Skip to main content

Posts

भोग आणि ईश्वर १६३

भोग आणि ईश्वर  १६३ कालचाच विषय पुढे नेताना एक उदाहरण घेऊया म्हणजे सद्गुरू महती विशेषत्वाने लक्षात येईल.  संकटं येणं हा प्रारब्धाचा भाग आणि भोग दोन्ही आहे. एखादा बैल वा वळू, माजलेला आणि मस्तवाल, अचानक रस्त्यात समोरून आला. आपण गोंधळलो आणि कळत नाही वाचायचं कसं आणि सुटायचं कसं.  इतक्यात कोणीतरी अश्या वेगात येतं आणि आपल्याला, त्या वळूच्या मार्गातून बाहेर काढतं, ढकलतं आणि वळू आपल्या मार्गाने सरळ निघून जातो, किंवा त्याचवेळी आपल्या आणि त्याच्या मार्गात एखादी मोठी गाडी, बस ट्रक येतो आणि वळू मार्ग बदलतो. हे उदाहरण प्रतिकात्मक समजून पुढे बोलूया.  हे असे आयत्या वेळचे आणि आपल्या कर्माशिवाय मिळालेले वा आपसूक आलेले सहाय्य, म्हणजे साधनेतील गती आणि सद्गुरुकृपेचा महिमा समजावा. कारण आपलं कर्म सुटकेसाठी काहीच नाही. आपण तर सावरायच्या आत कोणीतरी आलं आणि आपल्याला वाचवलं. किंवा थोड्याश्याच कष्टाने संकटात सहाय्य मिळणं आणि जेवढं  अपेक्षित होतं, तेवढं नुकसान न होता, आपण संकटातून बाहेर पडू शकणं, हे एखाद्या चमत्काराप्रमाणे भासतं. पण मुळात हा चमत्कार नसून, सद्गुरुकृपेने साध्य झालेला योग आहे....

भोग आणि ईश्वर १६२

भोग आणि ईश्वर  १६२ काल आपण सद्यस्थितीसारखी स्थिती कशामुळे उद्धभवते याचा परामर्श दोन भागात घेतला. मुळात हि नकारात्मकता सामूहिक नसून अनेक प्रकारच्या नकारात्मकता एकत्रित आल्यामुळे उध्दभवलेली परिस्थिती आहे. संहारक वा विध्वंसक मानसिकता ही असुरी प्रेरणा प्राप्त झाल्यामुळे आणि असुरी वा नीच प्रकारच्या वासनेचा उगम व वृद्धी होत जाऊन त्यात इतरांना सामील करून मग ती सामूहिक असुरी प्रेरणा वा शक्ती तयार होते. म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत वा राजकीय किंवा  इतर महत्वाकांक्षेपोटी सदर व्यक्ती आपली इच्छाशक्ती दृढ करून त्या इच्छाशक्तीच्या बळावर अनेकांना प्रेरित करून किंवा त्यांच्या मनाविरुद्ध वागायला लावून आपल्या विध्वंसक कार्यात सामील करून घेते.  अश्या सामूहिक उत्पात वा विध्वंस घडवणाऱ्या घटनांमागे कार्यरत असलेली शक्ती असुरी आणि महत्वाकांक्षी प्रेरणेने स्वतःसह संपूर्ण जगताचा विनाश घडवण्यास मागेपुढे पहात नाही. अर्थात एक नक्की या जगतात आजमितीस जिक्ती युगं होऊन गेली त्या सर्व युगात सर्व काळ सूर आणि असुर शक्ती आपलं स्थान टिकवून होत्या. कालांतराने सूर शक्ती या क्षीण होत आहेत असे ...

भोग आणि ईश्वर १६१

भोग आणि ईश्वर  १६१ काल म्हटल्याप्रमाणे अनेक प्रकारच्या अनिष्ट व नकारात्मक लहरी, ज्या अनेक माध्यमातून व अनेक कारणांनी उत्पन्न होतात, त्या सर्व अवकाशात वा अंतराळात किंवा ब्रह्मांडात एकत्र होत जातात आणि अश्या तर्हेने एकत्र होत गेलेल्या लहरी, ज्यावेळी पक्व होऊन फल देण्यायोग्य होतात, त्यावेळी त्या सर्व एकत्रितपणे उलट प्रवासाला निघतात. अश्या लहरींचा एकत्र परिणाम हा प्रचंड प्रमाणात असतो, म्हणजेच magnifying effect असतो.  कारण अर्थातच समूहाची ताकद व मानसिकता यांना सुद्धा लागू होते. त्यामुळेच त्यांची विध्वंसक शक्ती अमर्याद असते. त्यांच्या परिघात येणाऱ्या सर्व प्रदेशाला व्यापण्याची व त्या सर्व परिसरात वातावरण गढूळ करण्याची क्षमता, त्यांच्या ठायी असते. अर्थातच त्यांची भेदकता, संहारकता त्यांच्या निर्माण होण्याच्या क्षमतेवर अवलंबून आहे. म्हणूनच एखादी लाट एखाद्या प्रदेशावर येत नाही किंवा आली तरी फार विध्वंस करत नाही. या अश्या सामूहिक विध्वंसक लाटेमध्ये समाजाचा, विश्वाचा बराचसा भाग होरपळून निघतो. यात अनेक जण, कुटुंबच्या कुटुंब वा कुटुंबातील अनेकजण भक्ष्य होतात आणि ग्रासले जातात. अश्या प्रकारच...

भोग आणि ईश्वर १६०

 भोग आणि ईश्वर  १६० एखादा आपत्तीचा वा विपदेचा काळ आला की, त्यावेळी आयुष्यात बऱ्याच विपरीत गोष्टी घडत जातात. सहज सुलभ वाटणाऱ्या क्षुल्लक गोष्टी सुद्धा कष्टसाध्य आणि अमूल्य वाटायला लागतात. न घडणाऱ्या घटना, अनिष्ट  गोष्टी, अपघात, युद्ध, विषाणू, इत्यादी अनेक  सार्वजनिक आपत्ती, या अश्या काळाचं प्रतीक असतात. नुकसान, वाईट घटना, ताटातूट, मोठ्या प्रमाणावर मृत्यू इत्यादी सर्व या काळात घडतं. एरवी काही न घडणाऱ्यांच्या आयुष्यात, क्षणात उलथापालथ होऊन, अगदी होत्याचं नव्हतं होणारा, असा विचित्र काळ असतो. याला ग्रहस्थितीशी जोडण्यात येतं, कारण त्या काळात तशीच ग्रहस्थिती असते आणि त्याचा गुरुत्वाकर्षणीय परिणाम असेल किंवा त्याचा चुंबकीय परिणाम असेल. पण असा काळ प्रत्येक ठराविक काळानंतर येतोच आणि एखाद्या पिढीला धडा शिकवून जातो.  खरतर अश्या काळाचं काही मोजमाप कारणमीमांसा असं काही असणारच. कारण या विश्वात कारणाशिवाय आणि अयोग्य वेळी विधात्याच्या गणितात काहीही होत नाही. तरीही सर्व कर्माधिष्टीत आहे. म्हणजेच आता जो फेरा चालू आहे, ज्याला शास्त्रीय दृष्टीने एक विषाणू, ज्योतिषीय दृष्टीने विशिष्ट...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५

गोग्रासवाडी (डोंबिवली) १५ दिवाळी , आठवणी, साठवणी, उत्साह, आणि मन कायम, कायम , कायम जाताना इतकी हूर हूर लावून जातेस, जितका उत्साह वर्षभर वाट पाहण्यात घालवतो आम्ही. सर्व चारही दिवस आम्ही शोधलेला आनंद , उत्साह, जल्लोष, मजा सर्व पाचव्या दिवशी हिरावून नेतेस. अगदी लहानपणापासून बघत आलोय तुझ हेच रूप. चार दिवस खुप धमाल, नुसता आनंद आणि ...... चौथ्या दिवशी संध्याकाळीच सुरवात होते उजळणी चारही दिवसांची. अगदी पहिल्या दिवसापासून , नव्हे अगदी तयारीला  सुरवात जिथून केली तिथपासून उजळणी करायची, मनातला सर्व साठवलेला आनंद  बाहेर काढून पुन्हा बंद करून पुढील वर्षापर्यंत वापरायला ठेवायचा. किती किती गोष्टी , साध्या साध्याच त्या चार दिवसात केलेल्या, घडलेल्या, अनुभवलेल्या दडवून ठेवायच्या  मनात ,का तर त्या वर्षभर पुरवायच्यात. तू येणार नाहीस पुढल्या वर्षीपर्यन्त. कधीतरी वर्षातून एकदाच आलेले पाहुणे, त्यांच्या येण्याची लागलेली चाहूल, त्यांच्या येण्यामुळे आलेला उत्साह, आणि त्यांच्या सोबत घालवलेले ते चारच दिवस हो फक्त चार दिवस पूर्ण वर्षातले, म्हणजेच ४भागीले ३६५  किती व्यस्त प्रमाण आहे . पण हा...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२   त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं  शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो. त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण  यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये.  कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय.  शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल...

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२

गोग्रासवाडी (डोंबिवली) १२   त्या वाडीतल्या, चाळीतल्या आणि त्या चार चाळींच्या मधल्या मैदानात तासचे तास अनेक खेळ खेळणं हे नित्याच झालं  शाळेतून आल्यावर रोज संध्याकाळी अनेक खेळ खेळले जात होते. सर्व मिळून ३५ ते ४० वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अनेक खेळ खेळत एकत्र असायचो. अगदी संध्याकाळी अंधार होई पर्यंत खेळ चालायचे. अर्थात अंधार पडल्यानन्तर परवजा म्हणून मग गप्पा मारायला चाळीत जमायचो. त्यात दिवसभर झालेल्या खेळातील घडलेल्या चुका वा भांडण  यावर चर्चा व्हायची, किंवा इतर गप्पा होत असत. वेगवेगळ्या वयाची आम्ही मुलं अगदी गुण्यागोविंदानं खेळत खेळत वाढलो. भांडलोसुदधा पण ते खेळातल्या खेळात विसरून पण जायचो. कधीही कोणतही भांडण फार ताणल्याचं आठवत नाहीये.  कोणत्याही भांडणाच रूपांतर कधीही मतभेदांमध्ये झाल्याच आठवत नाही. कदाचित त्या वयाचा परिणाम असेल की मन पुरेसं लवचिक असल्यामुळे पटकन विसरुन लगेच पुढे जाणं हा एक सद्गुण त्यावेळी सर्वांच्यात होता. कदाचित ही एक गोष्ट मोठ्या माणसांनी शिकावी अस आज पण वाटतय.  शाळेतल्या त्या जगात वाडी म्हणजे वेगळं जग होत, कसलीही चिंता, काळजी काहीही नसल...