Skip to main content

Posts

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

श्रीकृष्णनिती ५

श्रीकृष्ण नीति ५ श्री गणेशाय नमः !!! श्रीगुरुवे नमः !!! कृष्ण जन्माची बीजं रामजन्मात आहेत याचे काही दाखले देतो  १. राम जन्मात लंकेत प्रभुरामानी आपली भक्त असलेल्या चित्रसेना नांमक एका नागकन्येला (अहिरावण आणि महिरावण वधानन्तर)  वचन दिल होतं की एक रात्र मी तुझ्या महाली येईन, परंतु ज्या मंचकावर मी बसेन तो एक रात्र राहिला तर मी तुला वरेन ही कथा रामानंद सागर यांच्या रामायणात देखील आहे.  मग हनुमंत भुंग्याकरवी तो मंचक पोखरुन घेतो, ज्याद्वारे प्रभु आपल्या वचनातून मुक्त होतात. पण त्या स्त्रीला , भक्तवत्सल असल्यामुळे वचन देतात की मी तुला पत्नीरुप स्वीकारण्याचं वचन दिलं होतं, त्यामुळे पुढील जन्मी द्वापारयुगामध्ये कृष्णावतारात मी तुझ्याशी विवाह करून  तुला माझी राणी करीन. ही कथा वाचल्याचं स्मरतय. हीच स्त्री पुढील जन्मीची सत्यभामा. हा अजून एक श्रीराम व श्रीकृष्ण अवताराचा संदर्भ. २. मागे प्रथम भागात उल्लेख केल्याप्रमाणे वाली वधानंतर वाली प्रभुना विचारतो की काय कारणाने आपण मला मारलेत. त्यावेळी प्रभु त्याला त्याच्या पापांची आठवण करून देतात आणि सुग्रीव मला शरण आला असल्यामुळे त्याच्या ह...

सुभद्राहरण ३८ कथासमाप्तीचा भाग

सुभद्राहरण ३८ समाप्तीचा भाग ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे उठून, लग्नानंतरचे कुलाचार म्हणून पूजा करण्यात आली. कृष्णाने सजवून नटवून अर्जुनाला पुजास्थानी आणलं. अर्थात नवपरिणीत सौभाग्यवती सौभाग्यालंकार परिधान केलेली स्वर्गीय सोंदर्याची मूर्ती सुभद्रा अर्जुनाशेजारी विराजित झाली. कुलोपाध्यय यांनी विधिवत पूजेला सुरवात केली.  श्रीगणेश पूजन करून नवकोट नारायणाच्या घरी त्याच्याच समोर श्रीमनमहानारायणाची पूजा करण्यात आली. सर्वसाक्षी स्वतः साक्षी होता. विधिवत पूजा संपन्न झाली. आमंत्रित मंडळींच्या भोजनाचा समारंभ उरकला. सर्वजण भोजनोत्तर वार्तालाप करत आहेत. त्यात अर्जुन आपला मानस व्यक्त करतो. " हे वसुदेव मामा आणि देवकी मामी, आता माझ्या नियोजित एक तपाच्या यात्रेतील एक संवत्सर बाकी आहे. तो एक संवत्सराचा कालावधी पुष्कर क्षेत्री व्यतीत करून, ततपश्चात तिथूनच इंद्रप्रस्थास प्रस्थान करीन. म्हणून मी आणि सुभद्रा उद्याच येथून प्रयाण करू. आज्ञा द्यावी."  भावविभोर वसुदेव आणि देवकी अर्जुनाच्या समीप आले आणि वसुदेव  हात जोडून अर्जुनाला  म्हणाले " हे अर...

जय महाराष्ट्र !!!🚩🚩🚩

सर्वात प्रथम महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!💐💐  खरतर गत वैभवाच्या शिखरावर अग्रेसर असलेल्या महाराष्ट्राचं कौतुक करायचं की, भविष्यात पुनः एकदा कधीतरी त्या वैभवाप्रत पोहोचू या आशेने शुभेच्छा द्यायच्या हा एक संभ्रमच आहे. कारण सलग पंधरा वर्षे राज्य करूनही राज्याला त्या वैभवाला न पोचवू शकलेले, पाच।वर्षात तुम्ही काय केलंत म्हणत निवडणूक मैदानात उतरले. मतदारांनी त्यांना पूर्ण परास्त करूनसुद्धा जवळजवळ सत्तेत पोहोचलेल्या युतीला शह देत त्यातील एक मोठा पक्ष फोडत त्यांना नाममात्र मुख्यमंत्रीपद देत सर्व सत्तेचं नियंत्रण आपल्या हाती ठेवण्यात यशस्वी झाले.  म्हणजे 20% मिळवलेले दोन आणि 20% वाला तिसरा मिळवून आमचं बहुमत असं येनकेनप्रकारेण करून सत्तेत तर पोहोचले. परंतु त्यातील खरा आनंद त्यांनाही नियतीने मिळू दिला नाही. आधी तिजोरी रिकामी असल्याचं नाटक करून झालं. त्यांनतर लगेचच करोनाचं जागतिक संकट आलं. यात सत्तेतील पक्षांची होत असलेली तारांबळ, ताळमेळाचा गोंधळ, अंमलबजावणीतील अनियमितता आणि समन्वयाचा अभाव हा ठायी ठायी जाणवतोय. त्यातही कमजोर नेतृत्व आणि बलशाली सत्ताबाह्य केंद्र यामुळे सत्तेत रा...

सुभद्राहरण ३७

सुभद्राहरण ३७ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll विवाह सोहळा उत्तमरीत्या पार पडला. भोजनसमारंभ, उपस्थितांनी मनसोक्त जेवून तृप्तीच्या ढेकरा देत, गाजवून सोडला. समस्तांना असे तृप्त बघून, कृष्णाला आधीच समाधान प्राप्त झाले होते. तरीही विवाहोत्तर मान्यवरांसह राजकुळातील सर्वांनी उत्तम अश्या भोजनाचा लाभ घेतला.  कृष्णाच्या भगिनीच्या लग्नाचा डामडौल , थाटमाट, सुसज्जता, खाद्यानांची रेलचेल, रेशमी वस्त्रांचा थाट, अलंकारांची विविधता हे पाहून स्वर्गीचे देव देखील थक्क झाले. प्रत्यक्ष देवेंद्र अचंबित होऊन सोहळा पाहात होते. परंतु ही सुबत्ता फक्त राजपरिवारातच नव्हती तर जनसामान्यां पर्यंत या सुबत्तेचा प्रवाह पोहोचला होता. राजा सुखेनैव वैभव मात्र स्वतःसाठी नव्हे तर समस्तांना त्यांचा त्यांचा अधिकार, भाग देऊन आणि याचक दीन यांना उत्तम दानधर्म करून ती सुबत्ता ते वैभव सढळहस्ते लुटून, मग बाकी भागाचा उपभोग स्वतःसाठी करत असे, असा तो काळ. त्यातही हे यादवनरेश श्रीकृष्णाचं राज्य.  उत्तमरीत्या पार पडलेल्या कार्याचं समाधान सर्वांच्या मुख कमलावर विराजित होतं. कार्य...

सुभद्राहरण ३६

सुभद्राहरण ३६ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll माता पिता दोघेही कन्यादानासाठी येऊन उभे राहिले. सर्व पुण्यांमध्ये अलौकिक असं समजलं जाणारं आणि पित्याला मोक्षप्रत नेणारं असं महत्तम दान म्हणजे कन्यादान. पित्याला मोक्ष यासाठी की, स्त्री,  गर्भ नऊ मास उदरात धारण करून आधीच मोक्षाच्या मार्गावर अग्रेशीत झालेली असते. म्हणून पुरुषाला कोणतंही पुण्यकर्म पदरी नसेल तरी मोक्षाच्या प्राप्तीचा हा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे केवळ एक कार्य, कन्येच्या विवाहानिमित्त, विधिवत तीच कन्यादान करणं. इथे लोकापवाद दान या शब्दावरून होऊ शकतो. परंतु कन्येच्या बाबत ते दान हे वस्तू म्हणून नव्हे, तर प्रचलित रितीनुसार, तिच्या पुढील आयुष्याची पूर्ण चिंता वाहू शकणाऱ्या सक्षम हातात तिला सुपूर्द करणं, जेणेकरून ती त्यात पूर्ण रममाण होऊन मनापासून वा आत्म्यापासून आपला संसार करेल व माता पित्यांना मनापासून त्याचे श्रेय देत राहील आणि त्यायोगे मातेची पुत्रीबद्दलची चिंता दूर होईल, या अर्थाने तिचा हात  सुयोग्य हातात देणं इति कन्यादान. कन्यादानम महापुण्यम. सुभद्रेला इतक्या सक्षम...

सुभद्राहरण ३५

सुभद्राहरण ३५ सुभद्रा अर्जुन विवाह सोहळा  ll श्रीगणेशाय नमः ll ll श्रीलक्ष्मीनारायणाय नमः ll मंगलाष्टके सुरू झाली. दशदिशांना त्या सुमधुर मंगल शब्दांनी जणू भरून आणि भारून टाकलं. मंगलाष्टके सुरू झाली आणि अत्यंत रूपवान दिसणारी, वधूवेशात लज्जित होऊन, अंतरपाटा पलीकडे असलेल्या अर्जुनाला पाहण्यास, आतुर झालेली, सुभद्रा विवाहवेदिवर येऊन उभी राहिली.  तिच्या समस्त सख्यांच्या, रेवतीसह घरातील सर्वांच्या नेत्रातून अश्रुधारा सुरू आहेत. स्वतः दादा आणि कृष्णदेखील आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत आहेत. दोन भावात एकुलती एक असलेली बहीण. कृष्णाच्या नेत्रापुढे लहान पणीची नाजूक सुकुमार भाबडी सुभद्रा उभी राहिली. कृष्ण खोड्या काढून सतावत असताना दादांकडे तक्रार घेऊन गेलेली. दादांनी कृष्णाला रागे भरताच अत्यंत हर्षित होऊन टाळ्या वाजवणारी. दादांच्या नेत्रापुढेसुद्धा तोच जीवनपट, सुभद्रेचा, आजपर्यंतचा,  तरळला. दोघे बंधू भावविभोर होऊन गेले.  इकडे मंगलाष्टके सुरू आहेत. वधू वर दोघेही हातात पुष्पमाला घेऊन उभे आहेत. प्रत्येक कडव्यानन्तर सावधानच्या अक्षता वधूवरांच्या मस्तकी पडत आहेत. पुरोहित मंगलाष्टक...