Skip to main content

सुखाचा शोध - २

ll ॐ  ll. श्री गणेशाय नमः ll

सुखाचा शोध  -  २
.
आदिमानव ही संकल्पना पुराण काळात कुठेही उल्लेखित नाही. ही संकल्पना वा शोध हा पाश्च्यात्य देशातून आला. अर्थात त्या मागे संशोधन आहे, अभ्यास आहे, हे नककीच. पण हिन्दू संस्कृतित सर्व लिखाण हे माणूस पुढारल्यानन्तर आहे. किंबहुना आपण मागासलेले असु ही संकल्पना आपल्या कोणत्याही लिखाणात आढळत नाही.

तरीही उपलब्ध ज्ञानावरुन अस म्हणता येईल की माणूस हा कधीतरी आदिमानव होता. मग तिथून सुरवात केली तर हेच लक्षात येईल की प्राण्यापासुन वेगळा होत होत माणसाला स्वतःच वेगळ अस्तित्व ,ओळख, वा व्यक्तित्व सापडल आणि तिथे मानवाची प्रगति सुरु झाली असावी. पण ही वाट वाटते तितकी सुलभ नककीच नसणार. तरीही भाव, भावना आणि ते व्यक्त करण्याची माध्यमं माणसाला गवसलि अथवा लक्षात आली , तेंव्हाच प्रगतीला सुरवात झाली.

प्रथम दुःख काय झाल असेल, ते लक्षात कस आल असेल, त्याहुन महत्वाच ते घडू नये म्हणून प्रयास, अथवा का घडल यांच् आश्चर्य, अघटित घडलय याची जाणीवया सर्व गोष्टीत अनेक प्रश्नांची उत्तर दडली आहेत. एक कल्पना करू की दोन आदिमानव एकत्र फिरत आहेत. या दरम्यान दोघांपैकी एकाला लागल,खरचटल अथवा इजा झाली. ती त्याने कशी व्यक्त केली असेल. आपण आज इतके प्रगत आहोत की , याची कल्पना करण सुद्धा मुश्किल आहे. तरीही विचार केला की लक्षात येत  की, वेदनेची जाणीव हे पाहिले भाव असु शकतात. एक अनुमान.

हाच विचार पुढे नेऊ पुढच्या भागात. आज इथेच थांबु.

© संकल्पना आणि लेखन प्रसन्न आठवले
०१/११/२०१७
शुभंभवतु

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...