Skip to main content

तू


तुझं गाणं गुणगुणणं शब्दातीत आहे
त्या नादात मी स्वत:लासुद्धा हरवतो

त्या लहरीत मन बेधुंद होतं, नकळत
त्याच दोलायमान अवस्थेत मी झुलतो

केसातून येणारा मोगऱ्याचा सुवास
मला अनाहत नादात घेऊन जातो

तुझ्या डोळ्यातील काळी  वर्तुळं 
त्या तेजात मी मंत्रमुग्ध होऊन जातो

अविरत आनंदाच्या त्या अनुभूतीतून
मन सतत म्हणतं अजून जरा डुंबतो 

अक्षय सुखाचा हा जणू सोहळाच 
याच भासात सतत मी विहरत असतो

तिथून बाहेर पडूच नये असं वाटून 
डोळे मिटून तो आनंद साठवत जगतो

©® कवी : प्रसन्न आठवले
१७/०३/२०२०
२०:४४

Comments