Skip to main content

जगणं, आनंद आणि आपण. !!

 

जगणं, आनंद आणि आपण. !!

 

आजच एक जण म्हणाला कि, कालच्या पेक्षा आजचा दिवस छान गेला. मी म्हटलं उद्याचा दिवस अजुन उत्तम जाईल, फक्त तुलना आजच्या दिवसाशी नको करुस. कारण तुलना केली कि त्या आनंदातला आनंद निघून जातो. कोणताही आनंद तुलनात्मकरित्या तपासला कि, त्यातील आनंद कमी वा जास्त वाटतो वा भासतो. पण तो तसा असतोच असं नाही. म्हणून निर्भेळ आनंद् घ्यायचा असेल तर तुलना न करता आताचा आनंद हा अतुलनीय आहे हे समजावं.

त्यामुळे एकतर आहे तो आनंद योग्यरित्या जगता येतो आणि प्रत्येक आनंद हा हवाहवासा वाटतो. मन पुढच्या प्रत्येक आनंदात तितक्याच उत्साहाने सामिल होऊन जगण्यातील गोडी टिकून राहाते. अन्यथा होतं काय की एखाद्या सुमधूर गीतात मन अडकून राहातं आणि त्याआधीची वा त्या नंतरची कोणतीही गाणी एकतर आवडत नाहीत आणि जर आवडली तर त्याइतकं नाही पण हे छान आहे असं मत मन बनवून मोकळ होतं.

म्हणून तुलनात्मकरित्या जगलेला आनंद , मग तो कोणत्याही गोष्टीचा असो, मापात मोजला जाऊ शकतो. त्यानंतर मनाला त्याच प्रकारच्या आनंदाचा शोध घेण्याचा मोह व व्यसन जडतं. त्यामुळे एकतर तसा आनंद मिळेपर्यंत वा तसा क्षण जगण्यात येईपर्यंत. मन कुठेच गुंतत नाही वा कोणत्याही गोष्टीचा आनंद तुम्हालाही मिळू देत नाही. कारण मनाला तशी सवय आपणच लावली आहे वा असते.

याबाबत एखादा संगीतकार, कवी,संशोधक इत्यादींचं उदाहरण देता येईल. ते जर आपल्या एखाद्या कलाक्रुतीत अडकले तर त्यांच्यातील स्रुजनशीलतेला ते मारक ठरेल. त्यामुळे आतील कल्पनेची उर्मि नाहीशी होईल आणि पुढे कोणतीच नवीन कलाक्रुती वा संशोधन बाहेर पडणार नाही. तो कलाकार वा संशोधक संपून जाईल.

मी माझंच उदाहरण देतो. एखादी कविता, वा लेख लिहिल्यानंतर मी त्याकडे बघत सुद्धा नाही. खुप वेळा माझ्या एखाद्या कवितेतील वा लेखातील सौंदर्य वाचक नजरेस आणून देतात. ती समजलेलं नसतं असं नाही पण, त्यात न अडकता पुढे गेल्यामुळे नवनवीन कल्पना मनात आपोआप यायला मार्ग मोकळा होतो. म्हणून जसं मी वर म्हटलं की प्रत्येक क्षण जगत असताना त्यातील आनंद घेत पुढे जायचं तुलना न करता, त्याप्रमाणे मी डोक्यात कल्पना आली वा एखादं चित्र समोर दिसलं कि लगेच त्यावर सुचणारे शब्द उतरवून ठेवतो. म्हणजे ती कल्पना टिपली गेली मन रिकामं झालं. तेच मन पुन्हा नवीन कल्पनेच्या वा शब्दांच्या शोधात पुढे निघून जातं.

हे जसं कले बाबत खरं आहे त्याचप्रमाणे जगण्याबाबत सुद्धा तितकंच खरं आहे. फक्त तशी दुर्ष्टी, ठेवणं महत्वाचं आहे. कारण नजर तर सर्वांकडेच आहे, पण द्रुष्टी महत्वाची. द्रुष्टी असली कि द्रुष्टीकोन येतो आणि द्रुष्टीकोन आला कि, आनंद येतो.

 

तेन्व्हा प्रत्येक क्षण तुलना न करता स्वच्छ मनाने निर्भेळ आनंद घेत जगा. !! जगणं सुलभ होईल आणि सहजसुद्धा होईल. !!!

© ®संकल्पना व लेखन :  प्रसन्न आठवले.

०६/१०/२०२०

२०:२०

 

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...