मत, भाव आणि इच्छा अपेक्षा ठरवतो. किंवा साहजिक तसच मत भाव आणि अपेक्षा ठरतात. पण अतीदुःख आणि अतीसुख माणसाची मती आणि मतं बदलू वा बनवू शकतात. म्हणजेच एकप्रकारे ज्याला आपण बुद्धीभ्रम म्हणजे ब्रेनवॉश म्हणतो तेच करतात. कारण आपण आपल्या जीवनात घडणाऱ्या खूप छोट्या ते खूपच मोठ्या, सुखद आणि दुःखद घटनांच्या आधारे आपली मतं बनवतो किंवा ते आपली मती घडवतात वा बिघडवतात. अर्थात हा झाला बुद्धीभ्रम.  मग अपेक्षित काय हा एक प्रश्न या ठिकाणी सह...

भोग आणि ईश्वर ५७४

भोग आणि ईश्वर  ५७४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     गर्व आणि अभिमान या दोन घोड्यांना मायेचे पाय आणि षड्रीपुची शक्ती असते. ज्यामुळे हे मनाला ग्रासून, अतीवेगात  मनाला पळवत नेऊन, आत्म्याच्या मूळ उद्देशापासून लांब नेतात. कारण त्यांना फक्त आणि फक्त आज माहीत असतं. दुसरं म्हणजे त्यांना एका जिवाकडून दुसऱ्या जीवाकडे जाऊन, त्याला भ्रमित करून, मार्ग भ्रष्ट करणं, इतकचं ठाउक असतं आणि परिणामांची कोणतीही तमा नसते. कारण परिणाम देह व आत्मा भोगणार असतात.   म्हणून एकदा या दोघांनी मनाचा ताबा घेतला की, मन स्वैर होऊन, सर्वात प्रथम सद्सद्विवेक बुद्धी गमावून बसतं. याचसाठी संत महंत, ऋषी मुनी यांनी संयम आणि चिंतन या दोन अस्त्रांना नेहमी जवळ ठेवावं, असं सतत सांगितलं आहे. ही दोन अस्त्र, गर्व अभिमान यांसह देह, बुद्धी व मन यांच्या  सर्व शत्रूंना परास्त करू शकतात.  कारण संयम चुकीच्या विचारांना येण्यापासून थांबवतो  आणि चिंतन योग्य विचारांना स्थान देऊन, त्या माध्यमातून, योग्य कृती करायला सहाय्यभूत होतं. संयम विचारांचा, रक्तप्रवाहाचा मार्ग सूनियांत्रित करतो आणि मानसिक थकव...

भोग आणि ईश्वर ५७३

भोग आणि ईश्वर  ५७३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)    एक स्पष्ट आहे की, मनाच्या माध्यमातून देहाचा सुयोग्य वापर करून, आत्मशक्ती जागृत करणं, हाच योग्य मार्ग आहे. अशी आत्मशक्ती मर्यादित स्वरूपात जागृत असेल तर, माणूस या जगतातील अनेक क्षेत्रात, असामान्य कर्तृत्व दाखवून अनेक अलौकिक कार्य व कर्म करू शकतो. याची प्रचिती आपल्याला अनेक क्षेत्रात येते. ही जागृती व्यक्तिगत पातळीवर, निर्विवाद पणे प्रचंड लाभ देतेच, पण सामूहिक पातळीवरही, अनेक प्रकारे अद्भुत कार्य घडवून आणते.  पण ही जागृती आत्म्याची आहे, हे कळण्यासाठी काही कसोट्या आहेत. म्हणजे उद्देश, साध्य अर्थात aim and ambition ही प्रापंचिक, व्यक्तिगत लाभासाठी असेल तर, ती सांसारिक वा भौतिक पातळीवर आणि त्यासाठीची जागृती आहे, हे नक्कीच. पण एकाग्रतेने असा लाभ सांसारिक पातळीवर झाला तर त्याला मनःशक्तीची प्राथमिक अवस्था म्हणता येईल. संपूर्ण जागृतीची अत्यंत प्राथमिक अवस्था.  प्राथमिक यासाठी की, मनाच्या शक्तींचा हा लाभ, सुरवातीला नक्कीच भौतिक प्रगती, प्रतिष्ठा, सन्मान प्राप्ती घडवतो. पण तो अंतिम टप्पा नाही. तो एक थांबा आहे. ज्यामध्ये न थ...

भोग आणि ईश्वर ५७२

भोग आणि ईश्वर  ५७२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     माया म्हणजे भ्रम. हा भ्रम कशाचाही असू शकतो. अगदी मी कुणी नाही इथपासून मी कुणीतरी आहे. अर्थात निराशा ते गर्व असा असू शकतो. असलेल्या संपत्तीमुळे आलेल्या मस्तीचा किंवा नसलेल्या पैश्यामुळे आलेल्या दुःखाचा असेल, आयुष्यात भोगलेल्या भोगांचा असेल किंवा उपभोग घेत असताना वाटणाऱ्या सुखासीनतेचा. असे अनेक भ्रम माणूस आयुष्यात बाळगतो.  या भ्रमात माणूस आयुष्य जगतो. अनेक कर्म याचं भ्रमात करतो. कारण आपला आयुष्याचं जगण्याचं आणि कर्माचं गणित हे या मायेच्या आधारावर वसलेलं असतं. याचं महत्वाचं कारण म्हणजे आपला आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा दूषित किंवा भ्रमाने ग्रस्त आहे. आपण फक्त आणि फक्त सद्यस्थितीला, सद्य परिणामांना आणि सद्य घटनानाच बघतो. सद्य याचा अर्थ या जन्मा तील आयुष्य आणि त्या आयुष्यातील घटना, अनुभव, दृश्य, संवाद यांसह जे पाहतो ते.  त्यावर आधारित आपली मत, आपल्या प्रतिक्रिया, आपली कर्म, आपल जगणं, आपल्या श्रद्धा, आपला विश्वास असतो. आपण जो विचार करतो, त्याला या जन्मातील दाखले व अनुभव हा एकमेव आधार असतो. कारण माया जी, या जग...

भोग आणि ईश्वर ५७१

भोग आणि ईश्वर ५७१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)     आत बाहेर सर्व व्यापून उरलेल्या त्या ईश्वराला जाणण्या साठी मुळात कुठेही जायची खरतर आवश्यकता नाही. कारण कालच्या बादलितील त्या भांड्यात आणि उर्वरित बादलीत असलेल्या जलाप्रमाणे, ईश्वरी अंश देहाबाहेर आहे, तसाच तो आत्मरुपात, देहात सुद्धा वास करून आहेच. अर्थात त्याला बाहेर कुठे शोधण्यापेक्षा, हृदयात वस्ती करून असलेल्या आणि सर्व देहाला चैतन्य देणाऱ्या, आत्म्याला जागृत करणं, हा एकच उपाय सर्वोत्तम आहे.  खोलात जाऊन विचार केला तर हृदयात वसलेला आत्मा ऊर्जा, बल व चैतन्य स्वरूपात संपूर्ण देहात, अर्थात प्रत्येक पेशीत, नसांमध्ये, धमन्या, रुधिर अर्थात रक्त यांमध्ये सतत फिरत आहेच. हा प्रकृतीचा, विधात्याचा, एकप्रकारे चमत्कार आहे, ज्याप्रकारे हा देह आणि त्याची रचना त्याने केली आहे. आला इतका उत्तम देह, प्रत्येक पेशीमध्ये चैतन्य, हे सर्व ईश्वराने मानवाला देताना, किमान अपेक्षा ही केली की, हा मानव, याबद्दल आपले आभार मानेल.  तरीही ईश्वर कधीही त्या अपेक्षेने काहीही करत नाही. किंबहुना जगत निर्मिती करतेवेळी, ईश्वराने निरपेक्ष बुद्धीने, संपूर...