Skip to main content

जानकी पुनःवनवास २



ll ॐ गंगणपतये ll
जानकी पुनःवनवास २
अश्याच मनमोहक वातावरणात सजलेल्या , नटलेल्या, रम्य अयोध्या नगरीला जणु स्वर्गाची शोभा प्राप्त झाली होती. सर्व देव देवी देवता , यक्ष, किन्नर, गन्धर्व जणूकी ही आभा पाहण्यासाठी आकाशात जमलेल होते. रविकिरणे शत शत दिशानी अयोध्येवार आभूषण करत होती, समस्त अयोध्या राज्य जणू सोन्याच्या वर्खात लुप्त झाली होती. चहुकड़े फक्त आनंदोत्सव , जल्लोष, उत्साह, यांचाच संचार होता.
आज कोणत्याही घरी चूल पेटणार नव्हती. नव्हे तसा शिरस्ताच होता राज्याचा. कोणताही समारंभ साजरा होत असेल तर समस्त प्रजाजनाना सम्पूर्ण उत्सवाच्या काळात घरी चूल पेटवण्याची जरूर नसे, किंबहुना तसा नियम असे. सर्वत्र असा भारलेला आसमंत असताना, चला डोकावूया राजप्रासादात आणि महालात काय काय घडत आहे.
हा प्रजाजनांचा उत्साह असताना प्रत्यक्ष प्रासादात, प्रांगणात आणि महालात अवर्णनीय आनंद ओसंडून वहात होता. प्रासादतील लगबग विशेष जाणवत होती. हवेत वसंताच्या आगमनाची लहर डौलत होती. समस्त कर्मचारी गण आपापल्या नेमलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कामातसुद्धा उत्साहाने सहभागी होत होता. कारण नुकतेच हनुमंत प्रभुच्या आगमनाची सुवार्ता घेऊन आले होते. आणि तीच वार्ता कर्णोपकर्णी सर्वदूर पसरत होती, अगदी वाऱ्याच्या वेगाने, कदाचित त्याहीपेक्षा जलद.
इकडे महालात भरत , शत्रुघ्न यांचा आनंद गगनावर ओसंडून वहात असताना , माता कौसल्या, सुमित्रा यांसह चौदा वर्ष पश्चाताप अग्नित होरपळून निघालेली माता कैकई यांची काय स्थिति असेल. चौदा वर्षाचं अतीव दुःख भोगल्याचा भाव, ते दुःख सरल्याचा आनंद , आणि प्रत्यक्ष प्राणप्रिय रामचन्द्र आणि लक्ष्मण, देवी जानकिसह, परत आगमन करते होणार. त्या माऊली डोळ्यात प्राण आणून फक्त यांच् क्षणासाठी जगल्या होत्या. पण दोन व्यक्तिंचा विशेष उल्लेख महत्वाचा आहे.
माता कैकई जिने मंथरेच्या नादाला लागून स्वतःहुन सख्खया पुत्राहूनही प्रिय असलेल्या पुत्राला, प्रत्यक्ष रामाला वनवासात धाडल होत. घडलेल्या गोष्टीचा पश्चाताप , त्यायोगे झालेला पति वियोग आणि नन्तर पुत्र भरत यांचा दुरावा या सर्व दुःस्थितितुन सावरण चौदा वर्ष माता कैकई ला शक्य नव्हतं झाल. यांच् मुख्य कारण पुत्र भरत याने चौदा वर्ष बोलण बंद केलेल असल्यामुळे गेली चौदा वर्ष एक भीति सतत मातेच्या मनात सल करून होती. की माझा राम काय म्हणेल , ज्याच्यावर मी सखख्या पुत्रापेक्षा प्रेम केल आणि ज्याने माझ्यावर सख्खया मातेपेक्षा जास्त प्रेम केल त्यालाच मी स्वतः वनवासात पाठवल. काय भाव असतील त्याचे. काय विचार करेल तो, कसा स्विकारेल मला, कशी क्षमायाचना करू, पण त्यालायक तरी आहे का मी, की तो पण भरताप्रमाणेच बोलण त्यागेल. यांच् चिंतेततीने चौदा वर्ष एकांतवासात आपल्या महालात काढ़लित.
आणि दूसरी व्यक्ति
क्रमशः
© लेखन : प्रसन्न आठवले
२८/११/२०१७
जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...