Skip to main content

सुखाचा शोध - १

ll ॐ  ll. श्री गणेशाय नमः ll

सुखाचा शोध  -  १

मानवाच्या देहात आलेल्या प्रत्येक जिवाला सतत काही ना काही करत राहण्याची खुप मोठी देणगी विधात्याने दिलेली आहे. पण प्रथम या गोष्टीची जाणीव मानवाला कधी झाली असेल, कधी त्याला हे समजल असेल हे ख़र तर ताड़ण मुश्किल आहे. पण तरीही काही अंदाज बांधता येऊ शकतात.

मानव अगदी अश्म वा त्याही आधी कधीतरी जेंव्हा प्रथम हसला असेल वा रडला, रुसला वा असेच भाव व्यक्त करता झाला असेल तिथेच ख़र तर सुख दुःख या भावना जन्म घेत्या झाल्या. अनेक प्रश्न यातून निर्माण झाले. सुख दुःख, राग लोभ, हसण रडण हे कळून येण आणि ते वारंवार करावस वाटण आणि ते करण्यासाठी सर्वतोपरि प्रयत्न करण ही जणु एक साखळी तयार झाली. यालाच जन्म आणि मृत्यु यामधील अंतर काटण किंवा जगण्याच्या संघर्ष करण म्हणजेच जीवन अस संबोधल गेल.

कधी ते सांगता येणार नाही , पण प्राणी आणि मानव यातील अंतर वाढत असतानाच्या काळात माणसाला आपण वेगळे आहोत हे उमगल असेल. किंबहुना तो फरक त्याला प्रकर्षाने जाणवला असेल. जाणीव , मन, भाव तरंग, तरलता, बुद्धि, उपजत ज्ञान हे पहिल्यांदा जेंव्हा उमगल असेल त्या वेळच्या माणसाच्या भावना काय असतील याची आज आपल्याला कल्पना सुद्धा करता येणार नाही. यातून तयार होणाऱ्या विचारांच्या लहरी, त्याच व्यक्त होण हे ज्यावेळी कळल असेल प्रथम, त्या क्षणाच मोजमाप करताच येणार नाही.  द्वैतही तिथेच सुरु झाल असाव. सुख दुःख, राग लोभ, प्रेम द्वेष इत्यादि

कदाचित पहिल दुःख, वेदना, धक्का यांची जाण आली तिथेच कदाचित सुरु झालाय ''सुखाचा शोध"

याचाच मागोवा घ्यायचाय या नव्या लेखमालेत आणि पहायचेत याचे अनेक पैलु.

सुखाचा शोध

© संकल्पना आणि लेखन प्रसन्न आठवले
०१/११/२०१७
शुभंभवतु

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...