Skip to main content

Posts

श्रीरुक्मिणीस्वयंवर १०

श्रीरुक्मिणी स्वयंवर १० llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   जगतपालकाचं हृदय आणि त्या हृदयाचा महिमा यावर वेद , उपनिषदे यांनी तर मौन बाळगले, अर्थात त्यांनाही या हृदयाचा ठाव आणि पार लागत नाही. जसे शून्यात विसर्जित झालेलं आकाश संथ जाहले आहे तसेच कृष्णाचे हृदय अत्यंत सावकाश गतीने जगताला अप्राप्त आहे.  परंतु अश्या अप्राप्त हृदयात देखील संत सज्जन साधुजन यांनी देहाभिमान सोडून व वृत्तीशून्य होऊन प्रवेशच मिळवला असे नाही, तर हरीच्या या हृदयात त्यांचाच मुक्त वावर होताना दिसत आहे. कारण वृत्ती सांडल्या आणि अभिमान त्यागला की हरी कोणालाही सहजी प्राप्त होतो आणि हे गुह्य मात्र साधुसंताना सापडले आहे. ज्या आधारे ते हरीच्या हृदयाचे अखंडपणे व  मुक्तपणे संचारते दिसत आहेत.  अश्या श्रीहरीच्या चरणांशी जे लिन होऊन राहतात अश्या संत महंत जनांना मोत्याप्रमाणे गुंफून त्यांचा मोतिहार करून असे गुणातीत जाहलेले संतजन यांना चरणांवरून उद्धरून आपल्या गळ्यात मोत्याप्रमाणे  हरीने धारण केलेले दिसत आहे. ज्ञानयुक्त आण...

श्रीरुक्मिणीस्वयंवर ११

श्रीरुक्मिणी स्वयंवर ११ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   उपासक देवाचं यंत्र म्हणून ज्याची पूजा करतात अश्या त्रिकोणी व षटकोनी कोंदणात सजवलेल्या माणिक जडलेल्या मुद्रिका कृष्णाच्या चारही हाताच्या प्रत्येकी चार चार अंगुळीयांवर शोभून दिसत आहेत.  पूर्व आणि उत्तर या दोन दिशांची कुंडले कृष्णाच्या कानात सुशोभित जाहली आहेत आणि त्यांच्यातुन उपनिषदांचा प्रकाश परावर्तित होतो आहे, अर्थात त्यांच्या प्रकाशातूनच उपनिषदे प्रकट होताना दिसत आहेत. या दोन्ही कुंडलांपैकी एक उपनिषद अंग सांगत आहे की हरी सगुण साकार आहे तर दुसऱ्या कुंडलातून येणारा उपनिषद प्रकाश दर्शवत आहे की हरी निर्गुण निराकार आहे. अर्थात दोघांपैकी काहीही वा कुणाचेही ऐका श्रवण भक्तीचा आनंदही मिळेल. मोक्षसुखाचे सार गाळून घेऊन त्याचा सुमधुर असा रसपाक तयार करून त्यातून श्रीकृष्णाचे मुख घडवलेले आहे असाच भास होतो आहे. अर्थात ज्याच्या मुखचंद्राकडे पाहून मोक्षसुखाची प्राप्ती फक्त दर्शनमात्रे होते. ज्याच्या मूर्तरुप दर्शनाने जन्मोजन्मीची अनंत राशींची पाप...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १२

श्रीरुक्मिणी स्वयंवर १२ (प्रथम प्रसंग / अध्याय समाप्तीचा भाग असल्यामुळे थोडा मोठा आहे)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   अहंभाव पूर्ण उगाळून आणि नन्तर तो टाकून  उरलेला सोहम भाव घेऊन त्याचं शुद्ध चंदन तयार करून त्या चंदनाचा मळवट श्रीकृष्णाच्या भाळी लावला आहे. त्यामुळे तिथे फक्त शुद्ध सात्विक समर्पण दृष्टीस पडते. बाकी सर्व मिथ्या भाव वर्ज्य झाले आहेत. नव्हे तर ते अस्तित्वातच नाहीत. अवकाशातील मेघांची बारीक बारीक  मुळं असलेले कुरळे कुरळे काळेभोर केश पवनामुळे हलताना  कृष्णमूख झाकण्यास्तव मुखाकडे झेपावत आहेत असच भासत होतं.  त्या झेपावणाऱ्या केसांना एकत्र बांधण्यास्तव सहजभावाचा मुकुट कृष्णमस्तकी विराजित आहे. त्यामुकुटामध्ये एक मयूरपुच्छ अर्थात मोरपीस खोवलेले दुरुनही शोभत आहे , साजिरे दिसत आहे.  अश्या अनेकविध सद्गुणरुपी अलंकारांनी सुशोभित दिसणाऱ्या त्या कृष्णरूपाला पाहण्याची गोडी ही विशेष आहे. असे लावण्य त्या हरिरूपाचे की पाहणाऱ्याला पिसे यावे आणि पाहता पाहता त्या सदभक्त...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १३

श्रीरुक्मिणी स्वयंवर १३  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   आतापर्यंत आपण श्रीकृष्णाची स्तुती वाचली,  आता रुक्मिच्या विचारांची स्थिती पाहूया. पिताश्री भीमक यांच्या श्रीकृष्णाशी सोयरीक जोडण्याच्या विचारांवर घणाघात करत रुक्मि वदतो श्रीकृष्णाशी शरीरसंबन्ध तोदेखील भगिनी रुक्मिणीचा. पिताश्री आपण या वयात काय चालवले आहे. म्हातारपणाचे छंद म्हणून सोडून देखील देता येत नाही. कारण रुक्मिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. बर हा तुमचा श्रीकृष्ण तरी कोण आणि कसा? अहो ज्याने आपला सख्खा मामा मारला तो तुम्हा आम्हाला काय धड वागवणार. कोणी म्हणतात की हा नंदाचा तर कोणी म्हणतात की हा वसुदेवाचा पुत्र. म्हणजेच ज्याच्या पित्याचाही ठाव नाही अश्याशी सोयरीक हा विचारच अतर्क्य वाटतो मला.  पिताश्री याच्या कुळ गोत्र आणि जन्मपत्र यांचा देखील ठाव  नाही, हा स्वतः स्वतंत्र कुठे आहे हा तर भक्तांवर अवलंबून म्हणजे परतंत्रच ना. बर ह्याचं कर्तृत्व तरी काय, सदोदित परद्वारी पडलेला, गोरसचोरी हेच याच कर्म , एक कार्य धड नाही सर...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १४

श्रीरुक्मिणी स्वयंवर १४  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   हाच मोहिनी रूप घेता झाला देव असुर याना ठगवता झाला पण शंकरांना याची मोहिनी झाली. राहू केतू देवांच्या बाजूला आले आणि अमृत प्राशन करते झाले, याची तक्रार केली रवी चंद्र यांनी. म्हणजे त्यांचा सहभाग इतकाच. मारलं कोणी त्यांना याने. बघा पण जन्मभर त्रास कोणाला तर रवी चंद्र यांना. बरं याला रूप नाही ,गुण नाही, एक ठावठिकाणा नाही, एके देशी वास नाही, याला काय करायचंय सिंहासन मानमरातब देऊन. हा वृत्तीशून्य आहे , याला कसला अभिमान नाही , कसला भोग भोगायचा नाहीये, फक्त सवंगडी जमवायचे मौजमजा करायची हाच छंद आणि हाच योग. अश्या माणसाकडे धन कोठून येणार, हा निर्धन भाजीपाला खाऊन दिवस कंठणारा. हा काय माझ्या भगिनीला सुखात ठेवेल. याला माता पण दोन द्वैत आणि अद्वैत दोन्ही भाव समान असं मानणारा हा, त्यामुळे एक माता देही आणि एक माता याला विदेही पाहते. एक स्वतःबद्दलचा अभिमान वाढवते, तर दुसरी विषयप्रिती वाढवते आणि हा दोघीनाही सोडून धर्मरक्षक म्हणवून घेतो. धर्माच्या घ...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १५

श्रीरुक्मिणी स्वयंवर १५ (द्वितीय प्रसंग समाप्ती)  llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll    याच मनस्थितीत रुक्मिणी विचार करते आहे की, आता कोणत्या इष्टदेवतेची पूजा अर्चना करू , कोणत्या देवालयाला जाऊन येऊ, कोणत्या देवतेला नवस करू, कोणते व्रत वैकल्य करू, जेणेकरून श्रीकृष्ण हे नाथ म्हणून मला प्राप्त होतील.  ही काय माझ्या दैवाची गती आहे, हा काय दुर्दैवाचा फेरा आला आहे, हे काय पाप तापाचरण फला आले आहेत की, ज्यायोगे रुक्मिला ,माझ्या बंधुला, ही दुर्बुद्धी सुचली आहे. त्याच्या विवेकाला हे काय ग्रासले आहे, ज्याकारणे तो असा भ्रष्ट होऊन बोलत आहे.  एखाद्या विवेकी वैराग्याप्रमाणे मी आत्मतेज जागृत करून सर्व अडीअडचणी यांना झेलून कृष्णप्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. एकदा कृष्ण प्राप्ती हेच ध्येय निश्चित केल्यानंतर, सर्व वृत्ती तदाकार करून, स्वकीय व परकीय अश्या कोणत्याही व्यक्तीच्या विरोधाचा विचारही न करता, कार्य करेन आणि ध्येय प्राप्तीसाठी सिद्ध होईन. पण हा माझा निश्चयाचा विचार आणि याबद्दलच...

श्रीरुक्मिणीस्वयंवर १६

श्रीरुक्मिणी स्वयंवर १६ llश्रीगणेशाय नमःll   llश्रीमुकुंदाय नमःll     llदेवी श्रीरुक्मिणी नमोनमः ll श्रीएकनाथ महाराज कि जय ll   आपल्या मनाची आर्तता कृष्णाप्रति पोचवण्याचं अत्यंत जोखमीचं, महत्वाचं कार्य ज्या हाती सुपूर्द करण्याचं रुक्मिणीने योजले, त्या द्विजवराला ती वदती झाली.  " माझी शत जन्माची पुण्याई मी खर्चून आपल्याकडे हे कार्य सोपवले आहे. आपणच माझे प्रजापती , ब्रम्हदेव व महेश्वर आहात. आपल्यावर पूर्ण श्रद्धा व उच्चकोटीचा विश्वास ठेवून मी आपल्याला नम्रपणे विनंती , नव्हे प्रार्थना करते की वाऱ्याच्या अश्वाचा रथ तयार करून त्याला मनाचा वेग देऊन प्रत्येक क्षणाला भूमीअंत आहे असेच समजून आपण या माझ्या संदेशाला मात्र आणि केवळ श्रीकृष्ण यांच्याच हाती सोपवावे.  यास्तव लागणारे व केले गेलेले आपले सर्व शर्थ मी माझ्या हृदयात प्राणपणाने शेवटच्या श्वासापर्यंत ज्ञात ठेवून , त्या उपकाराची परतफेड आपणास न भूतो न भविष्यती अशीच देईन. आपण माझा हा अनुपम संदेश जगतपालक व माझे एकमेव रक्षणकर्ता श्रीकृष्ण यांच्याप्रति पोचवावा व त्यांना हे संदेशपत्र स्वहस्ते सोपवावे. आपण अनन्यसाधा...