Skip to main content

मनाचा आणि आपला मनाशी संवाद भाग ७

मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद  भाग ७

इथे एक  गोष्ट लक्षात  ठेवली पाहिजे कि, इथपर्यंतचा प्रवासच खूप महत्वाचा आहे. कारण मन शांत करणं हेच खूप कष्टसाध्य आहे. त्याचवेळी या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी काही बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. त्या खालीलप्रमाणे.

१. बैठक हि अत्यंत आरामदायक असली पाहिजे. कारण
     बसण्यात कष्ट होत असतील अश्या स्थितीत शरीराची
     एकाग्रता त्यावर  विभागली जाऊन मुख्य गोष्टीकडे 
     अथवा  उद्देश्याकडे दुर्लक्ष होऊ शकत.  

२. शरीराच्या कोणत्याही भागावर जोर पडेल अशी
      बैठक स्थिती निवडण्यात येऊ नये. त्यामुळे उद्देश
      साध्य होणार नाही.

३. हा अभ्यास सुरु केल्यानंतर सुरवातीला  काही दिवस  
      वा काही काही वेळा झोप येण्याची शक्यता असते.   
      म्हणून सुरु करताना शरीर व मन ताजतवान असेल
      अश्यावेळीच हा अभ्यास सुरु करावा.  मुख्यत्वे
      सकाळी उठल्यावर. कारण या वेळी शरीर पुरेश्या
      निद्रेमुळे हलकं झालेलं असत. ज्यामुळे हा अभ्यास
     करण्यास मदत होईल.

४. झोप येत आहे असं वाटल्यास सरळ काही वेळ पडून
    आराम करावा मग हा अभ्यास सुरु करावा, जेणेकरून
    शरीर पुन्हा ताजतवानं होऊन अभ्यास नीट करता  
    येईल.

५. हा एकाग्रतेचा अभ्यास असल्यामुळे शरीर व मन पूर्ण
    तंदुरुस्त असणं गरजेचं आहे. म्हणून कोणत्याही   
    प्रकारचा आजार असल्यास हे टाळावं. पण मानसिक
    थकवा असेल तरी यातील एकाग्रते पर्यंत पोहोचण्याचा
    अभ्यास झाला असेल तर त्याचा सराव करायला
    हरकत नाही. कारण याचा उद्देशच मुळात ताण तणाव
    या पासून मुक्ती हा आहे. म्हणून चित्त एकाग्र झाल्यास
    मानसिक थकव्यापासून आराम मिळतो.

६. सुरवातीचा एकाग्रतेचा अभ्यास हा शरीर आणि मन   
     शांत , स्तब्ध, स्थिर, अविचल होईपर्यंत करत राहणं
    गरजेचं आहे. काही जणांना कदाचित काही दिवसातच
    हे साध्य होईल. काही जणांना काही आठवडे सुद्धा
    लागू शकतात. म्हणून जमत नाही वा येत नाही असं
    वाटून अर्धवट सोडायची गरज नाही. प्रयत्न करणं
    गरजेचं आहे.

७. मुख्य मुद्दा कधी कधी  हाती आलेली एकाग्रता चुकून
    भंग पावते वा पुन्हा परत मन एकाग्र होण्यास
    विलंब लागतो वा अन्य काही कारणाने चित्ताची
    स्थिरता होऊ शकत नाही. याच महत्वाचं कारण
    हा अभ्यास एक अभ्यास म्हणून न करता आपली  
    गरज म्हणून करत आहोत हे मनावर बिंबवलं पाहिजे.
    या कामी सगळ्यात उपयोगी येणारी गोष्ट म्हणजे 
    इच्छा. दृढ इच्छेचा अभाव म्हणजेच इच्छा शक्ती च्या   
    अभावामुळे होऊ शकतं. त्यासाठी नामस्मरणाप्रमाणे
    हि गोष्ट  वा हा मुद्दा मनावर कोरला पाहिजे कि मला
    चित्त एकाग्र केलं पाहिजे. मला या योग साधावयाचा
    आहे. आधी हा संकल्प मनात रुजवून त्यामागे मनाची
    आणि मनाच्या मागे इच्छेची शक्ती लावणं महत्वाचं
    आहे.

८. सर्वात महत्वाचा मुद्दा हा कि, हे सहज साध्य आहे
    आणि आपल्याला जमणार या विश्वास आणि श्रद्धा या
    जोरावर नियमित शरीराला आणि मनाला कोणतेही
    कष्ट न देता, पण दृढ संकल्पाने सुरवात करून इच्छित
    लक्ष्यापर्यंत पोहोचता येईल. यासाठी कितीही विलंब
    लागला तरी चालेल.

अजून काही मुद्दे पुढील भागात.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०३/०७/२०१८
१५.५२

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...