Skip to main content

मनाचा आणि आपला मनाशी संवाद भाग ६

मनाचा आपल्याशी आणि आपला मनाशी संवाद  भाग ६

 
अश्या प्रकारे शांत होण्याचा , शरिराने आणि विचाराने , प्रयन्तपूर्वक सराव कर. वेळ लागू दे. कोणतीही परीक्षा नाही. किंवा मार्क्स नाहीत. हा सराव करताना श्वास हळू हळू एका लयीत येऊन शांत शांत होत जाईल. यात एक स्थिती अशी येईल, कि आपल्याच श्वासाचा धीमा धीमा होत चाललेला प्रवास आणि त्याचा आवाज सुद्धा ऐकू येऊ लागेल. हे घडलं तर समज कि, तू योग्य दिशेने आहेस. या सरावाला प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आणि काळाने पोचू शकेल. काही घाई करायची गरजही नाही. अत्यन्त सावकाशपणे इथे पोहोचायचे आहे. या स्थितीत पुढे आपल्या ह्रदयाचे ठोके सुद्धा कानांना ऐकू येऊ लागतात. याचासुद्धा आनंद घ्यावा.

जितकी शांतता जास्त तितकाच या स्थितीचा आनंद जास्त. मनातले नको ते आणि हवे ते असे विचारांचे विभागीकरण करता येत. जे विचार आपल्याला नको असतील त्यांना बाजूला सारून जे विचार चांगले आहेत, सकारात्मक आहेत, ते जोपासता येऊ शकतील. हे साध्य झाल्यानंतर जे विचार आता नकारात्मक वाटतात त्यांना प्रयत्नपूर्वक दूर करणं या स्थितीला शक्य होऊ शकत. कारण मन पूर्ण शांत आहे आणि विचार पूर्ण थांबलेले आहेत.

आता फक्त आपण आणि  आपले विचार हे दोनच साथीदार. या स्थितीचा सुद्धा काही काळ आनंद घ्यावा.  इथे शांत राहण्याचा सराव करावा. या निर्मळ आनंदात अगदी भान हरपून गेलं तरी हरकत नाही . इतक्या शांततेत गेल्यानंतर विचार हे आपोआप स्तब्ध व्हायला सुरवात होते. त्यावर हळुवार नियंत्रण येऊ लागतं. हेच आपलं विचारचं   धन आहे पुढे जाण्याचं.  कारण इथं आपण सराव करायचा कि, कोणते विचार प्रयत्नपूर्वक आपल्याला बाजूला करायचे आहेत.  म्हणून घाई उपयोगाची नाही. अत्यन्त सावकाश ह्या स्थितीला थांबून काही दिवस इथेच राहण्याचा सराव करणं गरजच आहे.

या नंतर आपल्याला एक सुखद शांतीचा अनुभव येईल. जो कदाचित या आधी कधीही घेतला नसेल. ध्यान, धारणा नित्य नियमित करणाऱ्या लोकांनां हा अनुभव येत असतो. या स्थितीला  राहण्याचा सराव झाला कि, मग पुढच्या तयारीला लागता येत. पुढच्या स्थितीत आपल्याला आपल्या विचारांना चालना देणं  किंवा त्यांना आपल्या मनाप्रमाणे वळवण हे महत्वाचं कार्य करायचं  आहे.

पण त्या आधी इथपर्यंतचा सराव हा पूर्ण करणे गरजेचे आहे. हे पुन्हा नमूद करू इच्छितो.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
०२/०७/२०१८
१६:३०

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...