Skip to main content

त्या पार लागल्या नौका

त्या पार लागल्या नौका नयनांच्या लाटेवरती
अडकले शब्द भिजलेले अधरांच्या तीरावरती

तू दिली मला जी वचने अजून मी ठेवली हृदयी
त्या सागर लाटेसम ती परतुनी तुझ्याप्रत जाती 
अंधुक आस ती आहे  मनी अबोल काहूर येई
अडकले शब्द भिजलेले  अधरांच्या तीरावरती

ती जाणीव तुटते तुटते तुटून ती उतरली नयनी
तू गेला सोडून प्रीती भंगले हृदय  शर बनुनी 
तरी वेडी आशा आहे अजूनही तुझ्या येण्याची 
अडकले शब्द भिजलेले  अधरांच्या तीरावरती

© कवी : प्रसन्न आठवले 
२१/११/२०१८
१८:५३

Comments