Skip to main content

जानकी पुनःवनवास ४

ll ॐ गंगणपतये ll

जानकी पुनःवनवास ४

या दोन्ही विरुद्ध भावाच्या अधीन असलेल्या व्यक्तिंची भावावस्था पाहिल्यानंतर आता राजप्रासादात अन्तःपुरात जाऊया. माता कौसल्या यांच्या अवस्थेचा विचार करूया.

त्यांची अवस्था अजूनही विचित्र आहे. कारण जे घडल त्याचा दोष कोणालाच देता येत नव्हता. अश्याच संभ्रमावस्थेत मातेने  १४ वर्ष काढली होती. जे घडल त्यात प्रत्यक्ष पति, राजा दशरथ आणि त्यांचीच द्वितीयपत्नी कैकयी, हे मुख्य कारण होते. प्रश्न दोष देण्याचा वा अपराध कोणाचा हा नव्हताच, पण का अस घडल तेही आपल्याच पुत्राबाबत का.  प्रश्न हा होता, की नियतीने एका हाताने पुत्ररूपाने दान दिलसुद्धा आणि दुसऱ्या हाताने तेच हिसकावून घेतल, अक्षरशः काढून नेल.

यात समाधानाची बाब एकच की निदान १४ वर्षानि आज परत राम सीता व लक्षण यांच् दर्शन होईल, पुत्रच दोन्ही. हो कारण ते दोघे एकमेकांवेगळे करताच येण शक्य नाही. जितका राम मला प्रिय तितकाच , किंबहुना आता काकणभर  अधिकच प्रिय आहे लक्ष्मण आणि अर्थात उर्मिला. ज्यात काहीही दोष नसताना भरडले गेलेले हे दोन जीव. राजा जनकानी अभिमानाने सांगितल की मला उर्मिलेचा अभिमान आहे. आम्ही परोपरी विनवुनसुद्धा ते म्हणाले की तिच्या सासरी अश्या दुर्धर घटना घडत असताना, आम्ही तिला काही दिवसांसाठी घेऊन जाव, असा विचार सुद्धा करू शकत नाही. आमच्या सर्व कन्या आपल्या घरी सुखात असतील याची खात्री आहे, आपण जगन्माता आहात. आम्ही निश्चिंत आहोत.

पण तरीही अपराधिपणाचा भाव काही केल्या जात नाही. चारही सूना, सूना कश्या मुलीच त्या, एकाहुन एक गुणवान आहेत. राजा जनकांचे संस्कार आणि मिथिला नगरीची पुण्याई,  म्हणुनअश्या मूली रघुकुलात आल्या. एक श्रुतकीर्ति सोडली तर बाकीं तिघिनाही पतिवियोग या ना त्या कारणामुळे. आणि सेवाधर्म तर जणु घराण्याची देणगी असावी अशीच. कुठेही तक्रारीला वाव नाही की, चेहऱ्यावर निराशेचा लवलेश नाही. कामात इतक्या हुशार की या राजकन्या होत्या हे ख़र वाटणाऱ नाही.

असो या सर्व विचारांच्या कोलाहलात माझे रामसीता आणि लक्ष्मण येत आहेत हेच विसरून गेले काही काळ. चला स्वागताची कितपत तयारी झाली आहे ते एकदा बघून घेऊया.

अस म्हणून माता कौसल्या आपल्या महालाबाहेर येऊन दासीना बोलावत्या झाल्या.

क्रमशः

© लेखन : प्रसन्न आठवले
३०/११/२०१७

जय श्रीराम

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...