Skip to main content

नाम अवतार कलियुगी - २१ व अंतिम

नाम अवतार कलियुगी - २१ व अंतिम

आजपर्यंत पाहिलेल्या २० भागात नाम हे कस या युगाशी निगडित आणि बहुफल देणार एकमेव साधन आहे, याचा आढावा घेतला. या लेखमालेची प्रेरणा स्वयम माझे गुरु श्री ब्रम्हाचैतन्य गोंदवलेकर महाराज. आणि त्यांच्याच कृपेने मी हे लेखन करू शकलो. त्यांमुळे यांच्या चरणी ही २१पुष्पे वाहून या मालेची सांगता करावी हेच उत्तम.

नाम हेच या युगातील तारक आणि मारक दोन्ही आहे. कोणत्याही काळात, वेळात स्थळात घेता येणारे , सहज सुलभ , सहज साध्य अस हे साधन अनेक संत महंत यानी सिद्ध करून आपल्या हाती दिलेल आहे. हे जीवन हा सूक्ष्मातून सूक्ष्माकडे जाण्याचा प्रवास आहे, जन्मोजन्मिचा.  म्हणून त्यासाठी लागणारे साधन सुद्धा सूक्ष्म पणे काम करणारे असावे. आणि नामस्मरण हेच ते साधन आहे जे सूक्ष्म आहे व परिणामकारक आहे. अगदी ठिबकसिंचन सारखे. शांतपणे काम करणारे.

त्याचा सुनियोजित वापर आत्मोन्नति  आणि उद्धारा करता कराव ही कळकळीची इच्छा महाराजांची होती आणि आहे. फक्त आणि फक्त नाम घेऊन जगात उत्तम प्रकारे जीवन व्यतीत करून अंति मोक्षपदाला जाण्याचा मार्ग यांच् जन्मात संतानी आपल्याल्या त्यांच्या जीवनातून उदाहरणाने सांगितल आहे.  किंबहुना एक सहज सोप्पी गुरुकिल्ली सर्व समस्यांवर त्यानी  आपल्या हाती दिली.

त्याचाच वापर करून प्रत्येकाने आपलाच उद्धार करून घेणे हे हितावह आहे. कदाचित पूर्वसंचिताचे फल जसे असेल त्याप्रमाणे प्रत्येकाला कमिअधिक प्रमाणात व लवकर अथवा उशिरा याचा लाभ होईल. पण नाम घेण्यास सुरवात केल्यानन्तर एक एक करुन सर्व समस्या चुटकिसरशी सुटतील अस नसल तरीही प्राप्त भोग भोगण्याची शक्ति आणि तयातून बाहेर पडण्याचा राजमार्ग नककीच सापडेल हे निश्चित .

सर्व कर्ममार्गाचा शेवट हा अंति भगवांताप्रत जातो हे सुनिश्चित. पण अनेक मार्ग आज कलियुगी आणि या एकविसाव्या शतकात प्रत्यक्षी वापरता येतील हे संभव नाही. किंबहुना काही मार्ग जस हठ योग,  तप इत्यादि आताच्या जीवनशैलीत अशाक्यप्राय आहेत.  म्हणून इतके सोप्पे आणि सहजसाध्य साधन उपलब्ध असताना आणि याचा परिणाम दिसून येत असताना दुसऱ्या साधनाचा विचार सुद्धा करण्याची आवश्यकता नाही. 

यात सद्गुरु तुम्हाला साधनेपर्यंत नेतील आणि ते साधन साध्य करण्यासाठी सर्व मदत करतील. पण प्रत्यक्ष्य नाम घेण्याच कर्म आपल्याला करायच आहे.  हे खुणगाठ बांधून ठेवा.  म्हणुन नामात रहा आणि स्मरणातून सरणापर्यंतचा प्रवास सुलभ करा .

शुभमस्तु शुभंभवतु शुभेच्छा

अंति या लेखमालेला प्रतिसाद देऊन मला लिहित ठेवल्याबद्दल सर्व वाचकांचे आभार . सद्गुरु चरणी वंदन.

लवकरच पुढील लेखमाला 'सुखाचा शोध'

जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

श्री गुरुवे नमः

© संकल्पना आणि लेखन : प्रसन्न आठवले
२६ /१०/२०१७

Comments

Popular posts from this blog

गीत विश्लेषण गीत - नवल वर्तले गे माये भाग ४

गीत विश्लेषण मालिकेत गीत नवल वर्तले गे माये भाग ४ व अंतिम नवल वर्तले गे माये उजळला प्रकाशु मनाचिये अंधाराचा होतसे विनाशु ||धॄ|| हास्यचि विलसे ओठी अद्भुताचे झाली गोठी राति...

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १

अहिरावण महिरावण चित्रसेना आणि मकरध्वज संक्षिप्त कथा - १ इंद्रजित वधानंतर रावण काहीसा चिंतीत होता. त्याला श्रीराम व लक्ष्मण यांच्या मायावी असण्याची शक्यता वाटू लागली होती. याला काय उपाय करावा या गहन विचारात असतानाच माता कैकसी रावणाच्या कक्षात आली. मातेने रावणाला चिंतेचं कारण विचारलं. रावणाने रामलक्ष्मण यांच्या विषयी वाटणाऱ्या चिंतेबद्दल मातेला अवगत केलं. माता कैकसीने त्याला पाताळराज अहिरावण व महिरावण यांचं सहाय्य घेण्याबद्दल सुचवलं. अहिरावण महिरावण दोघेही देवी कामाक्षीचे भक्त होते.  हे ऐकताच रावणाला आठवलं की फार पूर्वी या दोघांशी त्याची घनिष्ट मैत्री होती. परंतु अजिंक्य झाल्यापासून त्यांच्याशी काही गाठभेट घडली नाही. परंतु जुन्या संबंधांच्या आधारे  रावणाने त्यांना त्वरित उपस्थित होण्याचा संदेश पाठवला. अर्थातच तो दशानन रावणाकडून आलेला संदेश पाहून अहिरावण व महिरावण त्वरित उपस्थित झाले आणि हात जोडून "आज्ञा दशानन म्हणाले." रावणाने आपली चिंता सांगून श्रीरामलक्ष्मण यांना संपवण्याचा उपाय करण्याची आज्ञा त्यांना दिली. अर्थातच त्यांनी ती सहर्ष स्वीकृत केली. युद्धकाळात श्रीरामलक्ष्मण यांच...

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३

गीत विश्लेषण तुझे गीत गाण्यासाठी ३ ‘तिन्ही लोक आनंदाने भरून गाऊ दे रे तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे। शुभ्र तुरे माळून आल्या निळ्या निळ्या लाटा रानफुले लेऊन सजल्या या हिरव्या वाटा या सुंदर यात्रेसाठी मला जाऊ दे रे। मोर केशराचे झुलती पहाटेस दारी झऱ्यातुनी दिडदा दिडदा वाजती सतारी सोहळ्यात सौंदर्याच्या तुला पाहू दे रे। शांत शांत उत्तररात्री मंद मंद तारे तुझे प्रेम घेऊन येती गंधधुंद वारे चांदण्यात आनंदाच्या मला न्हाऊ दे रे। एक एक नक्षत्राचा दिवा लागताना आणि फुले होण्यासाठी कळ्या जागताना पौर्णिमा स्वरांची माझ्या तुला वाहू दे रे।’ गीत : मंगेश पाडगावकर संगीत : यशवंत देव गायक : बाबूजी अर्थात सुधीर फडके  तर अश्या या ब्रह्मांडातील तिन्ही लोकांना नित्य चैतन्यमय आनंदाने भरलेलं राहू दे.  ह्या सुंदर, मनोहर सृष्टीने नटलेले तुझं हे जग, जे पाहण्यासाठी तू मला या जगात पाठवलं आहेस. या चर्मचक्षू व्यतिरिक्त असलेल्या जगातील तुझ्या समस्त सजीव व निर्जीव रुपाला डोळे भरून (अर्थात हे डोळे म्हणजे अंतःचक्षू)  पाहू दे आणि या तुझ्या सृष्टीचं चैतन्यमय गीत गाण्यासाठी अर्थातच मला स...