Skip to main content

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ४

#काल्पनिककृष्णसुभद्राकथा 

काल्पनिक कृष्ण सुभद्रा कथा ४

संभ्रमात पडलेली सुभद्रा विचारमग्न अवस्थेत आपल्या महाली निघाली. इकडे कृष्ण, आपण एक हल्ला यशस्वी परतवून लावला,  या समाधानात आहे. तर दुसरीकडे नारद पुन्हा सुभद्रेच्या महाली,  विचारमग्न सुभद्रेच्या समक्ष,  प्रकट होतात. 

नारायण नारायण 

नारद : आपण चिंताग्रस्त दिसता देवी. जीचा भाऊ प्रत्यक्ष श्रीकृष्ण आणि बलराम हे आहेत आणि पतीदेव श्रेष्ठ धनुर्धारी अर्जुन त्या देवीच्या मुखचर्येवर चिंता. . असंभव आहे. 

सुभद्रा : मला कृष्णाने जे सांगितलंय त्यावरून मी विचारमग्न झाले आणि महालात कधी आले तेच कळल नाही. 

नारद : मधुसूदनांची लीला अपरंपार आहे. दोष आपला नाही. काय आहे की  देवी आपण श्रीकृष्णांच्या भगिनी आहात पण स्वभावाने अगदी दादांसारख्याच आहात

सुभद्रा : पण म्हणजे आपल्याला काय म्हणायचंय ते उलगडून सांगितलंत तर अधिक बरं होईल. 

नारद : मी सांगितलं असत नक्की , परंतु आपण जाणता की, श्रीकृष्ण किती चाणाक्ष आहेत आणि अंतर्मनाचा ठाव घेणारे. त्यामुळे उगीच बंधू भगिनींमध्ये कलह निर्माण केल्याचा आळ माझ्या माथी यायचा. त्यामुळे मी इथून प्रस्थान करणे आमच्या हिताचे राहिलं. 

सुभद्रा : आपण अनाठायी भीती बाळगून आहात.  आपले मधुसूदन हे माझे बंधू आहेत आणि ते माझ्या शब्दाबाहेर नाहीत हे नक्की. आपण विशेष चिंता करू नये. हा माझा मुद्दा आजपण ठाम आहे .

नारद : देवी असुदे पण मुद्दाम आगीच्या स्वाधीन होण्याची माझी तयारी नाही. तेंव्हा मला क्षमा करावी.

सुभद्रा : देवर्षी आपणास मी वचन देते की, काही वाद विवाद घडलाच आणि तशी वेळ आलीच तर मी आपल्याला अभय मिळवून देईन. पण आपण बोलावं.

नारद : देवी मी आपल्या म्हणण्यावर विसंबून आहे. पण काही प्रमाद घडल्यास माझी अवस्था राजा त्रिशंकू सारखी होईल. ना धड इथे ना धड तिथे. तरीही आपल्या वचनांवर मी विश्वास ठेवून कथन करतो.  ऐकावं  आपण.  माझं म्हणणं इतकंच आहे की दादांप्रमाणे आपण भोळेपणाने विश्वास ठेवलात बंधुवर. पण अस सांगितलं तरी काय, श्रीहरींनी आपल्याला.

सुभद्रा : आपल्या कथनानुसर मी कृष्णाला विचारावयास गेले, की, कृष्णा तू स्वतःची आबाळ करतोस आणि तुझी काळजी घेणारं या जगात कोण आहे. कारण अनेक राण्यांच्यात अडकल्यामुळे तू दुर्लक्षित असशील. दादांचं तस नाही एकच पत्नी असल्यामुळे त्यांच्यावर पूर्ण लक्ष राहात असेल वहिनींचं. त्यावर त्यांनी मला दादांचं उदाहरण दिलं. म्हणाला की मला विचारण्यापेक्षा दादांना विचारलस का ? 

कारण आपण दादांकडे लक्ष देत नाही आणि त्यांचंही स्वतःकडे लक्ष नसत, त्यामुळे त्यांना जास्त जरुरी आहे, तुझ्या प्रेमाची आणि वहिनींना ते दटावून गप्प करत असतील. म्हणून मग मी विचारात पडले की कृष्ण म्हणतोय तेदेखील सत्य आहे. त्यात रेवतीवहिनी सुदधा दादांना घाबरतात म्हणजे दादा जे म्हणतील तीच पूर्वदिशा.  आता या चक्रव्यूहातून कस बाहेर पडायचं. 

नारद : नारायण नारायण , देवी भल्या भल्यांच्या मनाला चक्रव्यूहात अडकवून स्वतः सुटण हा हातखंडा आहे यदुवीरांचा. त्यात आपण , मी आधी म्हटल्याप्रमाणे, भोळ्या आहात खूप साध्या आहात. गेलात प्रेमाने धाकट्या बंधूंना ख्यालीखुशाली विचारावयास आणि महालातून बाहेर पडलात थोरल्या बंधूंचा विचार करत, करत. 

सुभद्रा : हो खर आहे आपलं. अगदी असंच झालं. पण मग आता. 

देवर्षीच्या मिश्किल डोळ्यात एक कल्पना आली आणि ते डोळे अजून चमकले. 

क्रमशः
कथा संकल्पना : प्रसन्न आठवले
११/११/२०१८

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...