Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर ४२६

भोग आणि ईश्वर  ४२६ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  कालच्या भागात पाहिलेला विषय पुढे नेऊया. संगतीचा एक भाग जो अपरिहार्यपणे आपल्यासोबत प्रारब्धाने, सचितातून येतो तो आपण काल जाणला. पण तो जाणूनही आपण त्याबाबत काहीही करू शकत नाही. त्यामुळे त्याबद्दल जास्त विचार वा आनंद किंवा दुःख करून काहीही उपयोग नाही. पण संगतीचाच दुसरा भाग जो आपल्या नियंत्रणात आहे किंवा असू शकतो, त्याचा आज विचार करूया.  संगती जी आपल्याला आपल्या निवडीतून किंवा निर्णयाने ठरवता येऊ शकतो, त्यातील महत्वाचा घटक म्हणजे स्नेही, मित्रसंबंधी हा आहे. स्नेही वा मित्र यांचे पुन्हा दोन प्रकार आहेत. एक हितसंबंधी आणि हितशत्रू. मुळातच स्नेही वा मित्र या घटकाचं, आपल्या आयुष्या तील स्थान किती महत्वाचं आहे, हे आपण सर्वजण जाणतो.  म्हणूनच यातून मनाला, बुद्धीला मिळणारी किंवा त्यामुळे वाया जाणारी ऊर्जा व शक्ती ही मिळवणं व घालवणं पूर्णपणे आपल्या हातात नसेलही.  तरीही हितशत्रू व चुकीच्या मैत्रीला वा संबंधाना दूर ठेवून, आपण निदान होऊ शकणारा, ऊर्जा व शक्ती यांचा ऱ्हास, नक्कीच कमी करू शकतो. आता इथे सर्वात महत्वाची गोष्ट जी बरेचवेळ...

भोग आणि ईश्वर ४२५

भोग आणि ईश्वर  ४२५ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनातील ऊर्जा व शक्ती यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतील, म्हणण्यापेक्षा मनातील विचारांवर नियंत्रण ठेवून चागल्या लहरी अर्थात vibes निर्माण करू शकतील असे तीन घटक, जे आपल्या नियंत्रणात असतात किंवा मानवी कक्षेत येतात ते म्हणजे संगती, विचार व कर्म. आता एकेक घटकाचा विचार करूया. म्हणजे मनातील ऊर्जा व शक्ती सकारात्मक रीतीने कशी वापरता वा वळवता येईल यावर विचार करूया.  संगतीमध्ये दोन प्रकार आहेत. एक म्हणजे पूर्वसंचिताने मिळणारी संगती आणि दुसरी म्हणजे आपण निवडलेली वा आपल्याला निवडता येणारी संगती. पहिल्या प्रकारा तील संगती ही जन्माने व आपल्या नियंत्रणा शिवाय प्राप्त होते आणि त्या संगतीच्या व्यक्ती व वातावरणात, आपलं प्रारब्ध घेऊन जातं. किंवा त्यांच्या संपर्कात आपण येतो. याचा मनाच्या ऊर्जा व शक्तींशी काय संबंध, यासाठी हे लक्षात घ्या की, या गोष्टी अनेकदा किंवा बऱ्याचवेळा आपल्या पूर्वसंचिताने आपल्या संस्कारांचा भाग म्हणून आयुष्यात येतात.  आपल्या देहासह बुद्धी व मन यांची जडणघडण या गोष्टींनी ठरते किंवा आखली जाते. मनाचा खणखरपणा, राकटपणा, मृदुत...

भोग आणि ईश्वर ४२४

भोग आणि ईश्वर  ४२४ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  मनाचा विचार करताना, एक विचार सहज डोकावून जातो,तो म्हणजे,मनाची शक्ती जितकी अफाट, तितकाच त्याचा व्याप, पसारा, व्यास अचाट आहे. त्यामुळे त्याची ऊर्जा देखील अमर्याद आहे. खरंतर मनाबद्दल ही गोष्ट जाणल्यानंतर, वास्तविक सर्व सामर्थ्याची कल्पना किंवा जाणीव येऊन, त्या अफाट आणि अचाट शक्तीचा उपयोग करून घेता यायला पाहिजे.  पण अजून एक गोष्ट मनाबद्दल आहे, ती म्हणजे, त्या मनाचं चंचलत्व किंवा विषयाकडे सहजी असलेली ओढ किंवा आसक्ती. या एका अवगुणामुळे, अनेक बाबतीत मर्यादा पडतात वा येतात. मुळात विधात्याने अशी रचना का केली असेल, असा एक विचार बरेचवेळा येतो. पण त्याचं उत्तर म्हणजे, जे साध्य करण्यासाठी हा देह ईश्वराने निर्माण केला, ते साध्य करणं, फक्त देह, फक्त बुद्धी यांनी शक्य नाही. तर त्यासाठी ऊर्जा, शक्ती व प्रेरणा आवश्यक आहे आणि ती मनाकडे आहे. जेंव्हा हे तिन्ही एकत्र येऊन कार्य करतील, तेंव्हाच सर्व ईश्वरी इच्छेनुसार साध्य होईल.  म्हणजे जर देह हा वाहन असेल तर मनाची ऊर्जा व शक्ती,  हे त्याचं इंधन आहे. म्हणजे वाहनाशिवाय इंधन निरुपयोगी आहे,...

भोग आणि ईश्वर ४२३

भोग आणि ईश्वर  ४२३ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड)  आता चांगल्या सवयीचा  विचार करायचा झाल्यास. आपण मुळात कोणताही विचार हा सकारात्मक, चांगला सकस आणि भल्याचाच करावा. मुळात हाच आपल्या मनाचा पाया किंवा बेस असावा.  क्षणिक, तात्पुरते येणारे वाईट, क्रोधाचे,एखाद्याबद्दल चुकीचे विचार हे त्या क्षणीच मनातून काढून टाकले पाहिजेत. मुळातच असे विचार येणं हे, आपल्याला पुन्हा पुन्हा मागे नेत राहील, हे लक्षातच राहिलं पाहिजे.  म्हणूनच, मनाला सतत जागरूक ठेवून, कर्म केलं पाहिजे. कारण कर्म हे जरी देह, बुद्धी वाचा इत्यादी करत असले, तरी त्या प्रत्येक कर्मामागे मनाची प्रेरणा, ऊर्जा व शक्ती असते. ज्यावेळी तशी प्रेरकशक्ती त्यामागे नसते, तेंव्हा आपण म्हणतोच की, हे काम किंवा ही गोष्ट मी मनापासून केली नाही. म्हणून प्रत्येक कर्मापाठी मनाला जोडून ते केल्यास, आपोआप समाधान मिळत जाईल.  मनाला, असं प्रत्येक कर्मामागे लावताना, मनाचा पाया हा उत्तम, उन्नत विचारांचा आणि त्यामुळे कोणाचंही वाईट किंवा गैर चिंतणारा नसावा, हे कटाक्षाने ध्यानात राहू द्या. म्हणजेच चुकीचे आलेले विचार तिथल्यातिथे ताबडतोब मनातून...

भोग आणि ईश्वर ४२२

भोग आणि ईश्वर  ४२२ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) सवयीप्रमाणे घडणं ही अंगवळणी पडलेली बाब आहे हे आपण काल पाहिलं. पण सवय म्हणजे एखादी गोष्ट, कर्म करण्याचं देहाला, बुद्धीला व मनाला लागलेलं वळण. सवय हा नेम वा नित्य घडणारी गोष्ट आहे. अशी सवय कोणत्याही गोष्टीची व नित्य बाबीची असू शकते. पण सवय ही चांगल्या आणि वाईट किंवा सकारात्मक आणि नकारात्मक अश्या दोन्ही गोष्टींची असू शकते.  म्हणजे लाभदायक आणि हानिकारक अश्या सवयी असू शकतात. नित्य सवयी या नित्य कर्म निर्माण करून नित्य फलाच्या प्राप्तीसाठी पुन्हा येणंजाणं घडवतात. अर्थात संसाराच्या सवयी संसाराची किंवा संसाराबाबत म्हणजेच  व्यवहाराबाबतची फल प्राप्ती करून देतात. संसाराबाहेरील सवयी त्या क्षेत्रातील फल निर्माण करून, समोर आणून देतात.  खरतर  सवयीबाहेरील जी कर्म असतात, ती पण आपल्या क्षेत्रातील फल निर्माण करतातच. पण त्यांच्या बाबत आपण कोणत्याही प्रकारचं नियोजन करू शकत नाही. नियोजन हे चांगल्या व वाईट,अश्या दोन प्रकारच्या सवयीबाबत, नक्कीच करू शकतो. पण त्यासाठी मनात जाण आणि जागृती असणं किंवा येणं गरजेचं आहे. त्यासाठी थोडं ज्ञान आवश्यक...

भोग आणि ईश्वर ४२१

भोग आणि ईश्वर  ४२१ (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) नकारात्मक विचार मनात येण्यापासून, स्वतःहून, पूर्ण जाणिवेने, निश्चय करावा. असा निश्चय केल्यानंतर त्या दृष्टीने प्रयत्नपूर्वक कृती करावी. सुरवातीला नक्कीच अडचणी येऊ शकतात. म्हणजे आपण प्रयत्नपूर्वक एखादा सकारात्मक विचार करत असताना, मनाला व बुद्धीला मागे खेचून नेणारे आणि अश्या सकारात्मक कार्यात खोडा घालणारे, नकारात्मक विचार येतील.  पण अश्या प्रत्येक वेळी वा प्रत्येक क्षणी, जाणीवा जागृत ठेवून स्वतःला किंवा मनाला समजावून सांगत, त्या मनाला व बुद्धीला, पुन्हा पुन्हा जागेवर आणणं, हे सुरवातीला गरजेचं असतं. मनाला काही गोष्टींची किंवा चांगल्या विचारांची मशागत करण्याची सवय, जाणीव पूर्वक लावून घेणं, महत्वाचं आणि गरजेचं आहे. खरंतर जाणीव, ही या सर्व प्रवासात किंवा आरंभीच्या काळात, खूप मोठं काम करते.  जाणिवांची जागृती म्हणजे एक प्रकारे मनातील त्रयस्थ जागा असणं.  जाणीवा या एकप्रकारे मनाला जागं ठेवण्याचं कार्य करतात. म्हणजे जाणीवा या पथावरील दिव्यासमान आहेत वा असतात. त्या सतत मनाला आठवण करून देतात, किंवा ज्यावेळी आपण एखादी गोष्ट विसरून पुन...

भोग आणि ईश्वर ४२०

भोग आणि ईश्वर  ४२० (१डिसेंबर, २०२० पासून अखंड) चुकीच्या विचारांवर, खर्च होणारी ऊर्जा व शक्ती नियंत्रित करण्याचा नुसता विचार केल्यावर, लक्षात येईल की, आपण मन, बुद्धी व देह यांना अकारण त्रास देऊन निष्कारण ऊर्जा व शक्ती वाया घालवत होतो. एक उदाहरण घेऊ म्हणजे मुद्दा स्पष्ट होईल. आपण नेहमी एका मार्गाने कार्यालय किंवा भाजी आणायला किंवा काही नियमित कामासाठी जातो. तो मार्ग लांबचा, पण आपल्या माहितीचा असलेला एकच मार्ग आहे.  एके दिवशी एक मित्र किंवा स्नेही आपल्याला वाटेत भेटतो आणि चौकशी करताना आपण सहज बोलून जातो की, अमक्या अमक्या ठिकाणी आपण रोज या मार्गाने कामा निमित्त जातो. त्यावर तो मित्र वा स्नेही, आश्चर्याने म्हणतो अरे एवढ्या लांबून का जातोस. तुझ्या घराजवळून एक मार्ग आहे, त्याने तुझा वेळ निम्म्याहून वाचेल आणि श्रमसुद्धा वाचतील.  चल मी तुला दाखवतो तो जवळचा रस्ता. असं म्हणून तो मित्र आपल्याला जवळून जाणारा आणि माहीत नसलेला मार्ग दाखवून चक्रावून सोडतो. आपण विचार करतो की, उगाचच आपण, इतके दिवस, कष्ट आणि वेळ वाया घालवले. पण याबाबत कर्मसिद्धांत लक्षात ठेवावा,की त्याने काही ऋण फेडून आपल्य...